कराडच्या कमला नेहरू ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा.
कराड: प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात बोलताना प्राचार्या डॉ. अनिता पोतदार व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सिताराम दीक्षित, रफिक भालदार व इतर मान्यवर.
कमला नेहरू ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा.
कराड, दि. 27 (प्रतिनिधी) येथील कमला नेहरू ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्या डॉ. अनिता पोतदार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिताराम दीक्षित, रफिक भालदार हे उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे कॉलेजच्या वतीने स्वागत करण्यात आले.
कराड: कमला नेहरू ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये ध्वजवंदन प्रसंगी मान्यवर.
प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमात विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, सुगम गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण कॉलेजचे प्राचार्य व मार्गदर्शक प्रा. डॉ. घुगे सर, प्रा. शिंदे मॅडम, प्रा कसबे सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर फनी गेम्स, क्रिकेट स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा स्पर्धांचा बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे सिताराम दीक्षित व रफिक भालदार यांच्या हस्ते करण्यात आले.
कराड: प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात निलोफर भालदार या विद्यार्थिनीला कमला रत्न पुरस्कार देऊन सन्मान करताना प्राचार्या डॉ. अनिता पोतदार
दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही विद्यार्थिनींनी सीईटी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांना कमलारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये निलोफर भालदार, सबा संदे, विद्या मोहिते, आसमा मुलाणी या मुलींचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह पालकांची ही उपस्थिती होती.
कराड : प्रमुख पाहुणे रफिक भालदार यांच्या हस्ते कॉलेजच्या विद्यार्थिनींचा कमलरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.




Comments
Post a Comment