घरफोडीतील गुन्हेगारास अटक करुन घरफोडीचा गुन्हा केला उघड
घरफोडीतील गुन्हेगारास अटक करुन घरफोडीचा गुन्हा केला उघड
कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
कराड, दि. 21 (वार्ताहर) - कराड तालुक्यातील एकास घरफोडी व चोरी प्रकरणात 82 हजाराच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. सचिन आनंदा माने (वय 32) रा. तुळसण ता. कराड असे या आरोपीचे नाव आहे. कराड तालुका गुन्हे प्रकटगीकरण शाखेने ही कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, मोहित गुरव, प्रफुल्ल गाडे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचने नुसार कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना सांयकाळी पाचवड फाटा नारायणवाडी ता. कराड येथे पाचवडेश्वर मंदिराकडे जाणा-या रोडवर एक संशयीत इसम पोत्यात काहीतरी वस्तु लपवुन घेवुन जात असताना आढळून आला. पोलिसांनी इतिहास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याचे नजीक पोत्यात एक 36 इंच एलईडी टीव्ही मिळुन आला. पोलिसांनी त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्याने कराड तालुका हद्दीत घरपुडी व चोरी केल्याचे दाखल असलेल्या गुन्ह्यावरून दिसून आले.
दरम्यान संशयतघ सचिन माने याने घरफोडी-चोरी सारखा गंभीर गुन्हा केल्याचे कबुल केलेने त्यास अटक करुन त्याचेकडुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली सायकल, गॅस टाकी व शेगडी तसेच शिलाईमशीन व एलईडी 2 टीव्ही व रोख रक्कम 1470/ असे एकुण घरफोडीतील 82,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार उत्तम कोळी हे करीत आहेत.
वरील कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप कराड तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अमित बाबर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, मोहित गुरव, प्रफुल्ल गाडे, यांनी केली आहे.
सोबत फोटो कराड : घोरपडी व चोरी प्रकरणातील आरोपी व मुद्देमाला समवेत कराड तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी.

Comments
Post a Comment