कराड शहरातील धोकादायक होर्डिंगस काढण्यास प्रारंभ....
कराड शहरातील धोकादायक होर्डिंगस काढण्यास प्रारंभ....
कराड दि.24-(प्रतिनिधी) शहरातील कोल्हापूर नाका व शाहू चौकात असणाऱ्या भव्य होर्डिंगसह (कमान) शहरात विविध ठिकाणी असणारे व धोकादायक झालेली होर्डिंगस कराड नगरपालिकेने काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही विनापरवाना होर्डिंगही काढण्यात येणार आहेत. कोल्हापूर नाक्यावरील व शाहू चौकातील मुख्य होर्डिंग हे दोन क्रेनच्या मदतीने काढण्यात आले.यावेळी वहातुक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती.नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.शहरातील सूमारे पन्नास धोकादायक, विनापरवाना तसेच नूतनीकरण न केलेल्या होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे.सबंधित होर्डिंगमालकांना यापूर्वीच नगरपरिषदेने नोटीस दिली आहे.
Comments
Post a Comment