स्टेट ट्रेडीशनल रेसलिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी गणेश पवार उर्फ गोल्डन मॅन यांची नियुक्ती...

कराड : गणेश पवार यांना नियुक्ती पत्र देताना स्टेट ट्रेडीशनल रेसलिंग असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी, महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव बापूसाहेब घुले व कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप 

स्टेट ट्रेडीशनल रेसलिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी गणेश पवार उर्फ गोल्डन मॅन यांची नियुक्ती

कराड, दि. 24 (प्रतिनिधी) - स्टेट ट्रेडीशनल रेसलिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी कराड तालुक्याचे सुपुत्र गणेश पवार उर्फ गोल्डन मॅन यांची 2025 ते 2028 सालाकरीता निवड करण्यात आली. त्यांना स्टेट ट्रेडीशनल रेसलिंग असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी, महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव बापूसाहेब घुले व कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

गणेश पवार हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कराड तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान व्हावा या हेतूने गणेश पवार यांनी विश्वराज उद्योग समूहाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे पत्रकांरासाठी कार्यक्रम घेत असतात. यावेळीही त्यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधत पाचवड फाटा येथील विश्वराज हॉटेल येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्टेट ट्रेडीशनल रेसलिंग असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी, महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव बापूसाहेब घुले व कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत गणेश पवार यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप म्हणाले, गणेश पवार यांनी अगदी कमी वेळात पत्रकारांसाठी केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. ते नेहमीच समाजकार्यात पुढे असतात. त्यांना खेळाची आवड आहे. आणि ते नॅशनल, इंटरनॅशनल पर्यंत खेळाडू घेऊन गेलेले आहेत. त्यांच्याकडून भावी पिढीला शिकण्यासारखे खूप आहे.

यावेळी गणेश पवार यांनी आभार व्यक्त करताना त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी 2003 ते 2010 पर्यंत रोटरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर 2010 ते 2017 पर्यंत किक बॉक्सिंग बेल्ट रेसलिंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिल्याचे सांगितले. तसेच 2003 ते 2017 पर्यंत सातारा जिल्ह्यातून अडीच हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांनी खेळाडू तयार केले असल्याचेही यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल परीट यांनी केले. कार्यक्रमास पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व गणेश पवार मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक