राज्यस्तरीय सामाजिक प्रेरणा पुरस्काराने अनिल गवळी यांचा गौरव
कराड - मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय सामाजिक प्रेरणा पुरस्कार स्वीकारताना अनिल गवळी, समवेत इतर मान्यवर
राज्यस्तरीय सामाजिक प्रेरणा पुरस्काराने अनिल गवळी यांचा गौरव
कराड, दि. 28 (प्रतिनिधी) - येथील बौद्ध वधू वर सूचक मंडळाकडून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कराड नगरपरिषदेच्या ड्रेनेज विभागाचे सुपरवायझर अनिल आप्पा गवळी यांना सन 2024-25 या वर्षाचा राज्यस्तरीय सामाजिक प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कराड येथील बौद्ध वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष आयु. सुनील थोरवडे यांनी बौद्ध वधू वर सूचक मेळाव्याचे येथिल टाऊन हॉलमध्ये आयोजन केले होते. या मेळाव्यात सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार युवा नेते विजयसिंह यादव यांच्या हस्ते माजी नगरसेवक शांताराम थोरवडे, आनंदराव लादे, निशांत ढेकळे व मान्यवरांच्या उपस्थित गवळी यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
अनिल गवळी हे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटनेच्या कराड नगरपरिषद शाखेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. नगर परिषदेमध्ये काम करत असतानाच त्यांनी सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत आपले योगदान दिले आहे. याची दखल घेऊन बौद्ध वधू वर सूचक मंडळाकडून गवळी यांचा सामाजिक प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
दरम्यान या वधु वर सुचक मेळाव्यास राज्य वरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने वधू वर या मेळाव्यात उपस्थित होते या सर्वांचे स्वागत बौद्ध वधू वर सूचक मंडळाकडून करण्यात आले. त्याचबरोबर या मेळाव्यास शहरातील मान्यवरांनी भेट देऊन कार्यक्रमात सहभाग घेतला.

Comments
Post a Comment