Posts

Showing posts from September, 2025

कराड दक्षिण मधील साठवण बंधाऱ्यांच्या उभारणीसाठी 64 लाख 36 हजारांचा निधी मंजूर

Image
कराड दक्षिण मधील साठवण बंधाऱ्यांच्या उभारणीसाठी 64 लाख 36 हजारांचा निधी मंजूर कराड, दि. 30 : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात साठवण बंधाऱ्यांच्या उभारणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून एकूण ६४ लाख ३६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून लवकरच नांदगाव, विंग आणि शेवाळवाडी (येवती) येथे साठवण बंधाऱ्यांची उभारणी केली जाणार आहे.  कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काही भागात दरवर्षी पाण्याअभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमधून साठवण बंधाऱ्यांची मागणी होत होती. याची दखल घेत, आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा करत, साठवण बंधाऱ्यांच्या उभारणीसाठी निधीची मागणी केली होती.  त्यानुसार नांदगाव (१३.६५ लाख), विंग (१५.६१ लाख) आणि शेवाळवाडी (३५.१० लाख) येथे साठवण बंधाऱ्यांची उभारणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागामार्फत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या साठवण बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यातील पाणी साठवून ठेवता येणार असून, शेतकऱ्यांना सिं...

पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी एक दिलाने कार्यरत राहावे: ॲड. उंडाळकर

Image
कराड शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश प्रसंगी ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर,संजय देसाई, राजेश पाटील वाठारकर, विजय यादव, सुनील पाटील, प्रा.धनाजी काटकर,राजेंद्र खोत व इतर मान्यवर. पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी एक दिलाने कार्यरत राहावे: ॲड. उंडाळकर  कराड दि : 28 - कराड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी पक्ष वाढीसाठी एक दिलाने कार्यरत असून कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही  ठाम   उभे आहोत आपण सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने कार्यरत राहून राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करूया असे आवाहन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी केले. कराड सर्किट हाऊस येथे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात कराड शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी उंडाळकर बोलत होते. राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा  कार्याध्यक्ष संजय देसाई, राजेश पाटील वाठारकर, कराड शहर राष्ट्रवादी नेते विजय यादव, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, प्रा. धनाजी काटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पक्ष...

कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतुन गहाळ / चोरीस गेलेले 7 लाख रुपये किंमतीचे एकुण 22 मोबाईल तक्रारदार यांना केले परत

Image
कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतुन गहाळ / चोरीस गेलेले 7 लाख रुपये किंमतीचे एकुण 22 मोबाईल तक्रारदार यांना केले परत . डी.बी. पथका कडुन सन 2025 मध्ये आतापर्यंत 12 लाख रुपये किंमतीच्या एकुण 60 मोबाईलचा शोध. कराड, दि. 27 - पोलीस अधीक्षक तुषार दोषी तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सी.ई. आय. आर. पोर्टलद्वारे पोलीस स्टेशन हद्दीतील तक्रारदार यांचे गहाळ झालेले मोबाईल फोन शोध घेणेबाबत मिंटीग घेवुन सुचना दिल्या होत्या त्यांचे मार्गदर्शानाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप कराड तालुका पोलीस ठाणे यांचे सुचनेनुसार कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार यांनी कर्नाटक राज्यातुन तसेच महाराष्ट्रातील कोल्हापुर, ओरगाबाद, नाशिक, अहमदनगर, सोलापुर, पुणे जिल्ह्यातुन तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती घेवुन मोबाईल फोन प्राप्त केले असुन आज दि. 27/09/2025 रोजी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे हस्ते 22 तक्रारदार यांना 7 लाख रुपये किंमतीचे मोबाईल फोन परत करण्यात आले असुन मोबाईल फोन ...

संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते;प्रा.डॉ. विनोद बाबर

Image
कराड - कराड नगरपरिषदेच्या नगरवाचनालयातर्फे यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे आयोजित केलेल्या व्याखानमालेत बोलताना प्रा.डॉ. विनोद बाबर, समोर उपस्थित जनसमुदाय. संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते प्रा.डॉ. विनोद बाबर यांच्या व्याख्यानाला कराडकरांचा प्रचंड प्रतिसाद कराड - आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर मोबाईलपासून दूर रहा, एखाद्याला माफ करा आणि कान भरणाऱ्यांपासून सावध राहा. संकटे त्यांच्या वाट्याला येतात, ज्यांची ती पेलायची ताकद असते. एक दार बंद झाले, तर शंभर दारे उघडतात. त्यामुळे संकटाच्या छाताडावर पाय द्या, यश तुमचेच आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. विनोद बाबर यांनी केले. कराड नगरपरिषदेच्या नगरवाचनालयातर्फे आयोजित 93 व्या व्याख्यानमालेतील तृतीय पुष्प गुंफताना ‘संकटे त्यांच्या वाटायला येतात, ज्यांची पेलायची ताकद असते' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे सेवानिवृत्त अभियंता ए.आर. पवार होते. यावेळी लेखापाल गंगाधर जाधव, प्रशासकीय अधिकारी अमोल जाधव, प्रा. बी. एस. खोत उपस्थित होते. मोबाईलने जग जवळ आणले असले, तरी माणसे मात्र दुरावली, ...

भारतीय सभ्यतेचा -हास गांभीर्याने घेण्याची गरज : डॉ. मोहोळकर

Image
पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना प्राचार्य वाय. एस. कारंजकर, डी. जे. पवार, डॉ. मोहोळकर भारतीय सभ्यतेचा -हास गांभीर्याने घेण्याची गरज : डॉ. मोहोळकर औंध, दि. 25 - जगप्रसिध्द अशी भारतीय सभ्यता -हास होत आहे, ही बाब चिंताजनक असून त्याचा गांभीर्याने विचार व्हावा, असे मत औंध येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. सुहन मोहन मोहोळकर यांनी व्यक्त केले.  डॉ. मोहोळकर औंध-खटाव येथील लक्ष्मणराव इनामदार शासकीय औ. प्र. संस्थेत पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त एकात्म मानव दर्शन या विषयावर आयोजित व्याख्याना प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य श्री. वाय. एस. कारंजकर होते. कार्यक्रमास आयएमसी सदस्य श्री. डी. जे. पवार उपस्थित होते. डॉ. मोहोळकर म्हणाले, पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी १९६० च्या दशकात मांडलेले विचार हे आजमितीलाही लागू होतात. त्यांनी मानव विकास हा शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा निरोगी असण्यावर अवलंबून असल्याचे म्हटले होते. त्यांनी समाज, कुटुंबव्यवस्था सुदृढ होण्याची अपेक्षा व्यक्त करताना अ...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील तीन वाघांचे स्थानिकाकडून नामकरण

Image
  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांना स्थानिक लोकांनी दिली नावे ‘सेनापती’, ‘सुबेदार’ व ‘बाजी’ कराड, दि. 25- सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील स्थानिक नागरिकांनी आपल्या व्याघ्र अभिमानाचे दर्शन घडवत वाघांना ‘सेनापती’, ‘सुबेदार’ व ‘बाजी’ अशी लोकप्रिय नावे दिली आहेत. या नावांमुळे स्थानिक लोकांचा वाघांशी असलेला आत्मीय संबंध अधिक दृढ झाला असून, संवर्धनाबरोबरच लोकसहभागाची भावना बळकट झाली आहे. ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात’ अधिवास करणाऱ्या वाघांचे नामकरण करण्यात आले आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सरदारांना दिलेल्या विविध पदव्यांचा आधार घेण्यात आला आहे. शासकीय कागदपत्रांमध्ये व्याघ्र प्रकल्पातील वाघांना सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र पर्यटकांमध्ये वाघा विषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी स्थानिक निसर्गप्रेमी, गाईड, आणि वनमजुरांकडून या वाघांसाठी वापरण्यात येणाऱ्या नावांना वन विभागाने स्वीकारले आहे.  लोकांनी दिलेली नावे  •एसटीआर–टी१ :सेनापती  • एसटीआर–टी२ : सुबेदार  • एसटीआर–टी३ : बाजी सध्या परिस्थितीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन नर वाघ आहेत....

मनाने मोठी माणसेच माणुसकी जिवंत ठेवतात;प्रा.डॉ. भिमराव पाटील

Image
मनाने मोठी माणसेच माणुसकी जिवंत ठेवतात;प्रा.डॉ. भिमराव पाटील नगरपरिषदेच्या ९३ व्या शारदीय व्याख्यानमालेस उत्साहात प्रारंभ कराड, दि. 24 - बुद्धीने चांगली माणसे स्वतःचा आधी विचार करतात, पण मनाने चांगली माणसे दुसऱ्याचा आधी विचार करतात. छत्रपती शिवाजी महाराजांसह कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, सिंधुताई संकपाळ यांसारख्या थोर व्यक्तींनी कर्तृत्व, संस्कार आणि दातृत्वातून माणुसकी जिवंत ठेवली. आज प्रत्येकाने त्यांच्या वाटेवरून चालले, तरच खरी माणुसकी जिवंत राहील, असे प्रतिपादन प्रा.डॉ. भिमराव पाटील यांनी केले. कराड नगरपरिषदेच्या सार्वजनिक वाचनालयामार्फत आयोजित ९३ व्या व्याख्यानमालेत ‘माणुसकी हरवतेय का?’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे होते. नगरपरिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, प्रशासकीय अधिकारी सुवर्णा विभुते, प्रा.बी.एस. खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पाटील म्हणाले, शहरी प्लॅट संस्कृतीपेक्षा ग्रामीण भागात अजूनही माणुसकी आणि माणूसपण जिवंत आहे. आज संवाद हरवत चालला आहे. सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या समाजाने पुन्हा वाच...

श्री मळाईदेवीच्या 21व्या मल्हारपेठ शाखेचा मोठ्या दिमाखात उद्घाटन समारंभ संपन्न

Image
श्री मळाईदेवीच्या 21व्या मल्हारपेठ शाखेचा मोठ्या दिमाखात उद्घाटन समारंभ संपन्न कराड, दि. 24 - श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जखिणवाडी या संस्थेच्या 21व्या मल्हारपेठ शाखेचा उद्घाटन सोहळा संस्थेचे संस्थापक अशोकराव थोरात भाऊ यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जखिणवाडी या संस्थेची स्थापना संस्थापक अध्यक्ष शेती मित्र अशोकराव थोरात भाऊ यांनी दिनांक 31 जुलै 1987 रोजी केली गेल्या 39 वर्षांमध्ये संस्थेने 20 शाखा व मुख्य कार्यालय अशा 21 शाखा मधून बँकिंग सेवा सुरू केली असून संस्थेच्या एकूण शाखांपैकी 17 शाखा स्व-मालकीच्या इमारतीत आहेत.  श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करीत असताना डोळ्यापुढे एक सामाजिक उद्दिष्ट होते त्या काळामध्ये गरीब शेतकरी शेतमजूर लघुउद्योजक रिक्षाव्यवसायिक यांची बँकांमध्ये पत नसल्याने त्यांना आवश्यक ते अर्थसहाय्य मिळत नव्हते. त्यांची बाजारात पत नाही अशा लोकांची पत निर्माण करणे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून संस्थेच्या कामकाजास सुरुवात झाली. संस्थेचा सुरुवातीचा कारभार फक्त एका शाखेमधून केला जात होता पण काळाची गरज ओ...

शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Image
  शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार शासकीय दाखल्यांचे वितरण  कराड, ता. २४ : येथील महाराष्ट्र शासनाचे उपविभागीय कार्यालय व कराड तहसील कार्यालयाच्यावतीने शेरे (ता. कराड) येथे गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात लाभार्थ्यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय दाखल्यांचे वितरण केले जाणार आहे.  सर्वसामान्य नागरिकांना शासकीय दाखले वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविले जाते. या अभियानांतर्गत आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकाराने कराड दक्षिणमधील विविध शाळांमध्ये विशेष शिबीरांचे आयोजन करुन, शासकीय दाखल्यांसाठी नोंदणी अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात नोंदणी केलेल्या पात्र लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वितरण शेरे (ता. कराड) येथील शंकरआप्पा मल्टीपर्पज हॉल येथे सकाळी १० वाजता आयोजित समाधान शिबीरात केले जाण...

रयत डिस्टलरी प्रकल्प उभारणी बरोबर आणखी विस्तारवाढ करणार;ॲड उदयसिंह पाटील

Image
रयत सहकारी साखर कारखान्याच्या 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना कारखान्याचे चेअरमन ऍड उदयसिंह पाटील-उंडाळकर व्यासपीठावर रवींद्र देशमुख,आप्पासाहेब गरुड, प्रदीप पाटील,धनाजी काटकर व मान्यवर... रयत डिस्टलरी प्रकल्प उभारणी बरोबर आणखी विस्तारवाढ करणार; ॲड उदयसिंह पाटील रयतची 29 वी वार्षिक सभा संपन्न  कराड, दि. 23 - रयत सहकारी साखर कारखाना 5000 क्षमतेच्या विस्तारवाढी बरोबर को जनरेशन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून भविष्याचा वेध घेऊन लवकरच डिस्टलरी प्रकल्प उभारण्याबरोबर आणखी कारखान्याची गाळप क्षमतेचा विस्तार करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन ऍड उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी केले.  शेवाळेवाडी (म्हासोली) ता.कराड येथील कारखाना कार्यस्थळावर ही सभा सपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे व्हा.चेअरमन आप्पासाहेब गरुड, अथणी -रयत चे युनिट हेड रवींद्र देशमुख,कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई,कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते,कोयना बँकेचे चेअरमन के टी पाटील,शामराव पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे,कराड बाजार समितीचे सभाप...

श्री मळाईदेवी पतसंस्थेचा सर्वाधिक 10% लाभांश; संस्थापक अध्यक्ष अशोकराव थोरात...

Image
श्री मळाईदेवी पतसंस्थेचा सर्वाधिक 10% लाभांश; संस्थापक अध्यक्ष अशोकराव थोरात... कराड, दि. 22 - श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेने सन २०२४२५ सालासाठी 10% लाभांश देणे यापूर्वी जाहीर केलेले होते त्यानुसार सदर लाभांश वाटप शुभारंभ संस्थेचे चेअरमन अजित थोरात (काका) यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला . श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेला 39 वर्षे पूर्ण झाली असून गेल्या 38 वर्षात दरवर्षी सातत्याने सभासदांना लाभांश देणारी श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने संस्थेचे कामकाज उत्तम प्रकारे चालवले असून शेतकरी कष्टकरी कामगार यांचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे संस्थेने दरवर्षी दहा टक्के लाभांश दिलेला आहे श्रीमळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासह एकूण 21 शाखा कार्यरत असून एकूण 74 सेवक आहेत संस्थेच्या सर्व शाखा संगणीकृत असून बँकिंग प्रणाली लागू केलेली आहे संस्थेने सभासदांना NEFT RTGS व QR कोड ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे संस्थेच्या एकूण 21 शाखा पैकी 17 शाखा स्वमालकीच्या इमारतीत...

कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी नामदेवराव पाटील यांची नियुक्ती

Image
कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी नामदेवराव पाटील यांची नियुक्ती : काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण कराड, 21 - : कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नामदेवराव पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या परंपरेनुसार शहरातील ऐतिहासिक स्मारकांना अभिवादन करून आपल्या कामाची सुरुवात केली. रविवारी 21 सप्टेंबर रोजी नामदेवराव पाटील यांनी सर्वप्रथम कराड शहराच्या मध्यवर्ती दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून दर्शन घेतले. छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना त्यांनी शिवरायांचे आदर्श समाजापर्यंत पोहचवण्याचा संकल्प व्यक्त केला. यानंतर त्यांनी महात्मा गांधीजींच्या स्मारकास अभिवादन करून दर्शन घेतले.  यानंतर नामदेवराव पाटील यांनी प्रीतीसंगम येथे जाऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि कराडचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळास अभिवादन केले. तसेच पाटण कॉलनी येथील स्व. प्रेमीलाकाकी चव्हाण व आनंदराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण व प्रेमीलाकाकी च...

कराड नगरपालिका नगरवाचनालयातर्फे नवरात्र उत्सवात; ९३ व्या शारदीय व्याख्यानमाला

Image
  कराड नगरपालिका नगरवाचनालयातर्फे नवरात्र उत्सवात; ९३ व्या शारदीय व्याख्यानमाला  कराड, दि. 21 - कराड नगरपरिषदेच्या नगरवाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षी शारदीय व्याख्यानमालेचा उपक्रम राबविला जातो. सन १९३२ पासुन ही व्याख्यानमाला अविरतपणे सुरु असुन यंदा ही शारदीय व्याख्यानमाला ९३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. दिनांक २२ सप्टेंबर २०२५ पासुन या शारदीय व्याख्यानमालेस प्रारंभ होत आहे. कराडचे सांस्कृतिक, वैचारिक वैभव, शैक्षणिक संस्कारक्षम व्यासपीठ म्हणुन या व्याख्यानमालेने नावलौकीक मिळविला आहे. १६८ वर्षाची परंपरा जपणारे हे नगरवाचनालय आज कराड शहराची शान बनलेली आहे. बुध्दीवंतांची गरज तर वाचनवेड्या पुस्तकप्रेमी वाचकांची तहान भागविण्याचा झरा बनली आहे. या वाचनालयाची स्थापनाच १८५७ ची, हे वर्षच मुळात अखंड भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि संस्मरणीय वर्ष. या १८५७ मध्ये स्थापन झालेले हे नगरवाचनालय आजही आपल्या अखंड सेवेने तत्परतेने, विविधतेने, वाचकांची, जिज्ञासूंची, अभ्यासूंची व्याख्यानमाला रसिकांची भूक भागविते आहे. या व्याख्यानमालेत साहित्य, संगीत, कला, क्रीडा, लोककला राजकारण काव्य, कथाकथन, धार्मीक, ...

वाढदिवसाचे सामाजिक भान; विविध उपक्रमांचा हजारोंना लाभ

Image
  राजेंद्रसिंह यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आ. डॉ. अतुलबाबा भोसले व इतर मान्यवर वाढदिवसाचे सामाजिक भान; विविध उपक्रमांचा हजारोंना लाभ राजेंद्रसिंह यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव  कराड, दि. 20 - शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा लाभ हजारो कराडकरांना झाला. यावेळी प्रथमच सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला. राजेंद्रसिंह यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव दिवसभर सुरू होता. वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, गरजूंना मदत, गुणवंतांचा सत्कार व शिबिरे आयोजित करण्याची परंपरा राजेंद्रसिंह यादव मित्र परिवाराने यावर्षीही जपली. रविवार पेठ पाण्याची टाकी व बारा डबरे येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ गरजू नागरिक व महिलांना झाला. दत्त चौक येथे यशवंत विकास एकता मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यात शेकडो युवक, युवतींनी सहभाग घेतला. यातील विजेत्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सात शहीद येथे रक्तदान शिबिर व महाआरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला....

कृष्णा परिवाराचे कार्य देशासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी;ना. जयकुमार रावल

Image
कराड : राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांचे स्वागत करताना कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले. बाजूस आ.डॉ. अतुलबाबा भोसले व विनायक भोसले. कृष्णा परिवाराचे कार्य देशासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी;ना. जयकुमार रावल कराड, दि. 20 : कृष्णा परिवाराने मागील पाच दशकांपासून अविरतपणे समाजातील सामान्य घटकाचे जीवनमान उंचावण्याचे कार्य केले आहे. कृष्णा परिवाराचे हे कार्य प्रेरणादायी असून, महाराष्ट्र आणि देशासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांनी काढले. कराड दौऱ्यावर आले असता ना. रावल यांनी कृष्णा कॅम्पसला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.  राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल आज कराड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कृष्णा कॅम्पसला भेट देऊन, इथल्या कार्याची माहिती घेतली. कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले व श्री. विनायक भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.  ना. रावल त्यांनी क...

कृष्णा आर्थिक परिवाराचा राष्ट्रीय पातळीवर गौरव....

Image
गोवा : राष्ट्रीय सहकारी बँकिंग शिखर परिषदेत मान्यवरांच्या हस्ते ‘फ्रंटियर्स इन को-ऑपरेटीव्ह बँकींग’ पुरस्कार स्वीकारताना श्री. विनायक भोसले व संचालक मंडळ. कृष्णा आर्थिक परिवाराचा राष्ट्रीय पातळीवर गौरव कराड, दि. 19 : कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृष्णा आर्थिक परिवाराचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. गोवा येथे नुकत्याच झालेल्या एका शानदार सोहळ्यात कृष्णा सहकारी बँक आणि सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेला ‘बँकिंग फ्रंटियर्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कृष्णा आर्थिक परिवाराचे मार्गदर्शक श्री. विनायक भोसले यांच्यासह दोन्ही संस्थांचे संचालक व अधिकाऱ्यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा आर्थिक परिवाराचा मोठा विस्तार झाला आहे. कृष्णा आर्थिक परिवारात कृष्णा बँक, मा. जयवंतराव भोसले पतसंस्था, कृष्णा महिला पतसंस्था व वित्तपेटा मल्टिस्टेट सोसायटी या आर्थिक संस्थांचा समावेश आहे. सर्वसामान्य जनत...

कराडच्या नवनिर्माणाचे संकल्पक - राजेंद्रसिंह यादव

Image
कराडच्या नवनिर्माणाचे संकल्पक - राजेंद्रसिंह यादव  राजेंद्रसिंह यादव यांना खर्या अर्थाने सूर गवसला, तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर. यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांचे पाठबळ असताना व कराडच्या विकासाची काळजी असल्याने राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्यमंत्र्यांकडून शब्द घेतला. त्यानंतर कराडच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी कराड फेज टू ही संकल्पना मांडली. कराड शहर हे साठ, सत्तर वर्षात नागरी विकासात अग्रेसर असे शहर होते परंतु काळाच्या ओघात या नागरी सुविधांचा पुनर्विकास करणे गरजेचे होते. कराड शहराच्या पुढील पन्नास वर्षांतील वाढीचा वेग लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक होते.गेल्या पन्नास वर्षांत कराडमधील नागरी सुविधांची वाढत्या नागरीकरणाबरोबर फेरमांडणी करणे आवश्यक होते. राजेंद्रसिंह यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या कामांचा कराड फेज टू मध्ये समावेश करुन पाठपुरावा सुरू केला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या माध्यमातून प्रयत्न केल्याने कराडला गेल्या दोन वर्षांत स...

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कराड व मलकापूर शहरात 'नमो उद्यान’ साकारण्यासाठी २ कोटींचा निधी मंजूर...

Image
आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कराड व मलकापूर शहरात 'नमो उद्यान’ साकारण्यासाठी २ कोटींचा निधी मंजूर... कराड, दि. 17 : महाराष्ट्र शासनाने राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात ‘नमो उद्यान’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कराड व मलकापूर शहराचाही समावेश करण्यात आला असून, याठिकाणी ‘नमो उद्यान’ साकारण्यासाठी एकूण २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्यातील शहरी भागात हरित उद्यानांचे जाळे निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने ‘नमो उद्यान योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी तब्बल ३९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात ‘नमो उद्यान’ साकारण्यासाठी नगरपालिकांना प्रत्येकी १ कोटींचा निधी वितरित केला जाणार आहे. या योजनेत कराड आणि मलकापूर शहराचाही समावेश व्हावा, यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे कराड आणि मलकापूर येथे नमो उद्यान साकारण्यासाठी प्रत्येकी १ कोटीप्रमाणे एकूण २ कोटींचा नि...

कराड तालुक्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे आयोजन

Image
कराड तालुक्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा होणार  कराड, दि. 16 - छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. 17 सप्टेंबर, 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 02 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करणेत येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे तसेच तहसिलदार कल्पना ढवळे यांनी दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशाप्रमाणे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, यांच्या मार्गदर्शनांखाली कराड तालुक्यांत विविध उपक्रम राबविणेत येणार आहेत. पहिला टप्पा - पाणंद रस्ते विषयक मोहिम  यामध्ये प्रामुख्याने पाणंद, पांधण, शिवरस्ते, गाडीरस्ते, पायवाट इत्यादी अतिक्रमण मुक्त करुन त्यांचे सिमांकन करणे व त्याच्या गांव नकाशांवर नोंदो घेणे, खुल्या झालेले शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचे दुतर्फा झाडे लागवड करणेत येणार आहे. दुसरा टप्या - सर्वासाठी घरे  या उपक्रमांतंर्गत शासनांकडून निर्गमीत करणेत आलेल्या शासन निर्णयांचे अनुषंगाने अंमलबजावणी करणे, सन 2011 पुर्वीचे रहिवासी कारणांसाठी केलेले ...

कराड तालुक्यात १३ ठिकाणी नवीन आधार अपडेटेशन केंद्र

Image
कराड तालुक्यात १३ ठिकाणी नवीन आधार अपडेटेशन केंद्र कराड, दि. 16 : आधार कार्ड अपडेशन केंद्रांच्या अपुऱ्या संख्येमुळे कराड तालुक्यात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेऊन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आधार अपडेटेशन केंद्रांची संख्या ताबडतोब वाढविण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. याबाबत प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करत, येत्या आठवड्याभरात कराड तालुक्यात १३ ठिकाणी नवीन आधार अपडेटेशन केंद्र सुरू करण्याची ग्वाही प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली आहे. विविध शासकीय योजना, शालेय व महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, तसेच बँकिंग व्यवहारांमध्ये आधार कार्ड ही अत्यावश्यक बाब बनली आहे. आधार कार्डचे अपडेशन करण्याबाबत सर्वत्र कार्यवाही सुरु आहे. मात्र अपुऱ्या आधार अपडेटेशन केंद्रांमुळे नागरिकांना सध्या प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्रांची अपुरी संख्या, सर्व्हर डाऊन यासारख्या अडचणींमुळे अशा केंद्रांसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. तसेच हेलपाट्यांमुळे नागरिकांचा वेळ, पैसा वाया जात आहे.  नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा, ...

कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार प्रदान

Image
नाशिक : दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार आ. प्रवीण दरेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना कृष्णा बँकेचे संचालक व अधिकारी. कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार प्रदान कराड, दि. 16 : कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृष्णा सहकारी बँकेला नाशिक येथे नुकत्याच झालेल्या दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कृष्णा बँकेच्या संचालकांनी व अधिकार्‍यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कृष्णा बँकेने चेअरमन आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा विस्तार केला असून, सामान्य माणसांसाठी कार्य आणि सभासद हिताचा कारभार या उद्दिष्टाने बँकेने वाटचाल सुरु ठेवली आहे. सहकार क्षेत्राला बळकटी आणणार्‍या अशा सहकारी बँकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी ...

मा. राजेंद्रसिंह यादव यांचा 19 रोजी वाढदिवस

Image
राजेंद्रसिंह यादव यांचा 19 रोजी वाढदिवस गुरुवार व शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन  कराड, दि. 16 -  सातारा जिल्हा शिवसेना समन्वयक व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेदसिंह यादव यांचा वाढदिवस सर्व मित्र परिवाराच्या वतीने युवा प्रेरणा दिन म्हणून दरवर्षी मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. यावर्षी या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन गुरुवार 18 व शुक्रवार 19 रोजी करण्यात आले असल्याची माहिती राजेंद्रसिंह यादव मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली. वाढदिवसाच्या निमित्ताने राजेंद्रसिंह यादव मित्र परिवाराच्या वतीने समाजातील गरीब व गरजूंना मदत होत असते. या बरोबर सुशिक्षीत बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. आजपर्यंत या रोजगार मेळाव्यातून कराड शहर व परिसरातील जवळपास पाच हजार युवा-युवतीना नोकर्या प्राप्त झाल्या आहेत. गेली २५ वर्षे राजेंदसिंह यादव कराड नगरपरिषदेत नगरसेवक, सभापती,उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गेली दहा वर्षे त्यांच्या नेतृत्वाखाली यशवंत विकास आघाड़ीची सत्ता नगरपरिषदेत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...