कृष्णा परिवाराचे कार्य देशासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी;ना. जयकुमार रावल

कराड : राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांचे स्वागत करताना कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले. बाजूस आ.डॉ. अतुलबाबा भोसले व विनायक भोसले.

कृष्णा परिवाराचे कार्य देशासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी;ना. जयकुमार रावल

कराड, दि. 20 : कृष्णा परिवाराने मागील पाच दशकांपासून अविरतपणे समाजातील सामान्य घटकाचे जीवनमान उंचावण्याचे कार्य केले आहे. कृष्णा परिवाराचे हे कार्य प्रेरणादायी असून, महाराष्ट्र आणि देशासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांनी काढले. कराड दौऱ्यावर आले असता ना. रावल यांनी कृष्णा कॅम्पसला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. 

राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल आज कराड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कृष्णा कॅम्पसला भेट देऊन, इथल्या कार्याची माहिती घेतली. कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले व श्री. विनायक भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

ना. रावल त्यांनी कृष्णा विद्यापीठ व कृष्णा हॉस्पिटलमधील विविध विभागांना, तसेच कृष्णा बँक आणि कृष्णा सरिता बझारच्या कार्यालयांना भेट देऊन पाहणी केली. 

यावेळी बोलताना ते म्हणाले, आम्ही कृष्णा परिवाराचे नाव नेहमी ऐकत आलो आहोत, मात्र प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर त्यांच्या कार्याची व्याप्ती किती मोठी आहे हे जाणवले. कृष्णा परिवाराने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अनन्यसाधारण व महत्त्वाचे कार्य केले आहे. एवढे विशाल विश्व उभे करणे सोपे नाही. हीच प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या परिसरात काही निर्माण करू शकलो, तर ते आमच्यासाठी मोठे काम ठरेल.

यावेळी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कृष्णा फौंडेशनचे कार्यकारी संचालक प्रा.डॉ. विनोद बाबर, कृष्णा नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली मोहिते, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव जाधव, कृष्णा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.







Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक