कारखान्यांनी ऊसाचा दूसरा हप्ता तातडीने द्यावा;बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन...
कारखान्यांनी ऊसाचा दूसरा हप्ता तातडीने द्यावा;बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन...
कराड, दि. 28 (प्रतिनिधी) -सध्या सातारा जिल्ह्यामध्ये साखर कारखाने बंद झाले आहेत.चालू वर्षी कारखान्यांनी तीन हप्त्यामध्ये ऊसाचे बिल देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार पहिला हप्ता ऊस गेल्यानंतर मिळाला आहे. तर दुसरा हप्ता कारखाना बंद झाल्यानंतर देण्याचे ठरले असून त्याप्रमाणे आता कारखानदारांनी दुसरा हप्ता तातडीने द्यावा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखानदारांनी जाहीर केलेल्यानुसार कारखाना बंद झाल्यानंतर दुसरा हप्ता ऊस उत्पादकांना तातडीने देण्यात यावा. खरीप हंगामातील सध्या पेरणी तसेच शेतीच्या मशागतीसाठी खत, बियाणेसाठी पैशांची अत्यंत गरज आहे. अशावेळी हक्काचे पैसे न मिळाल्यास शेतकर्यांना सावकाराकडे हात पसरावयाची वेळ येते त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे दुसरे बिल त्यांच्या बँक खात्यावर तातडीने जमा करावे यासाठी आपण प्रयत्न करुन शेतकर्यांना न्याय देण्याचे काम करावे असेही निवेदनात म्हंटले आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, उत्तमराव खबाले व इतर उपस्थित होते.
Comments
Post a Comment