सोनचिरैया शहरी उपजीविका केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा...


सोनचिरैया शहरी उपजीविका केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कराड, दि. 13 - दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत स्थापन झालेल्या सोनचिरैया शहरी उपजीविका केंद्राचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिजाई शहर स्तर संघ, कराड यांच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाला कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे, उपमुख्याधिकारी सुविधा पाटील, लेखापाल मयूर शर्मा, आस्थापना प्रमुख डॉ. अमोल जाधव, कर व प्रशासकीय अधिकारी सपना शेवाळे, कर व प्रशासकीय अधिकारी शितल कांजर, संगणक अभियंता अपर्णा महाजन, सौ. विभुते, आणि रणदिवे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय NULM अभियान व्यवस्थापक  गणेश जाधव, समुदाय संघटक सौ. अंजना कुंभार, महिला बालकल्याण विभाग समुपदेशक सौ. दिपाली दिवटे, तसेच जिजाई शहर संघाच्या अध्यक्ष सौ. सुषमा सोरटे व सचिव सौ. श्रद्धा हापसे आणि बचत गटांचे सर्व काम पाहणाऱ्या महिला सीआरपी (Community Resource Person) व व्यवस्थापक, लेखापाल व कर्मचारी वृंद यांचेही सहकार्य लाभले.

सकाळी कार्यक्रमाची सुरुवात विधीवत पूजनाने झाली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या स्वयंरोजगार व सक्षमीकरणासाठी केंद्राच्या महत्त्वपूर्ण योगदानाची माहिती मांडली. जिजाई शहर स्तर संघाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि उपक्रमांबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

जिजाई शहर स्तर संघामार्फत महिलांसाठी कौशल्यविकास कार्यशाळा - ज्यामध्ये हातमाग, हस्तकला, खाद्यपदार्थ निर्मिती यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. त्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे - महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे विक्रीतून आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी मदत केली जाते.व्यावसायिक प्रशिक्षण आणि कर्जसुविधा - महिलांना लघु उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन व आर्थिक साहाय्य पुरवले जाते.समाजसुधारणेची दिशा - महिलांच्या सक्षमीकरणातून संपूर्ण कुटुंब व समाज उन्नती साधण्याचा प्रयत्न, या प्रकारच्या व इतर अनेक सुविधा देण्यात येत आहेत 

महिलांनी सादर केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, ज्यामध्ये हस्तकलेच्या वस्तू, पारंपरिक खाद्यपदार्थ, सजावटीच्या वस्तू, आणि स्वयंपाकाच्या साहित्यांचा समावेश होता. महिलांनी तयार केलेल्या या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उल्लेखनीय प्रयत्न केला गेला.

प्रदर्शना दरम्यान वस्तू विक्रीसाठी शोकेसचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांना अधिक प्रमाणात व्यवसायिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या शेवटी जिजाई शहर स्तर संघाचे व्यवस्थापक श्री. श्रीकांत यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे व बचत गट सदस्यांचे कौतुक केले. कराडमधील हा वर्धापन दिन महिला सक्षमीकरण आणि सामाजिक प्रगतीच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल ठरला आहे. 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक