Posts

Showing posts from May, 2022

कराडच्या नवीन कृष्णा पूलावर ट्राॅफिक जाम;वाहनधारकांची कसरत सूरू...

Image
कराडच्या नवीन कृष्णा पूलावर ट्राॅफिक जाम;वाहनधारकांची कसरत सूरू... कराड दि.1 (प्रतिनिधी) येथील नवीन कृष्णा पूलावर आज पहिल्यांदाच ट्राफिक जाम झाले. पूलाच्या डाव्या बाजूस विद्युत खांबावरील ट्रांन्सफाॅर्मर नवीन खांबावर बसवण्याचे काम सकाळी अचानक सुरू झाल्याने वाहनधारकांना पहिल्यांदाच या  पुलावर ट्राॅफिक जामचा सामना करावा लागला. अजूनही या ठिकाणचे काम सुरू असून पुलावर दुहेरी वाहतूक विस्कळीत झाली आहे. दोन तासाहून अधिक वेळ वाहनांच्या रांगा काॅटेज हाॅस्पिटलपर्यंत लागल्या आहेत.तर सैदापूर परिसरात गजानन सोसायटी पर्यंत वाहतुक जाम झाली आहे.वहातुक शाखेचे कर्मचारी वहातुक सूरळीत करण्याचा प्रयत्न करीत असुन अद्याप ही ती सूरळीत झालेली नाही. दरम्यान जुन्या कृष्णा पुलावरील पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम सुरु केल्याने या पुलावरील वाहतूक कालपासून बंद आहे. सध्या या ठिकाणी दोन्ही बाजूला भराव टाकून डांबरीकरण करण्याचे कामास कालपासून सुरूवात झाली आहे.आज ही ते काम सुरू आहे.मात्र विद्दूत खांबावरील कामामुळे हे काम ही थांबले आहे.कालपासून नवीन पूलावरुन दूहेरी वाहतुक सूरू केली आहे.

कराड नगरपरिषदेकडून महिलांसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षणास सुरूवात...

Image
कराड नगरपरिषदेकडून महिलांसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षणास सुरूवात... कराड दि.31-महिला सक्षमीकरण व बालकल्याण उपक्रम राबविण्यासाठी कराड नगरपरिषदेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत अनेक संस्थांनी नगरपरिषदेमध्ये आपली नोंदणी केलेली आहे, तसेच अजून ही नोंदणी करण्याचे काम सूरू आहे. महिलांच्या कौटुंबिक आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या विविध संधी यातून शाश्वत उपजीविका निर्माण व्हावी यासाठी कराड नगरपरिषद महिला बालकल्याण विभाग व सिटी एज्युकेशन सोसायटी, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने खास कराड शहरातील महिला व मुलींसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले आहे. या उपक्रमाची सुरुवात दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ७ .०० वाजता नदी स्वच्छता अभियानातून केली जाणार आहे. संस्थेच्या माध्यमातून डाटा एन्ट्री आॕपरेटर, कापडी पिशवी बनवणे, परकर मेकिंग, केक मेकिंग, मसाला मेकिंग, बिस्किट मेकिंग, बिर्याणी मेकिंग, पापड  उद्योग, सेल्स ऐक्झिक्यूटिव्ह, ड्रेस मेकिंग इत्यादी प्रशिक्षण घेण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रशिक्षणासाठी प्रत्येकी 20 लाभार्थी असे एकूण 200 लाभार्थी यांची निवड संस्थेमार्फत केली...

राज्याची चिंता वाढली; कोरोना बाधित रुग्णांची मोठी वाढ तर आज 366 जण कोरोनामुक्त...

Image
  जिल्ह्यात एका ही बाधिताची नोंद नाही... कराड दि.31 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात आज एका ही कोरोना बाधिताची नोंद झाली नाही, आज एक जण कोरोनामुक्त झाला.जिल्ह्यात काल 239  जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या उपचारार्थ  2  रुग्ण आहे. राज्यात 711 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... महाराष्ट्रात आज 711 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून गेल्या चोवीस तासात 366 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या राज्यात 3 हजार 475 उपचारार्थ रुग्ण आहेत. आज मुंबईत 2 हजार 526, ठाणे 413 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.   देशात 2 हजार 338 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... भारतात गेल्या 24 तासात 2 हजार 338 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 2  हजार 134 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  सध्या देशात 17 हजार रुग्ण ॲक्टिव आहेत.  आज 19 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. 

कराड पालिकेचा बडया हस्तींसह विविध संस्थानी थकवला 9 कोटींचा कर...

Image
कराड पालिकेचा बडया हस्तींसह विविध संस्थानी थकवला 9 कोटींचा कर; थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करुन लिलाव... राजू सनदी, कराड टूडे दि.31: कराड नगरपालिकेचा मालमत्ता कर केवळ सामान्य नागरिकांनी नाही तर चक्क विविध संस्थासह सरकारी कार्यालयाकडून थकवला गेला आहे. 31 मार्च 2022 पूर्वीची तब्बल 9 कोटी रुपये थकबाकी पालिकेला अद्याप मिळालेली नसल्याने पालिकेला चांगलाच भुर्दंड बसला आहे. शहरातील बड्या हस्तींसह शासकीय कार्यालयांनी अद्याप मालमत्ता कर भरला नसल्याने नागरिकांसह विविध संस्था, सरकारी कार्यालयांची नावे अखेर नगरपालिकेने प्लेक्सद्वारे झळकवली आहेत. मात्र तरी ही थकीत कर न भरल्यास सुरुवातीला नळ कनेक्शन तोडण्यात येणार असून त्यानंतर मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. कराड नगरपालिकेचे 31 मार्च 2022 पर्यंत सुमारे 25 कोटी रुपये कर स्वरूपात मिळणे अपेक्षित होते. त्यामुळे पालिकेने मिळकत धारकांना आव्हान करत सूचना देत चांगल्या प्रकारे कर वसुली केली. तर कर न भरणाऱ्यांवर कारवाई करीत सुमारे 45 मिळकती सील करीत दीडशेहून अधिक नळ कलेक्शन तोडली होती. त्यानंतर मात्र काहीशी कर वसुली झाली, मात्र तरीही ही अने...

पेट्रोल पंपचालकांचा उद्या संप; महाराष्ट्रासह 19 राज्यांत आंदोलन...

Image
  पेट्रोल पंपचालकांचा उद्या संप; महाराष्ट्रासह 19 राज्यांत आंदोलन... मुंबई दि.30-फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनने विविध मागण्यांसाठी 31 मे रोजी पेट्रोल-डिझेल खरेदी बंद आंदोलनाची हाक दिली आहे. महाराष्ट्रासह देशातील 19 राज्यांत हे आंदोलन करण्यात येणार असून, उद्या खासगी पेट्रोल पंप कोरडे पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ३१ मे रोजी एकही पेट्रोल पंप कंपन्यांकडून इंधन खरेदी करणार नाही. यामुळे १ जून रोजी पेट्रोल, डिझेलची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. यामागे फामपेडाने अन्यायकारक कर कपात केल्याचे कारण दिले आहे.  पंपचालकांनी कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्या डिझेलमागे प्रति लीटर ३.५० रुपये आणि आणि पेट्रोलमागे प्रति लीटर ३.२५ रुपये कमिशन दिले जाते. हे कमिशन वाढलेल्या दरांच्या तुलनेत परवडत नाही, अशी ओरड पेट्रोल पंप मालकांची आहे. फेडरेशनच्या मते, ‘‘पेट्रोलियम डिलर्स वर्षांनुवर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी राबत आहेत. नोटाबंदीसारख्या आव्हानात्मक निर्णयात आम्ही शासनाला पूर्ण सहकार्य केले. त्यानंतर प्रशासकीय चौकशीला आम्हाला सामोरे जावे लागले. करोनाकाळातही आम्ही ...

मुंबई मध्ये सक्रिय रुग्णसंख्या दोन हजार पार, आज 2 हजार 238 नव्या रुग्णांची नोंद...

Image
  जिल्ह्यात एका ही बाधिताची नोंद नाही... कराड दि.30 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात आज एका ही कोरोना बाधिताची नोंद झाली नाही, आज एक जण कोरोनामुक्त झाला.जिल्ह्यात काल  36  जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या उपचारार्थ 2  रुग्ण आहे. एकूण चाचण्या-25 लाख 81 हजार 647 एकूण बाधित-2 लाख 78 हजार 557  एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 858 एकूण मृत्यू-6 हजार 685 सध्या उपचारार्थ रुग्ण-2 ------------------------------------------------ राज्यात 431 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... महाराष्ट्रात आज 431 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून गेल्या चोवीस तासात 297 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या राज्यात 3 हजार 131 उपचारार्थ रुग्ण आहेत. आज मुंबईत 2 हजार 238, ठाणे 393 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.   देशात 2 हजार 706 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... भारतात गेल्या 24 तासात 2 हजार 706 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 2  हजार 70 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  सध्या देशात 17 हजार 698 रुग्ण ॲक्टिव आहेत.  आज 14 कोरोना बाधित...

कृष्णा कारखान्याच्या मोफत घरपोच साखर वितरणास प्रारंभ;सभासदांना दिलासा......

Image
  कृष्णा कारखान्याच्या मोफत घरपोच साखर वितरणास प्रारंभ.... कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्ये नियोजनानुसार वितरण होणार; सभासदांना दिलासा... शिवनगर दि. 30 : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सभासदांना देण्यात येणाऱ्या मोफत घरपोच साखर वितरणाचा प्रारंभ करण्यात आला. कारखाना कार्यस्थळावर मान्यवरांच्या हस्ते साखर पोत्यांच्या वाहनांचे पूजन करण्यात आले. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्येक सभासदास दिली जाणारी प्रतिशेअर ६० किलो मोफत साखर घरपोच देण्याचे अभिवचन दिले होते. या अभिवचनाची वचनपूर्ती गेल्या वर्षी केली होती. यंदाही या मोफत घरपोच साखर वितरणाचा प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी कारखाना कार्यक्षेत्रातील कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक, वाळवा तालुक्यातील इस्लामपूर, तर कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे या गावात सभासदांना साखर वितरण करण्यात आले. कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये नियोजनानुसार मोफत घरपोच साखर वितरित केली जात आहे. प्रारंभी कारखाना कार्यस्थळावर संचालक बा...

कराडात ओबीसी संघटनेचे कचेरीसमोर जबाब दो आंदोलन...

Image
कराडात ओबीसी संघटनेचे कचेरीसमोर जबाब दो आंदोलन... कराड दि.30(प्रतिनिधी) ओबीसी सोबत होत असलेल्या धोकेबाजीच्या निषेधार्थ व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या कराड तालुक्याच्या वतीने आज येथील तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढून जबाब दो आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. केंद्र सरकारने 2021 जनगणना का केली नाही, ओबीसींची जातिनिहाय जनगणना का होत नाही, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खून कोणी केला, ओबीसींच्या आरक्षणाचे मारेकरी कोण कोण आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण गेल्यामुळे 65 हजार प्रतिनिधी सत्तेपासून वंचित राहिले. त्यांनी हे आरक्षण टिकण्यासाठी काय केले , आरक्षण गेले त्याला हे प्रतिनिधी जबाबदार नाहीत का, ओबीसींचा नवीन आयोग नेमून डाटा जमा करण्याचे नाटक राज्य सरकार करीत आहे, ओबीसींना आरक्षण शासनाच्या शासनाचे घटनेच्या माध्यमातून पाहिजे. राजकीय पक्षांचे आरक्षण घेऊन आम्हास पक्षाचे गुलाम का व्हायचे नाही, ओबीसींना घटनाबाह्य क्रीमिलिअरची अट्ट का लावली, लोकसंख्ये...

कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

Image
कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी... सातारा, दि. 30 : कोरोना महामारीने जगाला वेठीस धरले. महामारीत केंद्र आणि राज्य सरकारने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, कोरोना लसीकरण उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे प्राण वाचले. तरीही काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोविड-19 मुळे आई-वडील गमावलेल्या अनाथ मुलांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली.  पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत मुलांना देण्यात येणारा लाभ, सेवा तसेच कोविड 19 मुळे अनाथ झालेल्या बालकांशी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आभासी पद्धतीने (ऑनलाईन) संवाद साधला. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत दोन्ही पालक गमावलेल्या 18 वर्षाखालील बालकांना जिल्हाधिकारी शेखर सिंह तर 18 वर्षावरील बालकांना निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्या हस्ते पीएम केअर्सचे पासबुक आणि आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड वितरण करण्यात आले. यावेळी महिला व बाल विकास अधिकारी ...

कृष्णा'त रंगली बासरी आणि तबल्याची जुगलबंदी!

Image
  कराड : 'संगीत संध्या' कार्यक्रमात बासरी व तबल्याची जुगलबंदी सादर करताना तेजस व मिताली विंचूरकर... 'कृष्णा'त रंगली बासरी आणि तबल्याची जुगलबंदी! कराड, दि.30 : बासरी वादन आणि तबल्याची जुगलबंदी अशा अभिजात संगीताची अनुभूती रसिकांना मिळाली. निमित्त होते; कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठात आयोजित बासरी आणि तबला संगीत संध्या कार्यक्रमाचे. रसिकांनी या मैफिलीचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, पृथ्वीराज भोसले, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थपिका सौ. उत्तरा भोसले, सौ. गौरवी अतुल भोसले, श्री. विनायक भोसले, नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, सुनील पाटील यांच्यासह यांची प्रमुख उपस्थिती होती.  गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. 'दिल है छोटासा', 'मोह मोह के धागे', 'तूम मिले दिल खिले', 'रोजा जानेमन', 'माझे माहेर पंढरी', 'लग जा गले', 'बाहो में ...

देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, सक्रिय रुग्णांमध्ये वाढ....

Image
  जिल्ह्यात एका ही बाधिताची नोंद नाही... कराड दि.29 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात आज एका ही कोरोना बाधिताची नोंद झाली नाही, जिल्ह्यात काल किती  जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्याचा रिपोर्ट आला नाही. जिल्ह्यात सध्या उपचारार्थ  3  रुग्ण आहे. एकूण चाचण्या-25 लाख 81 हजार 521 एकूण बाधित-2 लाख 78 हजार 557  एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 857 एकूण मृत्यू-6 हजार 685 सध्या उपचारार्थ रुग्ण-3 ------------------------------------------------ राज्यात 550 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... महाराष्ट्रात आज 550 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून गेल्या चोवीस तासात 324 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या राज्यात 2 हजार 297 उपचारार्थ रुग्ण आहेत. आज मुंबईत 2 हजार 70, पुण्यात 354 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.   देशात 2 हजार 828 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... भारतात गेल्या 24 तासात 2 हजार 828 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 2  हजार 35 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  सध्या देशात 17 हजार 87 रुग्ण ॲक्टिव आहेत.  आज 33 कोरोना बाधि...

आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या सारख नेतृत्व जोपासले पाहिजे; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

Image
  आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या सारख नेतृत्व जोपासले पाहिजे; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन... देवघर बिबी येथील केरा नदीवरील पूलाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.... दौलतनगर दि. 29:-लोकप्रतिनिधी कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे आमदार अनिलभाऊ बाबर आहेत. सातत्याने मतदारसंघातील आपल्या लोकांच्या सार्वजनिक कामांसाठी मग पिण्याच्या पाण्याचा,शाळेचा रस्ते,पूलाचा प्रश्न असेल त्यासाठी सातत्याने त्याचा पाठपुरावा करणे आणि लोकांना दिलेला शब्द पूर्ण करणे यासाठी काम करणारं लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत, या सर्व लोकप्रतिनिधींमध्ये अनिल भाऊंच स्थान अग्रक्रमामध्ये आहेत.आपल्या समाजासाठी,आपल्या लोकांसाठी भाऊंनी जे प्रयत्न केले ते प्रयत्न आज या पूलाचे भूमिपूजन केल्यांनतर प्रत्यक्षात साकार झाले आहेत. भाऊंसारख्या लोकप्रतिनिधींच नेतृत्व जोपासले पाहिजे,अशा नेतृत्वाला पाठबळ दिले पाहिजे असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले. ते नाबार्ड योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या देवघर बिबी येथील केरा नदीवरील पुलाचे भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.यावेळी खानापूर विटा...

कराडचा नवीन कृष्णा पूल अखेर वाहतुकीस झाला खूला...पण......

Image
नवीन कृष्णा पूल अखेर वाहतुकीस झाला खूला...पण... कराड दि.29 (प्रतिनिधी) अखेर कराड विटा रोडवरील बहुचर्चित कृष्णा पूल आज पासून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. काल रात्री उशिरापर्यंत या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू होते. गुहागर-पंढरपूर या महामार्गाच्या रुंदीकरण कामात हा नवीन कृष्णा पूल कृष्णा नदीवर बांधण्यात आला आहे. गेली काही वर्ष या पुलाचे काम सुरू होते. कोरोना व पूर काळात काही काळ या पुलाचे काम रखडले होते, मात्र गतवर्षी या पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र पूलाच्या जोड रस्त्याचे काम रखडले होते. यामुळे जुन्या कृष्णा पुलावर दोन्ही बाजूला वाहतूक वेळोवेळी विस्कळीत होत होती. दरम्यान नवीन कृष्णा पुलावरून आज वाहतूक सुरू झाली असली तरी ही ती धोक्याची ठरते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुलाच्या जोड रस्त्यावर दोन्ही बाजूस संरक्षक लोखंडी ग्रील अद्याप बसवण्यात न आल्याने वाहनधारकांच्या साठी पुलाच्या दोन्ही बाजू धोकादायक बनणार आहेत. त्यामुळे तातडीने या पुलावर लाईट व्यवस्था व जोड रस्त्यावर दोन्ही बाजूस लोखंडी संरक्षक ग्रिल्स बसवणे गरजेचे आहे. सध्या या ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र र...

राज्यात आज प्रथमच आढळले बीए व्हेरियंटचे रुग्ण, सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या पाचशेपार....

Image
  जिल्ह्यात एका बाधिताची नोंद... कराड दि.28 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात आज एका कोरोना बाधिताची नोंद झाली, जिल्ह्यात काल  143  जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या उपचारार्थ 3 रुग्ण आहे. सातारा जिल्ह्यात आज झालेली बाधितांची वाढ तर कंसात आजपर्यंतची आकडेवारी जावली-0 (10666) कराड-1 (44618), खंडाळा- 0 (15913), खटाव- 0 (27931),   कोरेगाव-0 (23641), महाबळेश्वर-0 (5366), पाटण-0 (11264), फलटण-0 (40634), सातारा- 0 (60269), वाई-0 (17542), इतर-0 (3159) असे 1 व आजपर्यंत 2 लाख 78 हजार 557 बाधितांची संख्या झाली आहे. एकूण चाचण्या-25 लाख 81 हजार 521 एकूण बाधित-2 लाख 78 हजार 557  एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 857 एकूण मृत्यू-6 हजार 685 सध्या उपचारार्थ रुग्ण-3 ------------------------------------------------ राज्यात 529 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... महाराष्ट्रात आज 529 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून गेल्या चोवीस तासात 325 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या राज्यात 2 हजार 772 उपचारार्थ रुग्ण...

कारखान्यांनी ऊसाचा दूसरा हप्ता तातडीने द्यावा;बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन...

Image
  कारखान्यांनी ऊसाचा दूसरा हप्ता तातडीने द्यावा;बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन... कराड, दि. 28 (प्रतिनिधी) -सध्या सातारा जिल्ह्यामध्ये साखर कारखाने बंद झाले आहेत.चालू वर्षी कारखान्यांनी तीन हप्त्यामध्ये ऊसाचे बिल देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार पहिला हप्ता ऊस गेल्यानंतर मिळाला आहे. तर दुसरा हप्ता कारखाना बंद झाल्यानंतर देण्याचे ठरले असून त्याप्रमाणे आता कारखानदारांनी दुसरा हप्ता तातडीने द्यावा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखानदारांनी जाहीर केलेल्यानुसार कारखाना बंद झाल्यानंतर दुसरा हप्ता ऊस उत्पादकांना तातडीने देण्यात यावा. खरीप हंगामातील सध्या पेरणी तसेच शेतीच्या मशागतीसाठी खत, बियाणेसाठी पैशांची अत्यंत गरज आहे. अशावेळी हक्काचे पैसे न मिळाल्यास शेतकर्‍यांना सावकाराकडे हात पसरावयाची वेळ येते त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे दुसरे बिल त्यांच्या बँक खात्यावर तातडीने जमा करावे यासाठी आपण प्रयत्न करुन शेतकर्‍यांना न...

राज्यात सलग तिसर्‍या दिवशी बाधितांची मोठी वाढ; मुंबईत सर्वात जास्त बाधित रूग्ण.....

Image
  जिल्ह्यात एका बाधिताची नोंद... कराड दि.27 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात आज एका कोरोना बाधिताची नोंद झाली, जिल्ह्यात काल  180  जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या उपचारार्थ 2 रुग्ण आहे. सातारा जिल्ह्यात आज झालेली बाधितांची वाढ तर कंसात आजपर्यंतची आकडेवारी---- जावली-0 (10666) कराड-0 (44617), खंडाळा- 0 (15913), खटाव- 1 (27931), कोरेगाव-0 (23641), महाबळेश्वर-0 (5366), पाटण-0 (11264), फलटण-0 (40634), सातारा- 0 (60269), वाई-0 (17542), इतर-0 (3159) असे 1 व आजपर्यंत 2 लाख 78 हजार 556 बाधितांची संख्या झाली आहे. एकूण चाचण्या-25 लाख 81 हजार 378 एकूण बाधित-2 लाख 78 हजार 556  एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 857 एकूण मृत्यू-6 हजार 685 सध्या उपचारार्थ रुग्ण-2 राज्यात 536 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... महाराष्ट्रात आज 536 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून गेल्या चोवीस तासात 329 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या राज्यात 2 हजार 568 उपचारार्थ रुग्ण आहेत. आज मुंबईत 1 हजार 797, पुण्यात 308 रुग्ण अॅक्टीव्ह आ...

