Posts

Showing posts from January, 2025

जयवंत शुगर्सचा वजनकाटा अचूक....

Image
धावरवाडी : जयवंत शुगर्सच्या वजनकाट्याची तपासणी करताना शासकीय अधिकारी व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.   जयवंत शुगर्सचा वजनकाटा अचूक कराड, दि. 30 : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स कारखान्याच्या वजनकाट्याची जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार शासकीय भरारी पथकाने अचानक भेट देऊन तपासणी केली. त्यावेळी भरारी पथकाच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी, प्रत्येकवेळी जयवंत शुगर्सचा वजनकाटा अचूक असल्याचे सिद्ध झाले.  सातारा जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आदेश काढले आहेत. यानुसार निरीक्षण अधिकारी श्रीमती साहिला नायकवडे, कराडचे वजनमापे निरीक्षक योगेश अग्रवाल, विशेष लेखा परीक्षक एस. पी. शिंदे आणि एस. आर. सानप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तम साळुंखे, शरद जोशी शेतकरी संघटनेचे तात्यासो पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे सुनिल कोळी, बळीराजा शेतकरी संघटनेचे दिपक पाटील, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अशोक लोहार, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे विशाल पुस्तके यांनी संयुक्तपणे जयवंत शुगर्स कारखान्याला अचानक भेट देऊन...

कराड अर्बन बँकेला बेस्ट टर्नअराऊंड बँक पुरस्कार

Image
कराड अर्बन बँकेला बेस्ट टर्नअराऊंड बँक पुरस्कार कराड, दि. 30 (प्रतिनिधी) - दि. कराड अर्बन बँकेला बेस्ट टर्नअराऊंड बैंक पुरस्कार जाहीर झाला आहे. बँकोच्या वतीने सहकार क्षेत्रातील उत्तम कामगिरी तसेच सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क या रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्या बँकांनी बदलत्या नियमांचे पालन करीत आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा केली आहे अशा बँकांना हा पुरस्कार दिला जातो. बँकेच्या १०८ वर्षाच्या वाटचालीत या पुरस्कारामुळे आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला. बँकोच्या वतीने अॅम्बे व्हॅली, लोणावळा येथे बँको ब्लू रीबन २०२४ या कार्यक्रमात सदरचा पुरस्कार बँकेला प्रदान करण्यात आला. बँकेच्या भक्कम आर्थिक स्थितीमुळे रिझर्व्ह बँकेने मोबाईल बँकिंग, यूपीआय सेवेला परवानगी दिली. तसेच डिसेंबर २०२४ मध्ये नवीन शाखांना परवानगी मिळण्यासाठीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे सादर केला होता. या प्रस्तावास एका महिन्यात सकारात्मक प्रतिसाद देत रिझर्व्ह बँकेने हडपसर व चाकण जि. पुणे, शिरवळ जि. सातारा, इचलकरंजी जि. कोल्हापूर, नातेपुते जि. सोलापूर अशा नवीन पाच शाखांना सुद्धा परवानगी मिळाली आहे. त्या येत्या काळात लवकरच...

राज्यस्तरीय सामाजिक प्रेरणा पुरस्काराने अनिल गवळी यांचा गौरव

Image
कराड - मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय सामाजिक प्रेरणा पुरस्कार स्वीकारताना अनिल गवळी, समवेत इतर मान्यवर राज्यस्तरीय सामाजिक प्रेरणा पुरस्काराने अनिल गवळी यांचा गौरव  कराड, दि. 28 (प्रतिनिधी) - येथील बौद्ध वधू वर सूचक मंडळाकडून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कराड नगरपरिषदेच्या ड्रेनेज विभागाचे सुपरवायझर अनिल आप्पा गवळी यांना सन 2024-25 या वर्षाचा राज्यस्तरीय सामाजिक प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  कराड येथील बौद्ध वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष आयु. सुनील थोरवडे यांनी बौद्ध वधू वर सूचक मेळाव्याचे येथिल टाऊन हॉलमध्ये आयोजन केले होते. या मेळाव्यात सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार युवा नेते विजयसिंह यादव यांच्या हस्ते माजी नगरसेवक शांताराम थोरवडे, आनंदराव लादे, निशांत ढेकळे व मान्यवरांच्या उपस्थित गवळी यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.  अनिल गवळी हे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटनेच्या कराड नगरपरिषद शाखेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. नगर परिषदेमध्ये काम करत असतानाच त्यांनी सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमांमध्ये सहभागी...

अडीच टन ई-कचऱ्याचे कराडमध्ये संकलन करुन प्रजासत्ताक दिन साजरा

Image
अडीच टन ई-कचऱ्याचे कराडमध्ये संकलन प्रजासत्ताक दिनानिमित्त गांधी फाउंडेशन, कराड नगरपालिका व अन्य संस्थांचा उपक्रम कराड, दि. 27 (प्रतिनिधी) - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कराड शहर व परिसरात ई-कचरा संकलन (इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक वेस्ट) अभियान राबवण्यात आले. ३१ केंद्रांच्या माध्यमातून सुमारे अडीच टन ई-कचरा संकलनाचे काम करण्यात आले. गांधी फाउंडेशन, कराड नगरपालिका, पूर्णम एकोव्हिजन - पुणे, एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब, सुखायू फाउंडेशन, तसेच शासकीय अभियांत्रिकी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. छत्रपती शिवाजी हाऊसिंग सोसायटी गार्डनमधील ई-कचरा संकलन केंद्राचे उद्घाटन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात, शहरामध्ये आगामी काळात ई-कचऱ्याच्या समस्येबाबत आणखी समाजसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा व नगरपालिकेने त्यांना मदत करावी, असे आवाहन केले. याप्रसंगी मुख्याधिकारी शंकर खंदारे, गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गांधी, माजी नगरसेवक सौरभ पाटील, विजय वाटेगावकर, फारुख पटवेकर, पूर्णम फाउंडेशनचे भरत दामले, सुखायू फाउंडेशनचे डॉ. मिहीर वाचास...

कराडच्या कमला नेहरू ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा.

Image
  कराड: प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात बोलताना प्राचार्या डॉ. अनिता पोतदार व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सिताराम दीक्षित, रफिक भालदार व इतर मान्यवर. कमला नेहरू ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा. कराड, दि. 27 (प्रतिनिधी) येथील कमला नेहरू ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्या डॉ. अनिता पोतदार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिताराम दीक्षित, रफिक भालदार हे उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे कॉलेजच्या वतीने स्वागत करण्यात आले.  कराड: कमला नेहरू ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये ध्वजवंदन प्रसंगी मान्यवर. प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमात विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, सुगम गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण कॉलेजचे प्राचार्य व मार्गदर्शक प्रा. डॉ. घुगे सर, प्रा. शिंदे मॅडम, प्रा कसबे सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर ...

पोदारमध्ये प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा...

Image
  पोदारमध्ये प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा कराड, दि. 27 ( प्रतिनिधी)  पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७६वा प्रजासत्ताक दिन मान्यवर, शिक्षक वर्ग, पालक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कमांडर कैलास डोंबे उपस्थित होते. यावेळेस स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान शाळेत सर्व उपस्थितांकडून संविधान उद्देशिकेचे सामूहिक  वाचन करण्यात आले. त्यानंतर  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. राष्ट्रगीत व ध्वजगीत याचे गायन करून भारत मातेचा जयघोष करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेत केलेली भाषणे, देशभक्तीपर गीते व काही सांस्कृतिक कार्यक्रम देखील शाळेच्या वतीने घेण्यात आले. यावेळेस सर्व शिक्षकांनीही आपल्या गीत मंचातून वाद्यवृंदांच्या साथीने अनेक बहारदार देशभक्तीपर  गीते सादर केली. शाळेचे प्रमुख अतिथी कमांडर कैलास डोंबे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शिस्त हा विद्यार्थी जीवनाचा पाया असून...

कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई; अंतरराज्य आरोपींना सुर्ली व मुंबई येथुन अटक करुन डांबर चोरीचे रॅकेट केले उघड: 17 लाखाचा मुद्देमाल जप्त

Image
  कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई ; अंतरराज्य आरोपींना सुर्ली व मुंबई येथुन अटक करुन डांबर चोरीचे रॅकेट केले उघड: 17 लाखाचा मुद्देमाल जप्त कराड, दि. 27 (वार्ताहर) - सुर्ली ता. कराड येथील लिनोफ कंपनीच्या डांबर बॅचमिक्स कंपनीच्या डांबर प्लॅण्ट मधील प्लॅण्ट ऑपरेटर हे राजस्थान व मध्यप्रदेश येथिल कामगार आहेत. 24 जानेवारी रोजी मध्यरात्री टँकर मधुन डांबर चोरी करीत असताना वॉचमनला दिसले. त्याने आरडाओरड केला असता ते पळुन गेले व टेंकर सुध्दा निघुन गेला. त्याबाबत 2 लाख रुपये कंपनीचे अंदाजे 4 टन डांबर चोरीस गेलेबाबत तक्रारदार उदय धनाजीराव जाधव रा. सैदापुर यांनी पोलीसात तक्रार दिली होती.  उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व तालुका पोलीस पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस मार्गदर्शान करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पो. नि. जगताप यांना माहिती मिळाली की सदर चोरी करणारे परप्रांतीय कामगार हे त्यांचे बॅगा घेवुन त्यांचे मुळ गावी जाणेचे तयारीत आहेत. त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार यांनी सुर्ली भागातुन 3 आरोपी ता...

डॉ. अशोक गुजर यांना कराड गौरव पुरस्कार जाहीर

Image
  डॉ. अशोक गुजर यांना कराड गौरव पुरस्कार जाहीर कराड, दि. 25 (वार्ताहर) - येथील आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा कराड गौरव पुरस्कार यावर्षी शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉ. अशोक गुजर यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त एड. मानसिंगराव पाटील, ए एन मुल्ला, राजेंद्र माने, संभाजीराव पाटील उपस्थित होते. पंचवीस हजार रुपये रोख, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे विश्वस्त यांनी सांगितले. डॉ. अशोक गुजर यांनी विविध पदव्या संपादन केले असून डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्यूट तसेच डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कराडची स्थापना त्यांनी केली आहे. त्याचबरोबर टेक्निकल इन्स्टिट्यूट फार्मसी कराडची स्थापना ही त्यांनी केली आहे. 1981 पासून लायन्स क्लब मध्येही ते कार्यरत होते. राज्यस्तरावरील विविध वैद्यकीय शिबिरात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांना विविध...

निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळेच भाजप सरकार सत्तेत - पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

Image
निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळेच भाजप सरकार सत्तेत - पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल मुंबई, दि.25 : निवडणूक पारदर्शकपणे घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे मात्र अलीकडच्या काळात निवडणूक आयोग हा भाजपच्या इशाऱ्यावर चालत असून महाराष्ट्रातील भाजपा सरकार हे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळेच सत्तेवर आले आहे असा घणाघाती हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई येथे गांधी भवन या काँग्रेस च्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला यावेळी प्रोफेशनल काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती, माजी खासदार कुमार केतकर उपस्थित होते.  महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पक्षांतील 100 च्या वर उमेदवारांनी हाय कोर्टात याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला व त्यानुसारच सर्वांनी याचिका दाखल केली आहे.     लोकसभेच्या निकालावेळी काही आरोप केले नाहीत तर आताच का? या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, 2019 तें 2024 च्या लोकसभा निवडणूक पर्यंत 5 लाख मतदार वाढले परंतु त्यानंतर फक्त सहाच महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपर्यंत 48 लाख अधिक मतदार वाढले कसे? याला कोण जबाबदार? असे अचानक वाढलेले म...

कराड अर्बन बँकेचा १०८ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा

Image
  कराड अर्बन बँकेचा १०८ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा  कराड दि. 25 (प्रतिनिधी)  कराड अर्बन बँकेचा १०८ वा वर्धापन दिन सोहळा सत्यनारायण पुजेसह मोठ्या श्रध्देने आणि उत्साहात बँकेच्या मुख्य कार्यलयात साजरा करण्यात आला. पवित्र सत्यनारायण पुजा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच अर्बन बझार व स्व.डॉ.द.शि. एरम अपंग सहाय्य संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. जयश्री गुरव यांच्या हस्ते करण्यात आली. याच शुभप्रसंगी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या सुविद्य पत्नी व बँकेच्या संचालक सौ. रश्मी एरम यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे बँकेचे महाव्यवस्थापक (ट्रेझरी) श्री सलीम शेख यांना त्यांच्या सहकार क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण सहकार गुणवंत अधिकारी पुरस्कार २०२५ साठी जाहिर करण्यात आला आहे. आधुनिक युगातील पुर्ण पणे डिजिटलायज्ड व सायबर सुरक्षेने परिपुर्ण असलेल्या दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि., कराड बँकेस सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात आणखी पाच (५) नवीन शाखा सुरू करण्यास रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळाली ...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी भाजपा-महायुतीचे सरकार कटीबद्ध : आ. चित्रा वाघ

Image
कराड : भाजपा महिला मोर्चाच्यावतीने आयोजित हळदी-कुंकू समारंभात बोलताना आ. सौ. चित्रा वाघ.   महिलांच्या सक्षमीकरणासाठी भाजपा-महायुतीचे सरकार कटीबद्ध : आ. चित्रा वाघ कराड येथे भाजपा महिला मोर्चाच्यावतीने हळदी-कुंकू समारंभ उत्साहात कराड, दि. 25 : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला कल्याणाला प्रथम प्राधान्य देत, अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्याचधर्तीवर विविध योजना राबवून महाराष्ट्रातही मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा–महायुतीचे सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आ.सौ. चित्रा वाघ यांनी केले. कराड दक्षिण भाजपा महिला मोर्चाच्यावतीने आयोजित हळदी-कुंकू समारंभात त्या बोलत होते. कराड येथे आगमन झाल्यानंतर आ.सौ. वाघ यांचे कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांनी स्वागत केले. यानंतर हळदी-कुंकू सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना आ.सौ. वाघ म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात महिलांची प्रगती झाली पाहिजे, हे पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे धोरण आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम ...

स्टेट ट्रेडीशनल रेसलिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी गणेश पवार उर्फ गोल्डन मॅन यांची नियुक्ती...

Image
कराड : गणेश पवार यांना नियुक्ती पत्र देताना स्टेट ट्रेडीशनल रेसलिंग असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी, महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव बापूसाहेब घुले व कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप  स्टेट ट्रेडीशनल रेसलिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी गणेश पवार उर्फ गोल्डन मॅन यांची नियुक्ती कराड, दि. 24 (प्रतिनिधी) - स्टेट ट्रेडीशनल रेसलिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी कराड तालुक्याचे सुपुत्र गणेश पवार उर्फ गोल्डन मॅन यांची 2025 ते 2028 सालाकरीता निवड करण्यात आली. त्यांना स्टेट ट्रेडीशनल रेसलिंग असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी, महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव बापूसाहेब घुले व कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. गणेश पवार हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कराड तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान व्हावा या हेतूने गणेश पवार यांनी विश्वराज उद्योग समूहाच्या माध्यमातून ...

कराडला 26 जानेवारी रोजी ई कचरा संकलन मोहीम

Image
  कराडला 26 जानेवारी रोजी ई कचरा संकलन मोहीम गांधी फाउंडेशनचा पुढाकार; 23 रोजी जनजागृती रॅली कराड, दि. 22 (वार्ताहर) - येणाऱ्या चांगल्या भविष्यासाठी आजच नागरिकांनी जागृत होणे गरजेचे असून पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणास अनुकूल मार्गाने ई उपकरणांची विल्हेवाट लावणे गरजेचे असून त्या दृष्टीनेच कराड नगरपरिषद, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गांधी फाउंडेशन, पूर्णम फाउंडेशन, एनवायरो फ्रेंड्स नेचर क्लब यांच्या वतीने 26 जानेवारी रोजी 9 ते 1 या वेळेत कराड शहरात ई कचरा संकलन मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यानिमित्ताने गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी ई-कचरा संकलन जनजागृती रॅलीचे आयोजन केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी नगरपालिका आरोग्य विभागाचे देवानंद जगताप, पूर्णम फाउंडेशनचे अमोल कोडक, इंजीनियरिंग कॉलेजचे डॉ. कृष्णा अळसंदकर, जयदीप कुटे, एनवायरो फ्रेंड्स नेचर क्लबचे जालिंदर काशिद , सुखायू फाउंडेशनचे डॉ. मिहिर वाचासुंदर, छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुपचे ऍड. संभाजीराव मोहिते, निवृत्त अभियंता ए आर पवार उपस्थित ...

कृष्णा कारखाना महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनात ठरला अव्वल

Image
  कृष्णा कारखाना महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनात ठरला अव्वल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर; पुणे येथे लवकरच होणार वितरण कराड, दि. 21 (प्रतिनिधी) - पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सन २०२२-२३ या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याला जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे कृष्णा कारखाना सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनात महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे. साखर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेद्वारे पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा संस्थेतर्फे नुकतीच करण्यात आली. गेली १० वर्षे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखाना उत्कृष्ट वाटचाल करत आहे. कृष्...

घरफोडीतील गुन्हेगारास अटक करुन घरफोडीचा गुन्हा केला उघड

Image
घरफोडीतील गुन्हेगारास अटक करुन घरफोडीचा गुन्हा केला उघड कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई  कराड, दि. 21 (वार्ताहर) - कराड तालुक्यातील एकास घरफोडी व चोरी प्रकरणात 82 हजाराच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. सचिन आनंदा माने (वय 32) रा. तुळसण ता. कराड असे या आरोपीचे नाव आहे. कराड तालुका गुन्हे प्रकटगीकरण शाखेने ही कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, मोहित गुरव, प्रफुल्ल गाडे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचने नुसार कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना सांयकाळी पाचवड फाटा नारायणवाडी ता. कराड येथे पाचवडेश्वर मंदिराकडे जाणा-या रोडवर एक संशयीत इसम पोत्यात काहीतरी वस्तु लपवुन घेवुन जात असताना आढळून आला. पोलिसांनी इतिहास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याचे नजीक पोत्यात एक 36 इंच एलईडी टीव्ही मिळुन आला. पोलिसांनी त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्याने कराड तालुका हद्दीत घरपुडी व चोरी केल्याचे दाखल असलेल्या गुन्ह्यावरून दिसून आले. दरम्यान संशयतघ सचि...

सहकार क्षेत्रात मुळापासून सुधारणा आवश्यक -अशोकराव थोरात

Image
  सहकार क्षेत्रात मुळापासून सुधारणा आवश्यक -अशोकराव थोरात कराड येथे 19 रोजी राज्यस्तरीय सहकार परिषदेचे आयोजन कराड, दि. 16 (वार्ताहर) - महाराष्ट्रातील सहकाराची अधोगती थोपवण्यासाठी सहकार क्षेत्राबाबत प्रबोधन करणे गरजेचे असून या सहकार क्षेत्रात मुळापासून सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मत मळाई ग्रुपचे प्रमुख शेती मित्र अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले.  कराड येथे 19 जानेवारी रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय तिसरी सहकार परिषद आयोजित केली आहे त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  थोरात म्हणाले, गत दोन वर्षापासून मळाई ग्रुप मलकापूर कराड मधील सहकारी संस्था व कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्यविचार मंच यांनी संयुक्तपणे एक दिवसीय सहकार परिषद आयोजित करत आहे. याही वर्षी रविवार दिनांक 19 रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत, कराड अर्बन को ऑप.बँकेच्या शताब्दी सभागृहात या परिषदेचे आयोजन केले असून परिषदेस अर्बन ग्रुप व कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक प्रायोजक आहे.  भारतातील शेतकऱ्याला पतपुरवठा सहज व्हावा व ग्रामीण भागाचा व शेती क्षेत्राचा विकास करण्याच्या उ...

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रोजगार मेळाव्यात ६०० जणांना नियुक्ती पत्र

Image
  शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रोजगार मेळाव्यात ६०० जणांना नियुक्ती पत्र कराड, दि. 14 (प्रतिनिधी) - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड दद्वारे व बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (BOAT) च्या सहकार्याने आयोजित रोजगार मेळाव्यात सहाशे पेक्षा जास्त प्रत्यक्ष उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले.  या रोजगार मेळाव्यात शैक्षणिक संस्था आणि उ‌द्योग जगत यांच्यातील दरी भरून काढण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने करण्यात आला. अर्थपूर्ण संधी उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या अपेक्षित भविष्यासाठी सक्षम बनवता येईल. या कार्यक्रमाचे उदघाटन  बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग BOAT चे उपसंचालक एन. एन. वाडोदे, NCVET संचालक दिल्लीचे डॉ. सुहास देशमुख आणि संस्थेचे प्राचार्य डॉ. विनायक कुलकर्णी, यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. विनायक कुलकर्णी यांनी आयोजनात सहभागी असलेल्या सर्वांचे कौतुक केले. आणि रोजगार संधी उपलब्ध केल्याबद्दल सहभागी कंपन्यांचे उत्साही सहभागाब‌द्दल आभार मानले. योग्य व्यक्तींची नियुक्ती करण्यासाठी पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञा...

सियाल सलीम शेख याचे वाई फेस्टिव्हल २०२४ उत्कर्ष श्री आणि महाराष्ट्र शिवनेरी श्री २०२४ या दोन्हीही शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वोच्च यश

Image
सियाल सलीम शेख याचे वाई फेस्टिव्हल २०२४ उत्कर्ष श्री आणि महाराष्ट्र शिवनेरी श्री २०२४ या दोन्हीही शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वोच्च यश कराड, दि. 14 - वाई फेस्टिव्हल २०२४ यांच्या वतीने जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा उत्कर्ष श्री २०२४ महागणपती घाट, वाई येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सियाल सलीम शेख याने मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक व उत्कर्ष श्री २०२४ हा किताब पटकाविला. या यशाबद्दल त्याचे सर्वच क्षेत्रांमधून कौतुक होत आहे. इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन संलग्न महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा महाराष्ट्र शिवनेरी श्री जुन्नर २०२४ ही स्पर्धा शिवनेरी रोड, शिवनेरी फिटनेस बारव, जुन्नर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मेन्स फिजिक्स गटात सियाल सलीम शेख याने ५ वा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी झाले होते. सियाल सलीम शेख याचे मिळालेल्या यशाबद्दल दि. कराड अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सीए. दिलीप गु...

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

Image
मुंबई : कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या कृती आराखड्याबद्दल ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करताना आ.डॉ. अतुलबाबा भोसले. कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक   आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांची मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याशी मंत्रालयात चर्चा ३५ कोटींच्या निधीची मागणी; ना. गोरे यांनी प्रधान सचिवांना दिले प्रस्ताव सादर करण्याचे आदेश कराड, दि. 14 - कराड तालुका पंचायत समितीची नवी सुसज्ज प्रशासकीय इमारत साकारण्यासाठी आ. डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील आहेत. या अनुषंगाने त्यांनी गेल्या महिन्यात शासकीय अधिकाऱ्यांसमवेत श्री दैत्यनिवारणी देवी मंदिर परिसरातील प्रस्तावित जागेची पाहणी केली होती. या नव्या प्रस्तावित इमारतीसाठी ३५ कोटींच्या निधीची मागणी करत, आ.डॉ. भोसले यांनी आज मुंबईत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे नव्या इमारतीचा कृती आराखडा सादर केला. या आराखड्याबद्दल ग्रामविकास मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या प्रधान सचिवांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. करा...

सोनचिरैया शहरी उपजीविका केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा...

Image
सोनचिरैया शहरी उपजीविका केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा कराड, दि. 13 - दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत स्थापन झालेल्या सोनचिरैया शहरी उपजीविका केंद्राचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिजाई शहर स्तर संघ, कराड यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाला कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे, उपमुख्याधिकारी सुविधा पाटील, लेखापाल मयूर शर्मा, आस्थापना प्रमुख डॉ. अमोल जाधव, कर व प्रशासकीय अधिकारी सपना शेवाळे, कर व प्रशासकीय अधिकारी शितल कांजर, संगणक अभियंता अपर्णा महाजन, सौ. विभुते, आणि रणदिवे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय NULM अभियान व्यवस्थापक  गणेश जाधव, समुदाय संघटक सौ. अंजना कुंभार, महिला बालकल्याण विभाग समुपदेशक सौ. दिपाली दिवटे, तसेच जिजाई शहर संघाच्या अध्यक्ष सौ. सुषमा सोरटे व सचिव सौ. श्रद्धा हापसे आणि बचत गटांचे सर्व काम पाहणाऱ्या महिला सीआरपी (Community Resource Person) व व्यवस्थापक, लेखापाल व कर्मचारी वृंद यांचेही सहकार्य लाभले. सकाळी कार्यक्रमाची सुरुवात विधीवत पूजनाने झाली. या वेळी उपस्थित...

ग्रामीण विज्ञान प्रदर्शनातून घडतील उद्याचे बालवैज्ञानिक - प्रा डॉ . व्ही .एस .राव.

Image
  कराड येथील सायन्स कॉलेजमध्ये आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बक्षीस वितरण करताना या याशनी नागराजन व इतर ग्रामीण विज्ञान प्रदर्शनातून घडतील उद्याचे बालवैज्ञानिक - प्रा डॉ . व्ही .एस .राव.  कराडला ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप  कराड, दि. 9 -विज्ञान हा आजच्या आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग असून, मानवाला सर्व क्षेत्रात प्रगती साधून चांगले सहज जीवन जगण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता आहे. विज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा, सृजनशीलतेला, विकास होत असतो. देशाचे भवितव्य घडविणारे बालवैज्ञानिक अशाच प्रदर्शनातून पुढे येतील असा विश्वास कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ . व्ही एस राव यांनी व्यक्त केला. कराड येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या प्रमुख अध्यक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, शिवाजी शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी अल्ताफ हुसेन मुल्ला, शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर, तेजस गबंरे, दत्तात्रय गिरी हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. डॉ. राव पुढे म्हणाले की,...

कराड तालुका पोलीस स्टेशन मध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची धाव

Image
   'रायझिंग डे' हा सप्ताह निमित्त शाळकरी विद्यार्थ्यांनी कराड तालुका पोलीस स्टेशनला भेट देत घेतली माहिती पोलीस स्टेशन मधील कामकाज पाहून विद्यार्थी भारावले कराड, दि. 8 - 'रायझिंग डे' हा सप्ताह निमित्त कराड तालुक्यातील श्री. केदार हायस्कूल सुपने व तारांगण इंग्लिश मीडियम स्कूल विंग माध्यमिक विभाग या शाळेतील विद्यार्थ्यांनी कराड तालुका पोलीस स्टेशनमध्ये भेट देऊन पोलीस स्टेशन मधील कामकाज कसे चालते याबद्दल माहिती घेतली. तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप व विविध विभागातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी आपआपल्या विभागातील माहिती या आलेल्या विद्यार्थ्यांना सविस्तरपणे दिली. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडू, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या  मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी समाजात वाढणारी बालगुन्हेगारी, सोशल मीडियाचा दुष्परिणाम, सायबर क्राईम, फसवणूक , बालक व स्त्रियांवर होणारे वाढते अत्याचार, मोबाईल गेमिंग, अल्पवयीन वयातील रिलेशनशिप यांचा वास्तविक जीवना...