राज्यात आज प्रथमच आढळले बीए व्हेरियंटचे रुग्ण, सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या पाचशेपार....
जिल्ह्यात एका बाधिताची नोंद...
कराड दि.28 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात आज एका कोरोना बाधिताची नोंद झाली, जिल्ह्यात काल 143 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या उपचारार्थ 3 रुग्ण आहे.
सातारा जिल्ह्यात आज झालेली बाधितांची वाढ तर कंसात आजपर्यंतची आकडेवारी जावली-0 (10666) कराड-1 (44618), खंडाळा- 0 (15913), खटाव- 0 (27931), कोरेगाव-0 (23641), महाबळेश्वर-0 (5366), पाटण-0 (11264), फलटण-0 (40634), सातारा- 0 (60269), वाई-0 (17542), इतर-0 (3159) असे 1 व आजपर्यंत 2 लाख 78 हजार 557 बाधितांची संख्या झाली आहे.
एकूण चाचण्या-25 लाख 81 हजार 521
एकूण बाधित-2 लाख 78 हजार 557
एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 857
एकूण मृत्यू-6 हजार 685
सध्या उपचारार्थ रुग्ण-3
------------------------------------------------
राज्यात 529 कोरोना बाधित रुग्णांची वाढ...
महाराष्ट्रात आज 529 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून गेल्या चोवीस तासात 325 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या राज्यात 2 हजार 772 उपचारार्थ रुग्ण आहेत. आज मुंबईत 1 हजार 929, पुण्यात 318 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.
देशात 2 हजार 685 कोरोना बाधित रुग्णांची वाढ...
भारतात गेल्या 24 तासात 2 हजार 685 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 2 हजार 158 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 16 हजार रुग्ण ॲक्टिव आहेत. आज 33 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
राज्यात नव्या व्हेरियंटचे रूग्ण आढळले....
राज्यात नव्या व्हेरियंटचे सात रुग्ण आढळले असून बी.ए.4 आणि बी.ए.5 या व्हेरियंटच्या रुग्णांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण पुणे शहरातील असून यामध्ये चार पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. सर्व रुग्णांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले असून फक्त नऊ वर्षाच्या लहान मुलांने बस घेतलेली नाही. मात्र सर्व रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून सर्व रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Comments
Post a Comment