निरोगी आयुष्यासाठी ताणतणाव व्यवस्थापन आवश्यक : विनय गोसावी...

Image
  कृष्णा अभिमत विद्यापीठात आयोजित कार्यशाळेचे मार्गदर्शक विनय गोसावी यांचे स्वागत करताना सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, सौ. अश्विनी शेटे व अस्मिता देशपांडे... निरोगी आयुष्यासाठी ताणतणाव व्यवस्थापन आवश्यक : विनय गोसावी... कराड, दि.27 : बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी जीवनात ताणतणाव वाढत असल्याने, आजारांचे प्रमाणही वाढू लागले आहे. अशावेळी निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनात ताणतणाव व्यवस्थापन करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कार्पोरेट ट्रेनर विनय गोसावी यांनी केले. कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या मनुष्यबळ विभागाच्यावतीने  आयोजित 'तणाव व्यवस्थापन आणि कार्य व जीवन संतुलन' या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.  कार्यशाळेचे उदघाटन विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक कुलसचिव अस्मिता देशपांडे व कामगार कल्याण अधिकारी सौ. अश्विनी शेटे या प्रमुख उपस्थित होत्या. श्री. माशाळकर म्हणाले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी नेहमीच संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्या...

कराडच्या जून्या कोयना पूलावरुन हलक्या वाहनांच्या वाहतुकीस अखेर प्रारंभ....

Image
जून्या कोयना पूलावरुन हलक्या वाहनांच्या वाहतुकीस प्रारंभ.... कराड दि.27 (प्रतिनिधी) कराडच्या जुन्या कोयना पूलावरुन अखेर चारचाकी हलक्या वाहनांच्या वाहतुकीला आजपासून रीतसर सुरुवात करण्यात आली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या वाहतुकीचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून या जुन्या कोयना पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ता रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार होता. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून जुन्या कोयना फुलाची मजबुतीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर गेल्या दोन वर्षात या पुलाचे मजबुतीकरण करण्यात येऊन पूलाचे टेस्टिंग करण्यात आले होते. त्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम करण्यात आले. या पुलावरून चारचाकी हलक्या वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने कोल्हापूर नाका परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. आज सकाळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते जुन्या कोयना पूलावरील वरील हलक्या वाहनांच्या वाहतुकीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, इं...

राज्यात आज कोरोना बाधित रुग्णसंख्येत मोठी वाढ तर 324 रुग्ण झाले कोरोनामुक्त......

Image
जिल्ह्यात एका ही बाधिताची नोंद नाही... कराड दि.26 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात आज एका ही कोरोना बाधिताची नोंद झाली नाही, जिल्ह्यात काल  104  जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या उपचारार्थ एक रुग्ण आहे. एकूण चाचण्या-25 लाख 81 हजार 198 एकूण बाधित-2 लाख 78 हजार 555  एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 857 एकूण मृत्यू-6 हजार 685 सध्या उपचारार्थ रुग्ण-1 राज्यात 511 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... महाराष्ट्रात आज 511 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून गेल्या चोवीस तासात 324 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या राज्यात 2 हजार 361 उपचारार्थ रुग्ण आहेत. आज मुंबईत 1 हजार 658, पुण्यात 298 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.   देशात 2 हजार 628 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... भारतात गेल्या 24 तासात 2 हजार 628 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 2  हजार 167 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  सध्या देशात 15 हजार 100 रुग्ण ॲक्टिव आहेत.  आज 18 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. 

युवक काँग्रेसतर्फे प्रवक्ता निवडीसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन...

Image
  यूथ काँग्रेसतर्फे प्रवक्ता निवडीसाठी जिल्ह्यात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन... कराड दि.26 (प्रतिनिधी) प्रवक्ता निवडीसाठी युवक काँग्रेसतर्फे ‘यंग इंडिया के बोल’ या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले असून 35 वर्षांखालील युवकांनी 15 जूनपर्यंत ऑनलाईन नावनोंदणी करावी, असे आवाहन प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ता हनुमंत पवार यांनी आज कराड येथे पत्रकार परिषदेत केली.  सातारा जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजमध्ये याची माहिती नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे. अनुक्रमे पाच, चार आणि तीन हजार रुपयांचे बक्षिस आहे. उत्तेजनार्थ तीन बक्षिसे असून प्रत्येकी हजार रुपये असणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी आशा तीन भाषांत ही स्पर्धा असणार आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन स्तरांवर स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्याला त्या-त्या स्तरावरील प्रवक्ता टीममध्ये काम करण्याची संधी देणार आहे. केंद्र शासनाने दाबलेला आवाज पुढे आणण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून केला जात असून बेरोजगारी, महागाई अशा विषयांवर भाष्य करता येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची बाजू समाजासमोर आणि माध्यमांसमोर प...

