डॉ. अशोक गुजर यांना कराड गौरव पुरस्कार जाहीर

 


डॉ. अशोक गुजर यांना कराड गौरव पुरस्कार जाहीर

कराड, दि. 25 (वार्ताहर) - येथील आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा कराड गौरव पुरस्कार यावर्षी शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉ. अशोक गुजर यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त एड. मानसिंगराव पाटील, ए एन मुल्ला, राजेंद्र माने, संभाजीराव पाटील उपस्थित होते.

पंचवीस हजार रुपये रोख, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे विश्वस्त यांनी सांगितले.

डॉ. अशोक गुजर यांनी विविध पदव्या संपादन केले असून डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्यूट तसेच डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कराडची स्थापना त्यांनी केली आहे. त्याचबरोबर टेक्निकल इन्स्टिट्यूट फार्मसी कराडची स्थापना ही त्यांनी केली आहे. 1981 पासून लायन्स क्लब मध्येही ते कार्यरत होते. राज्यस्तरावरील विविध वैद्यकीय शिबिरात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांना विविध पुरस्कार मिळाले असून बेस्ट लाइन्स क्लब प्रेसिडेंट पुरस्कार, राज्यस्तरीय हुतात्मा गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय सह्याद्री गौरव पुरस्कार, जीवनगौरव यशवंत पुरस्कार, वीर रत्न पुरस्कार यांचा समावेश आहे.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक