कराड नगरपरिषदेकडून महिलांसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षणास सुरूवात...


कराड नगरपरिषदेकडून महिलांसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षणास सुरूवात...

कराड दि.31-महिला सक्षमीकरण व बालकल्याण उपक्रम राबविण्यासाठी कराड नगरपरिषदेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत अनेक संस्थांनी नगरपरिषदेमध्ये आपली नोंदणी केलेली आहे, तसेच अजून ही नोंदणी करण्याचे काम सूरू आहे.

महिलांच्या कौटुंबिक आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या विविध संधी यातून शाश्वत उपजीविका निर्माण व्हावी यासाठी कराड नगरपरिषद महिला बालकल्याण विभाग व सिटी एज्युकेशन सोसायटी, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने खास कराड शहरातील महिला व मुलींसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले आहे. या उपक्रमाची सुरुवात दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ७ .०० वाजता नदी स्वच्छता अभियानातून केली जाणार आहे.

संस्थेच्या माध्यमातून डाटा एन्ट्री आॕपरेटर, कापडी पिशवी बनवणे, परकर मेकिंग, केक मेकिंग, मसाला मेकिंग, बिस्किट मेकिंग, बिर्याणी मेकिंग, पापड  उद्योग, सेल्स ऐक्झिक्यूटिव्ह, ड्रेस मेकिंग इत्यादी प्रशिक्षण घेण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रशिक्षणासाठी प्रत्येकी 20 लाभार्थी असे एकूण 200 लाभार्थी यांची निवड संस्थेमार्फत केली जाणार आहे. उमेदवारांनी आपली नाव नोंदणी कराड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील कृष्णामाई महिला समुपदेशन केंद्रामध्ये करावी. अधिक माहितीसाठी व्यवस्थापक तथा समुपदेशक अधिकारी सौ. दिपाली दिवटे, समुपदेशक अधिकारी प्रमोद जगदाळे यांच्याशी संपर्क साधावा. 

व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दारिद्र रेषेखालील महिलांना दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान (Day NULM) विभागांतर्गत व्याज अनुदानासह वैयक्तिक व्यवसाय कर्ज रक्कम रूपये 2 लाखापर्यंत तसेच सामुहिक व्यवसाय कर्ज रक्कम रुपये 10 लाखापर्यंत उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांच्या मागणी निर्माण करण्यासाठी शहरी उपजीविका केंद्राची उभारणी प्रक्रिया सुरू आहे.

शहरातील महिलांनी सदर उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच अशासकीय संस्थांनी आपली नाव नोंदणी नगरपरिषदेकडे करून कराड शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये आपला सक्रीय सहभाग नोंदवावा असे आव्हान कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.

Comments

Post a Comment

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक