कराडच्या नवनिर्माणाचे संकल्पक - राजेंद्रसिंह यादव
कराडच्या नवनिर्माणाचे संकल्पक - राजेंद्रसिंह यादव
राजेंद्रसिंह यादव यांना खर्या अर्थाने सूर गवसला, तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर. यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांचे पाठबळ असताना व कराडच्या विकासाची काळजी असल्याने राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्यमंत्र्यांकडून शब्द घेतला. त्यानंतर कराडच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी कराड फेज टू ही संकल्पना मांडली. कराड शहर हे साठ, सत्तर वर्षात नागरी विकासात अग्रेसर असे शहर होते परंतु काळाच्या ओघात या नागरी सुविधांचा पुनर्विकास करणे गरजेचे होते. कराड शहराच्या पुढील पन्नास वर्षांतील वाढीचा वेग लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक होते.गेल्या पन्नास वर्षांत कराडमधील नागरी सुविधांची वाढत्या नागरीकरणाबरोबर फेरमांडणी करणे आवश्यक होते. राजेंद्रसिंह यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या कामांचा कराड फेज टू मध्ये समावेश करुन पाठपुरावा सुरू केला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या माध्यमातून प्रयत्न केल्याने कराडला गेल्या दोन वर्षांत सुमारे 325 कोटी रुपयांचा निधी खेचून आणण्यात त्यांना यश आले.
भुयारी गटार योजना अद्ययावतीकरणास 96 कोटी 28 लाख रुपये निधी
कराड शहराचा राज्यात ज्या योजनेमुळे लौकिक झाला आहे, ती शहराची भुयारी गटार योजना सुमारे पन्नास वर्षांपूर्वी कार्यान्वित करण्यात आली. काळाच्या ओघात या योजनेचे अद्यावतीकरण करण्यात यावे, अशी कराडकरांची मागणी होती. मात्र यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता होती. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेंद्रसिंह यादव यांच्या शिवसेना प्रवेशावेळी यादव यांच्यासाठी कराडला 108 कोटीपेक्षा जास्त निधी देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार राजेंद्रसिंह यादव यांनी अनेक महिने या योजनेचा पाठपुरावा केला. त्यामुळे राज्य नगरोत्थानमधून सुमारे 96 कोटी 28 लाख रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर झाला. यातून शहराच्या वाढीव भागाला फायदा होणार असून शहरातील सध्या अस्तित्वात असणाऱ्या पंपिंग स्टेशनचेही नूतनीकरण होणार आहे. पुढील पन्नास वर्षांचा कालावधी लक्षात घेऊन या योजनेचे अद्यावतीकरण होत असून याचा कराडकारांना फायदा होणार आहे या योजनेची भूमिपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले असून कामे प्रगतीपथावर आहेत.
पुढील 30 वर्षासाठी चोवीस तास पाणी योजनेचे अद्ययावतीकरण
कराड शहराच्या चोवीस तास पाणी योजनेच्या अद्ययावतीकरणासाठी शासनाच्या माध्यमातून 63 कोटी 48 लाख रुपये निधी मंजूर करून आणण्यात राजेंद्रसिंग यादव यांना यश आले आहे. त्यामुळे 2056 सालापर्यंत कराडची लोकसंख्या तीन लाखापर्यंत जाण्याचा अंदाज गृहीत धरून तेवढ्या लोकसंख्येला मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीने योजनेचे अद्यावतीकरण करण्यात येणार आहे. या योजनेसाठी पाणी मीटर बसवण्यात येणार असून ही पाणी मीटर अत्याधुनिक असणार आहेत. सध्याच्या 24 तास पाणी योजनेच्या मीटर नागरिकांचा झालेला विरोध लक्षात घेता अतिशय आधुनिक व अद्ययावत पद्धतीने मीटर बसवण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून स्वच्छ व निर्जंतुक पाण्याचा पुरवठा शहराला होणार आहे.
शिवतीर्थावर पाच कोटींतून साकारेल भव्य शिवस्मारक
कराडच्या दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा 1996 साली उभारण्यात आला. हा पुतळा कराडकरांचे प्रेरणास्थान आहे. या पुतळ्याच्या उभारणीला बरीच वर्षे झाल्याने या परिसराचे सुशोभीकरण व्हावे, अशी मागणी कराडकरांमधून होत होती. तसेच पुतळ्याच्या चबुतऱ्याचीही काही प्रमाणात झीज झाली होती. ही बाब लक्षात घेऊन राजेंद्रसिंह यादव यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे आग्रही मागणी करत शिवतीर्थाच्या सुशोभीकरणासाठी निधी मागणी केली. त्यानुसार जिल्हा नियोजनमधून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या सुशोभीकरणाचे भूमिपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. दत्त चौक येथील शिव पुतळ्याचा चबुतरा व पुढील दगडी आयलँड असे एकत्रित सुशोभीकरण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शाही मिरवणूक अशा स्वरूपात हे सुशोभीकरण होणार असून ते आगळेवेगळे आकर्षण ठरणार आहे.
भारतरतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सुशोभीकरण
बुधवार पेठेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी राजेंद्रसिंह यादव यांनी निधी मंजूर करून आणला. या निधीमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या परिसरातील चौकात पेवर ब्लॉक व व चौक परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची वाढवण्यात येणार आहे. याबरोबरच सर्कलवर अशोक चक्राची प्रतिकृती असणार आहे. आतापर्यंत या स्मारकाची डागडुजी झाली होती परंतु आता प्रथमच व्यापक स्वरूपात हे सुशोभीकरण होणार आहे. या कामाविषयी परिसरातील आंबेडकर अनुयायांचेही मार्गदर्शन घेण्यात येत आहे. यासाठी 86 लाख 89 हजार 669 रूपये खर्च येणार आहे.
संविधान स्तंभ
बुधवार पेठेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाशेजारी नगरपालिका शाळेलगत संविधान स्तंभ नव्याने उभारण्यात येणार आहे. या स्तंभावर अशोक चक्राची प्रतिकृती असणार आहे. या स्तंभामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. यासाठी 16 लाख 97 हजार रुपये खर्च येणार आहे. तसेच आणखी एक संविधान भवन वाढीव भागात प्रस्तावित केले असून यासाठी 67 लाख 66 हजार रुपये खर्च येणार आहे.
महात्मा फुले पुतळा सुशोभीकरण व अण्णाभाऊ साठे स्मारक
बुधवार पेठेत महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा असून या पुतळ्याच्या चबुतरा व सर्कलचे सुशोभीकरण दगडामध्ये केले जाणार आहे. या चौकातही पेवर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत. या कामासाठी
1 कोटी 3 लाख रुपये खर्च येणार आहे. याच परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकात अण्णाभाऊंचा अर्ध पुतळा तसेच हॉल व अभ्यासिका असणार आहे. अभ्यासिकेचा उपयोग परिसरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. या कामासाठी 62 लाख रुपये खर्च येणार आहे.
बुधवार पेठेत पंचशील अभ्यासिका
बुधवार पेठेत घरे छोटे असल्याने विद्यार्थी विद्यार्थिनींच्या अभ्यासाची परवड होत होती. हे लक्षात घेऊन राजेंद्रसिंह यादव यांनी सुमारे 25 लाख 17 हजार रुपये खर्चून नगरपालिकेच्या जागेत अभ्यासिका उभारली. त्याचे नामकरण पंचशील अभ्यासिका असे करण्यात आले आहे. याचा फायदा या परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होत आहे. याबरोबरच शहरात जागा मिळेल, त्या ठिकाणी आणखी अभ्यासिका बांधण्याची घोषणा राजेंद्रसिंह यादव यांनी केली आहे. नागरिकांची नेमकी गरज लक्षात घेऊन यादव यांनी विकासकामांना प्राधान्य दिले आहे.
बंदिस्त गटरमुळे रस्ते झाले मोठे
राजेंद्रसिंह यादव यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. हे रस्ते करताना तेथील गटारची कामे करावीत, अशी मागणीही विविध भागातील नागरिकांनी त्यांच्याकडे केली होती. त्यानुसार राजेंद्रसिंह यादव यांनी रस्ते करताना तेथील गटर्स बंदिस्त करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे गटर्सची जागा वाहतुकीसाठी वापरात आली. परिणामी अनेक ठिकाणचे रस्ते मोठे झाले असून पार्किंगचा प्रश्नही मार्गी लागला आहे. शहरात या पुढील काळामध्ये ज्या ठिकाणी रस्ते होतील, त्या भागात बंदिस्त गटार करण्याची घोषणा राजेंद्रसिंह यादव यांनी केली आहे. आरोग्य विभागावरील ताणही कमी झाला आहे.
शुक्रवार पेठेत समाज मंदिर आणि दोन मल्टी पर्पज हॉल-
शुक्रवार पेठेत जुन्या जलशुद्धीकरण केंद्रात नगरपालिका जागेत सात शहीद मराठा समाज मंदिर -43 लाख 43 हजार रुपये, डवरी समाजासाठी 46 लाख 93 हजार रुपये, स्वामी समर्थ विकास केंद्रासाठी मल्टीपर्पज हॉल-45 लाख 78 हजार आदी कामे प्रस्तावित केली आहेत.
पत्रा चाळजवळ साकारणार जिम
शुक्रवार पेठेत पत्राचाळ येथील पंपिंग स्टेशन शेजारी नगरपालिकेच्या जागेत अत्याधुनिक जिम उभारावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. त्यानुसार राजेंद्रसिंह यादव यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून सुमारे 68 लाख रुपयांची या ठिकाणी जिमसाठी मंजुरी आणली असून या जिमचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे.
रस्ते विकासाला मिळाली चालना
कराड नगरपालिकेच्या रस्ते विकासात येणाऱ्या आर्थिक मर्यादा लक्षात घेऊन राजेंद्रसिंह यादव यांनी विविध भागांमध्ये रस्त्यांच्या कामांना जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. परिणामी कराड शहराच्या सर्वच भागात रस्त्यांची कामे करण्यात आली. ही कामे काही ठिकाणी पूर्ण झाली असून काही ठिकाणी ती अजूनही सुरू आहेत.
जय महाराष्ट्र चौक रस्ता करणे -36 लाख 44 हजार 373 रूपये, पेठ बुधवार संत गोरोबा कुंभार मंदिर ते फारूक कुरेशी रस्ता करणे- 19 लाख 33 हजार 626 रूपये, 3) अशोक चौक टू आऊजा पटेल रस्ता 17 लाख 57 हजार रुपये, फुले कमान येथील रोड-18 लाख रुपये, तांबट तालीम ते भाजी मंडई-28 लाख 46 हजार 900 रुपये, सनगर बोळ काँक्रिटीकरण-15 लाख 69 हजार रुपये, मुठेकर बोळ काँक्रिटीकरण 21 लाख, सिटी पोस्ट टू अशोक चौक रस्ता 36 लाख रुपये, सोमवार पेठ काँक्रिटीकरण रोड- 42 लाख 13 हजार 399 रुपये आदी कामांबरोबर शुक्रवार पेठ, रविवार पेठ, मंडई, शनिवार पेठ, गुरुवार पेठ, वाढीव भागातील रस्त्यांची कामे यादव यांनी मंजूर करून आणली आहेत. यात काही कामे पावसाळ्यानंतर वेगाने पूर्ण करण्यात येणार आहेत. या कामांमध्ये गेली अनेक वर्षे ज्या रस्त्यांवर डांबर पडले नाही, अशा रस्त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विविध ठिकाणच्या नागरिकांनी समाधान व्यक्त करत राजेंद्रसिंह यादव यांचे आभार मानले आहेत. रस्ते विकासामुळे कराड शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत झाली आहे.
आंबेडकर क्रीडांगण यासाठी 1 कोटी 60 लाख
लिंगायत स्मशानभूमीला पायरीची व्यवस्था 19 लाख 20 हजार, शाळा क्रमांक 5 विकासासाठी 5 लाख, डॉ व. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण विकासासाठी 1 कोटी 60 लाख रुपये मंजूर करून आणले आहेत.
वाढीव भागाच्या विकासाला झुकते माप
कराड शहराच्या हद्दवाढीनंतर कराड शहराच्या तिप्पट आकाराचा भाग शहर हद्दीत समाविष्ट झाला. गेली अनेक वर्षे हा भाग मूलभूत सुविधांपासून वंचित होता. या भागात नागरी सुविधांची कमतरता होती. हे लक्षात घेऊन राजेंद्रसिंह यादव यांनी भुयारी गटार योजना व पाणी योजनेच्या अद्ययावतीकरणासाठी वाढीव भागातील कामांचा समावेश केला. या दोन्ही कामांसाठी सुमारे 160 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यातील बहुतांश कामे ही वाढीव भागामध्ये होणार आहेत. त्याचा फायदा वाढीव भागातील रहिवाशांना होणार असून गेली अनेक वर्षे त्यांची होत असलेली परवड या माध्यमातून दूर होणार आहे. याशिवाय वाढीव भागांमध्ये रस्ते विकास करण्यावरही राजेंद्रसिंह यादव यांनी भर दिला आहे. ठिकठिकाणी भेटी देऊन तेथील समस्यांची माहिती घेत ते प्रश्न सोडवण्यावर र भर दिला आहे. वाढीव भागातील नागरिकांसाठी राजेंद्रसिंह यादव आशास्थान बनले आहेत.
एकनाथ शिंदे यांचे पाठबळ
राजेंद्रसिंह यादव यांना कराड शहराच्या विकासासाठी शंभर कोटींपेक्षा जास्त निधी देऊ, असा शब्द जाहीर सभेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर अनेक महिने अथक पाठपुरावा करून राजेंद्रसिंह यादव यांनी कराडच्या विकासाचे विविध प्रस्ताव दाखल केले होते. राज्याचे पर्यटन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी खास करून हे सर्व प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केले. खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शरद कणसे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांनीही या कामी राजेंद्रसिंह यादव यांना सहकार्य केले. परिणामी कराड शहरासाठी सुमारे 325 कोटी रुपयांचा निधी खेचून आणण्यात राजेंद्रसिंह यादव यांना यश आले. राजेंद्रसिंह यादव यांनी कराड शहराच्या विकासाचा ध्यास घेतला असून या पुढील काळातही कराड शहरासाठी भरीव निधी आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
नगर विकास खात्याकडेही पाठपुरावा
महायुतीच्या शासनात एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असून त्यांच्याकडे नगरविकास खाते आहे. त्यामुळे राजेंद्रसिंह यादव हे नगरपालिका स्तरावर प्रलंबित असलेली कामे तसेच प्रस्ताव यांचा पाठपुरावा नगर विकास विभागाकडे करत आहेत. यातून कर्मचाऱ्यांचे प्रश्न, आस्थापनेचे प्रश्न याबरोबरच कराड शहराच्या विकासात अडथळा ठरणाऱ्या बाबी दूर करण्यावर राजेंद्रसिंह यादव यांनी भर दिला आहे.
कराडच्या विकासाचे व्हिजन व पाठपुरावा
राजेंद्रसिंह यादव यांनी कराड शहराच्या मूलभूत नागरी सुविधा तसेच विकास कामांचा पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने कराड फेज टू ही संकल्पना आखली व त्याचा पाठपुरावा सुरू केला. कराड शहराच्या इतिहासात प्रथमच 315 कोटी इतका प्रचंड निधी राजेंद्रसिंह यादव यांनी मंजूर करून आणला. या याबरोबरच शहराच्या विकासाच्या तसेच नगरपालिकेच्या प्रशासकीय कामांचे व्हिजन राजेंद्रसिंह यादव यांच्याकडे असून हे व्हीजन ते विविध ठिकाणी मांडत आहेत. याबरोबरच कराड शहरातील सर्व घटकांना फायदा व्हावा, यादृष्टीने ते काम करत आहेत. शहराच्या विकासासाठी दीर्घकाळ उपयुक्त ठरेल, अशी पूरक भूमिका यादव यांनी घेतली आहे.
कराडकर नागरिकांची नेतृत्वाला मिळतेय पसंती
राजेंद्रसिंह यादव हे गेली तीस वर्षे नगरपालिकेच्या माध्यमातून सक्रिय आहेत. अनेक वेळा त्यांनी नगरपालिकेत सत्ताधारी गटाचे नेतृत्व केले आहे. नगरपालिका कामकाजाचा प्रचंड अनुभव असताना राजेंद्रसिंह यादव यांनी कराड शहराच्या विकासासाठी प्रचंड धडपड सुरू केली आहे. त्यातून कराड फेज टू ही संकल्पना साकार होत आहे. शासनाच्या माध्यमातून येणारा निधी कराडकर नागरिकांच्या घरादारापर्यंत पोहोचवण्यात राजेंद्रसिंह यादव यांना यश आले आहे. विविध कामे साकारू लागली आहेत. परिणामी राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाला कराडकर यांची पसंती मिळत आहे. याबरोबरच राजकीय नेतृत्व करतानाच कराडकरांसाठी व गोरगरीब जनतेसाठी राजेंद्रसिंह यादव हे सातत्याने धावून आले आहेत. कोरोना काळातही पदरमोड करून शहरवासीयांची मदत केली. त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केले जाणारे उपक्रम याबरोबरच शिबिरे याचाही फायदा कराडकरांना होत आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळत आहेत. त्यामुळे राजेंद्रसिंह यादव यांची लोकप्रियता वाढत आहे.
प्रशासक काळात निधी आणणारे नेतृत्व
कराड नगरपालिकेवर गेली चार वर्षे प्रशासक आहे. पालिकेच्या विकासकामांना मर्यादा आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी फेज टू संकल्पना मांडून 325 कोटी रुपयांचा निधी आणला. नगरसेवक पदावर नसतानाही शहर विकासाचा ध्यास घेऊन विकासाची गंगा कराडमध्ये आणणारे नेतृत्व म्हणून राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाची नोंद झाली आहे.

Comments
Post a Comment