संपूर्ण देशासह आज राज्यात कोरोना बाधितांची मोठी वाढ;देशात मंकीपाॅक्सचा रूग्ण नाही......

Image
जिल्ह्यात एका बाधिताची नोंद... कराड दि.25 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात आज एका कोरोना बाधिताची नोंद झाली, जिल्ह्यात काल  124  जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या उपचारार्थ एक रुग्ण आहे. सातारा जिल्ह्यात आज झालेली बाधितांची वाढ तर कंसात आजपर्यंतची आकडेवारी---- जावली-0 (10666) कराड-0 (44617), खंडाळा- 0 (15913), खटाव- 0 (27930), कोरेगाव-0 (23641), महाबळेश्वर-0 (5366), पाटण-0 (11264), फलटण-0 (40634), सातारा- 1 (60269), वाई-0 (17542), इतर-0 (3159) असे 1 व आजपर्यंत 2 लाख 79 हजार 229 बाधितांची संख्या झाली आहे. एकूण चाचण्या-25 लाख 81 हजार 84 एकूण बाधित-2 लाख 78 हजार 555  एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 857 एकूण मृत्यू-6 हजार 685 सध्या उपचारार्थ रुग्ण-1 राज्यात 470 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... महाराष्ट्रात आज 470 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून गेल्या चोवीस तासात 334 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या राज्यात 2 हजार 175 उपचारार्थ रुग्ण आहेत. आज मुंबईत 1 हजार 531, पुण्यात 288 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.   देशा...

सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ अॅप वापरण्याचे आवाहन....

Image
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ अॅप वापरण्याचे आवाहन.... सातारा, दि.  25:   मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडण्याचे प्रमाण लक्षात घेता जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालयाने तयार केलेले "दामिनी " अॅप वापरण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. संरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, कृषिसेवक, कोतवाल, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत संगणक परिचालक आणि नागरिकांना अॅपचा वापर करावा. "दामिनी" अॅप गुगल प्लेस्टोअरवर https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini  या लिंकवरुन डाऊनलोड करता येईल. या ॲपमध्ये जीपीएस स्थळाद्वारे वीज पडण्याच्या १५ मिनिटांपूर्वी स्थिती दर्शविण्यात येते.  अॅपमध्ये आपल्या सभोवतालीच्या परिसरात वीज पडण्याची सूचना प्राप्त होताच त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी स्थालंतरीत व्हावे. यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. गावा...

राज्यात आज सक्रिय रुग्ण दोन हजार पार तर 338 नव्या कोरोनाबाधितांची नोंद....

Image
  जिल्ह्यात एका ही बाधिताची नोंद नाही... कराड दि.24 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात आज एका ही कोरोना बाधिताची नोंद झाली नाही, जिल्ह्यात काल 106  जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या उपचारार्थ एक ही रुग्ण नाही. राज्यात 338 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... महाराष्ट्रात आज 338 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून गेल्या चोवीस तासात 276 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या राज्यात 2 हजार 39 उपचारार्थ रुग्ण आहेत. आज मुंबईत 1 हजार 430, पुण्यात 284 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.   देशात 1 हजार 675 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... भारतात गेल्या 24 तासात 1 हजार 675 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 2  हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत.  सध्या देशात 14 हजार 481 रुग्ण ॲक्टिव आहेत.  आज 31 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. 

खरीपाच्या पार्श्वभूमीवर खत विक्रेत्यांवर कृषि विभागाची कारवाई...

Image
खरीपाच्या पार्श्वभूमीवर खत विक्रेत्यांवर कृषि विभागाची कारवाई... कराड, दि.  24:  खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया खताच्या विक्रीत अनियमीतता केल्याचे निदर्शनास आल्याने तसेच जादा दराने डिएपी खताची विक्री केल्याने आणि खताची विक्री करताना पॉस मशिनचा वापर न करणे, पॉस मशिनवरील साठा व प्रत्यक्ष साठा, नोंदवहीतील साठा न जुळणे, शेतकऱ्यांना योग्य प्रकारे बिले न देणे यामुळे जिल्ह्यातील 11 दुकानांचे विक्री परवाने निलंबीत करण्यात आले आणि एका खत विक्रेत्याचा कायम स्वरुपी परवाना रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे. या कारवाईमध्ये कराड तालुक्यातील 3, फलटण तालुक्यातील 2, दहिवडी 2, वाई 2, सातारा तालुक्यातील 1, पाटण 1 या खत विक्रेत्यांचा समावेश आहे. पंचायत समितीस्तरावर व तालुका कृषि अधिकारी कार्यालयात निविष्टाबाबत तक्रार असल्यास ती नोंदविण्यासाठी तक्रार नोंदवही ठेवण्यात आली आहे. खरीप हंगामात कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी घ्यावयाच्या दक्षता, ठेवावयाचे अभिलेख यांचे मार्गदर्शन कृषी विभाग करत आहे. निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना योग्य सेवा न दिल्यास ...

कराड शहरातील धोकादायक होर्डिंगस काढण्यास प्रारंभ....

Image
  कराड शहरातील धोकादायक होर्डिंगस काढण्यास प्रारंभ.... कराड दि.24-(प्रतिनिधी) शहरातील कोल्हापूर नाका व शाहू चौकात असणाऱ्या भव्य होर्डिंगसह (कमान) शहरात विविध ठिकाणी असणारे व धोकादायक झालेली होर्डिंगस कराड नगरपालिकेने काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही  विनापरवाना होर्डिंगही काढण्यात येणार आहेत. कोल्हापूर नाक्यावरील व शाहू चौकातील मुख्य होर्डिंग हे दोन क्रेनच्या मदतीने काढण्यात आले.यावेळी वहातुक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती.नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.शहरातील सूमारे पन्नास धोकादायक, विनापरवाना तसेच नूतनीकरण न केलेल्या होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे.सबंधित होर्डिंगमालकांना यापूर्वीच नगरपरिषदेने नोटीस दिली आहे.

देशात 2 हजार 222 कोरोना बाधित रुग्णांची वाढ; तर 46 जणांचा मृत्यू......

Image
जिल्ह्यात एका ही बाधिताची नोंद नाही... कराड दि.23 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात आज एका ही कोरोना बाधिताची नोंद झाली नाही, जिल्ह्यात काल 59  जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या उपचारार्थ एक ही रुग्ण नाही. राज्यात 208 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... महाराष्ट्रात आज 208 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून गेल्या चोवीस तासात 133 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या राज्यात 1 हजार 978 उपचारार्थ रुग्ण आहेत. आज मुंबईत 1 हजार 370, पुण्यात 284 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.   देशात 2 हजार 222 कोरोना बाधित रुग्णांची वाढ... भारतात गेल्या 24 तासात 2 हजार 222 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 2  हजार 302 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  सध्या देशात 14 हजार 832 रुग्ण ॲक्टिव आहेत.  आज 46 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. 

कराडात विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावल्या प्रकरणी दोघां विरोधात पोलिसात गून्हा दाखल...

Image
          कराडात विनापरवाना फ्लेक्स बोर्ड काढताना नपा कर्मचारी... कराडात विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावल्या प्रकरणी दोघां विरोधात पोलिसात गून्हा दाखल... कराड दि.23 (प्रतिनिधी) कराड शहरात विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावल्या प्रकरणी कराड नगरपरिषदेने आज बनवडी येथील सचिन राऊत व मलकापूर येथील शिवानी देसाई यांच्या विरोधात कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसापासून कराड शहरात विविध ठिकाणी झाडावर, डिव्हायडर मधील झाडे व इलेक्ट्रिक खांबावर तसेच अन्य ठिकाणी विनापरवाना जाहिरात फ्लेक्स बोर्ड लावल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या सूचनेनुसार आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, वरिष्ठ मुकादम मारुती काटरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन विनापरवाना लावलेले फ्लेक्स बोर्ड काढून जप्त करीत कराड पोलिसात गून्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कराड शहरात कृष्णा नाका, विजय दिवस चौक, दत्त चौक, कोल्हापूर नाका, मुख्य बाजारपेठ, कृष्णाघाट या परिसरात अनेक विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते. मात्र हे जाहिरात फ्लेक्स बोर्ड कोणतीही परवान...