शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रोजगार मेळाव्यात ६०० जणांना नियुक्ती पत्र
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रोजगार मेळाव्यात ६०० जणांना नियुक्ती पत्र
कराड, दि. 14 (प्रतिनिधी) - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड दद्वारे व बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (BOAT) च्या सहकार्याने आयोजित रोजगार मेळाव्यात सहाशे पेक्षा जास्त प्रत्यक्ष उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या रोजगार मेळाव्यात शैक्षणिक संस्था आणि उद्योग जगत यांच्यातील दरी भरून काढण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने करण्यात आला. अर्थपूर्ण संधी उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या अपेक्षित भविष्यासाठी सक्षम बनवता येईल.
या कार्यक्रमाचे उदघाटन बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग BOAT चे उपसंचालक एन. एन. वाडोदे, NCVET संचालक दिल्लीचे डॉ. सुहास देशमुख आणि संस्थेचे प्राचार्य डॉ. विनायक कुलकर्णी, यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. विनायक कुलकर्णी यांनी आयोजनात सहभागी असलेल्या सर्वांचे कौतुक केले. आणि रोजगार संधी उपलब्ध केल्याबद्दल सहभागी कंपन्यांचे उत्साही सहभागाबद्दल आभार मानले.
योग्य व्यक्तींची नियुक्ती करण्यासाठी पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, बांधकाम, उर्जा, पर्यटन व इतर क्षेत्रातील १०० पेक्षा जास्त प्रतिष्ठित कंपन्यांनी व ३०० पेक्षा जास्त प्रतिनिधी यांनी संस्थेला भेट दिली. या मेळाव्यात ३५०० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते. मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही, मेळावा निर्दोषपणे सूक्ष्म-स्तरीय नियोजनासह आयोजित करण्यात आला. या अत्यंत यशस्वी मेळाव्यात विविध पदविका, पदवी, आय.टी.आय. बी. कॉम, बी.एस.सी, बी. फार्मसी. अशा क्षेत्रातील ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्रे सुपूर्त करण्यात आली, तर १००० पेक्षा जास्त संधी विचाराधीन आहेत.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची आयोजन समिती त्यामध्ये विविध विभागाचे प्राध्यापक विद्यार्थी आणि NCC, NSS, डिफेन्स क्लब आणि MESCO सिक्युरिटी मधील सर्व स्वयंसेवक यांचा समावेश होता. सहभागी कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी संस्थेच्या उत्कुष्ट व्यवस्थापन आणि प्राध्यापक आणि विद्यार्थी समन्वयकांच्या सामाजिक वृत्तीचे कौतुक केले. मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कॅम्पसमधील उत्कृष्ट सुविधा, कार्यक्षम व्यवस्थापन आणि आश्वासक वातावरणाचे कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली.
या रोजगार मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी विविध संस्थांनी, माध्यमातील सर्व सदस्य तसेच आस्थापनांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानले. अशी माहिती संस्थेच्या डिन प्रा.उमा पाटील यांनी दिली.




Comments
Post a Comment