कराडच्या जून्या कोयना पूलावरुन हलक्या वाहनांच्या वाहतुकीस अखेर प्रारंभ....
कराड दि.27 (प्रतिनिधी) कराडच्या जुन्या कोयना पूलावरुन अखेर चारचाकी हलक्या वाहनांच्या वाहतुकीला आजपासून रीतसर सुरुवात करण्यात आली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या वाहतुकीचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून या जुन्या कोयना पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ता रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार होता.
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून जुन्या कोयना फुलाची मजबुतीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर गेल्या दोन वर्षात या पुलाचे मजबुतीकरण करण्यात येऊन पूलाचे टेस्टिंग करण्यात आले होते. त्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम करण्यात आले. या पुलावरून चारचाकी हलक्या वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने कोल्हापूर नाका परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
आज सकाळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते जुन्या कोयना पूलावरील वरील हलक्या वाहनांच्या वाहतुकीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, इंद्रजीत चव्हाण,मनोहर शिंदे, नामदेव पाटील, हिंदूराव पाटील, दिलीपभाऊ चव्हाण, बांधकाम विभागाचे अधिकारी,पोलिस अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते-Karad Today News by Raju Sanadi Karad
Comments
Post a Comment