आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या सारख नेतृत्व जोपासले पाहिजे; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

 


आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या सारख नेतृत्व जोपासले पाहिजे;गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन...

देवघर बिबी येथील केरा नदीवरील पूलाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न....

दौलतनगर दि. 29:-लोकप्रतिनिधी कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे आमदार अनिलभाऊ बाबर आहेत. सातत्याने मतदारसंघातील आपल्या लोकांच्या सार्वजनिक कामांसाठी मग पिण्याच्या पाण्याचा,शाळेचा रस्ते,पूलाचा प्रश्न असेल त्यासाठी सातत्याने त्याचा पाठपुरावा करणे आणि लोकांना दिलेला शब्द पूर्ण करणे यासाठी काम करणारं लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत, या सर्व लोकप्रतिनिधींमध्ये अनिल भाऊंच स्थान अग्रक्रमामध्ये आहेत.आपल्या समाजासाठी,आपल्या लोकांसाठी भाऊंनी जे प्रयत्न केले ते प्रयत्न आज या पूलाचे भूमिपूजन केल्यांनतर प्रत्यक्षात साकार झाले आहेत. भाऊंसारख्या लोकप्रतिनिधींच नेतृत्व जोपासले पाहिजे,अशा नेतृत्वाला पाठबळ दिले पाहिजे असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

ते नाबार्ड योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या देवघर बिबी येथील केरा नदीवरील पुलाचे भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.यावेळी खानापूर विटा मतदार संघाचे आमदार अनिलभाऊ बाबर, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई,सुखदेव शितोळे,नगरसेवक दहावीर शितोळे,अमर शितोळे,माजी उपनगराध्यक्ष रमेश‍ शितोळे,विटा बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी,माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील,उत्तम चोथे,विनय भंडारे,शिवाजी हारुगडे,दाजी शितोळे,शंकर शितोळे,यशवंत शितोळे,शिवसेना शहराध्यक्ष राजू जाधव,माजी पंचायत समिती सभापती सौ.मुक्ताबाई माळी,माजी पंचायत समिती सदस्य सुरेश जाधव,विद्या शिंदे,विलास कुराडे,बबनराव माळी व विटा खानापूर मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ते बोलताना पुढ म्हणाले की, ज्या ज्या वेळी विटयाच्या दौऱ्यावर गेलो त्यावेळी अनिल भाऊंची सातत्याने देवघर पूलाच्या कामाची मागणी केली.सातत्याच्या मागणीमुळे भाऊंना या केरा नदीवरील नवीन पूलाच्या कामाचा शब्द दिला होता. मी मागच्या पंचवार्षिक पासून या कामाचा पाठपुरावा करत होतो. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे पुल मंजूर होण्यासाठी उशीर झाला. सातत्याने त्यांच्या डोक्यात विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच असतो.मतदारसंघातील लोकांना जे शब्द दिलेले आहेत ते कसे पूर्ण करायचे याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा असतो. देवघर पुलाच्या कामासाठी त्यांनी प्रचंड पाठपुरावा केला.मी राज्यमंत्री झाल्यानंतर अधिकाऱ्यांना देवघरचा पूल मंजूर करण्याच्या सातत्यने सुचना केल्या कारण भाऊंना दिलेला शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी होती. शितोळे परिवाराची श्रध्दा या श्री भैराबाचे देवावर आहे. कदाचित देवाच्याही मनात अस असेल की मी मंत्री असताना या पूलाच भूमिपूजन व्हाव.आज खऱ्या अर्थाने देवघर पुलाचे भूमिपूजन केल्यानंतर एका गोष्टीचे समाधान आहे की आमदार अनिलभाऊ बाबर व शितोळे परिवार यांनी केलेली मागणी पूर्ण झाली.तसेच यापुढेही सर्वांना सर्वोत्परी सहकार्य राहील असेही त्यांनी सांगीतले.

आमदार अनिलभाऊ बाबर म्हणाले की,देवघर येथील श्री भैरोबा देवाला दर्शनाकरीता ये-जा करताना केरा नदीमध्ये पूल नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत होती.त्यामुळे या ठिकाणी नवीन पूल व्हावा अशी शितोळे परिवाराने मागणी केली. भावनेच्या भारामध्ये या पूलाचे काम करणार अशा शब्द शितोळे परिवाराला दिल्यानंतर ना.शंभूराज देसाई यांचेकडे पुलाचे काम मंजूर होण्याकरीता विनंती केल्यानंतर ना.देसाई यांनी नाबार्ड योजनेअंतर्गत प्राधान्याने या देवघर पूलाचे काम प्रस्तावित करत कामाचा पाठपुरावा करण्यासाठी एका अधिकाऱ्याला जबाबदारी दिली.पाटण मतदार संघातील इतर कामांबरोबर या कामाला प्राधान्य देत शितोळे परिवाराच्या प्रेमाखातर या पूलाचे कामाला निधी मंजूर केला. आज त्याचे भूमिपूजन होत आहे.या गोष्टीचे निश्चित समाधान असून ना. शंभूराज देसाई यांनी फार मोठे सहकार्य केले आहे. त्यामुळे विटा खानापूर मतदारसंघातील तमाम जनतेच्यावतीने त्यांनी ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले. तसेच जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे श्री भैरोबा मंदिर परिसरामध्ये मोठे नुकसान झाले असून त्याचे पुनर्बांधणीसाठी निधी मंजूर करावा अशी विनंती त्यांनी यावेळी ना.शंभूराज देसाई यांचेकडे केली.

देवघर पूल हा पूल नसून भावनेचा पूल-आमदार अनिलभाऊ बाबर...

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यात अनेक पूल बांधले असतील नजीकच्या काळात अनेक पूल बांधतील. पण या पूलाला एक वैशिष्ट आहे.कारण शितोळे परिवाराच्या प्रेमाखातर या पूलाचे काम मंजूर केल्याने हा पुल नसून एक भावनेचा पूल आहे.शितोळे परिवाराचे कुलदैवत श्री भैरोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भावनेचा पूल बांधत असल्याने ना.शंभूराज देसाई यांनी सामाजिक कार्यात अनेक कामे केली असतील,परंतु त्यातील हे एक मोठ काम असून हा भावनेचा पूल बांधत असताना त्यांनी शितोळे परिवाराची मने जिंकली असल्याचे आमदार अनिलभाऊ यांनी यावेळी स्पष्ट केले.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक