राज्याची चिंता वाढली; कोरोना बाधित रुग्णांची मोठी वाढ तर आज 366 जण कोरोनामुक्त...
जिल्ह्यात एका ही बाधिताची नोंद नाही...
कराड दि.31 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात आज एका ही कोरोना बाधिताची नोंद झाली नाही, आज एक जण कोरोनामुक्त झाला.जिल्ह्यात काल 239 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या उपचारार्थ 2 रुग्ण आहे.
राज्यात 711 कोरोना बाधित रुग्णांची वाढ...
महाराष्ट्रात आज 711 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून गेल्या चोवीस तासात 366 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या राज्यात 3 हजार 475 उपचारार्थ रुग्ण आहेत. आज मुंबईत 2 हजार 526, ठाणे 413 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.
देशात 2 हजार 338 कोरोना बाधित रुग्णांची वाढ...
भारतात गेल्या 24 तासात 2 हजार 338 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 2 हजार 134 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 17 हजार रुग्ण ॲक्टिव आहेत. आज 19 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.

Comments
Post a Comment