कृष्णा कारखान्याच्या मोफत घरपोच साखर वितरणास प्रारंभ;सभासदांना दिलासा......
कृष्णा कारखान्याच्या मोफत घरपोच साखर वितरणास प्रारंभ....
कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्ये नियोजनानुसार वितरण होणार; सभासदांना दिलासा...
शिवनगर दि. 30 : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सभासदांना देण्यात येणाऱ्या मोफत घरपोच साखर वितरणाचा प्रारंभ करण्यात आला. कारखाना कार्यस्थळावर मान्यवरांच्या हस्ते साखर पोत्यांच्या वाहनांचे पूजन करण्यात आले.
जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्येक सभासदास दिली जाणारी प्रतिशेअर ६० किलो मोफत साखर घरपोच देण्याचे अभिवचन दिले होते. या अभिवचनाची वचनपूर्ती गेल्या वर्षी केली होती. यंदाही या मोफत घरपोच साखर वितरणाचा प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी कारखाना कार्यक्षेत्रातील कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक, वाळवा तालुक्यातील इस्लामपूर, तर कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे या गावात सभासदांना साखर वितरण करण्यात आले. कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये नियोजनानुसार मोफत घरपोच साखर वितरित केली जात आहे.
प्रारंभी कारखाना कार्यस्थळावर संचालक बाजीराव निकम, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, वैभव जाखले, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील , सेक्रेटरी मुकेश पवार, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साखर पोत्यांच्या वाहनांचे पूजन करून वाहने रवाना करण्यात आली.
कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावामध्ये सोसायटीचे अध्यक्ष व्ही.के. मोहिते, माजी प.स सदस्य संजय पवार यांच्या हस्ते सभासदांना साखर पोत्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी सोसायटी संचालक प्रकाश धर्मे, राजेंद्र पवार, दिनकर सपकाळ, कृष्णत कापुरकर, रामभाऊ सातपुते, गणेश कदम, दत्तात्रय चव्हाण, श्रीपती हिवरे, जगन्नाथ बनसोडे, शरीफ कालेकर, आनंदा कापुरकर आदी उपस्थित होते.
वाळवा तालुक्यातील इस्लामपूरमध्ये संचालक संजय पाटील यांच्या हस्ते सभासदांना साखर पोत्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी सदाशिव पाटील, मारुती देसाई, प्रकाश शिंदे, बाळासाहेब जाधव ,गजेंद्र पाटील, प्रकाश पाटील,बबन पाटील, संजय पाटील,दिगंबर जाधव,नामदेव जाधव,रवी कुलकर्णी,संपतराव पाटील, कैलास पाटील व सभासद उपस्थित होते.
कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे गावांमध्ये संचालक बाबासो शिंदे यांच्या हस्ते सभासदांना साखर पोत्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी आत्माराम शिंदे, धोंडीराम कुरळे, दिनकर पाटील, निवास महिंद, पांडुरंग मोरे, राजेंद्र मोरे, वसंत शिरतोडे आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment