कराडच्या नवीन कृष्णा पूलावर ट्राॅफिक जाम;वाहनधारकांची कसरत सूरू...
कराडच्या नवीन कृष्णा पूलावर ट्राॅफिक जाम;वाहनधारकांची कसरत सूरू...
कराड दि.1 (प्रतिनिधी) येथील नवीन कृष्णा पूलावर आज पहिल्यांदाच ट्राफिक जाम झाले. पूलाच्या डाव्या बाजूस विद्युत खांबावरील ट्रांन्सफाॅर्मर नवीन खांबावर बसवण्याचे काम सकाळी अचानक सुरू झाल्याने वाहनधारकांना पहिल्यांदाच या पुलावर ट्राॅफिक जामचा सामना करावा लागला. अजूनही या ठिकाणचे काम सुरू असून पुलावर दुहेरी वाहतूक विस्कळीत झाली आहे. दोन तासाहून अधिक वेळ वाहनांच्या रांगा काॅटेज हाॅस्पिटलपर्यंत लागल्या आहेत.तर सैदापूर परिसरात गजानन सोसायटी पर्यंत वाहतुक जाम झाली आहे.वहातुक शाखेचे कर्मचारी वहातुक सूरळीत करण्याचा प्रयत्न करीत असुन अद्याप ही ती सूरळीत झालेली नाही.
दरम्यान जुन्या कृष्णा पुलावरील पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम सुरु केल्याने या पुलावरील वाहतूक कालपासून बंद आहे. सध्या या ठिकाणी दोन्ही बाजूला भराव टाकून डांबरीकरण करण्याचे कामास कालपासून सुरूवात झाली आहे.आज ही ते काम सुरू आहे.मात्र विद्दूत खांबावरील कामामुळे हे काम ही थांबले आहे.कालपासून नवीन पूलावरुन दूहेरी वाहतुक सूरू केली आहे.
Comments
Post a Comment