कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतुन गहाळ / चोरीस गेलेले 7 लाख रुपये किंमतीचे एकुण 22 मोबाईल तक्रारदार यांना केले परत


कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतुन गहाळ / चोरीस गेलेले 7 लाख रुपये किंमतीचे एकुण 22 मोबाईल तक्रारदार यांना केले परत.

डी.बी. पथका कडुन सन 2025 मध्ये आतापर्यंत 12 लाख रुपये किंमतीच्या एकुण 60 मोबाईलचा शोध.

कराड, दि. 27 - पोलीस अधीक्षक तुषार दोषी तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सी.ई. आय. आर. पोर्टलद्वारे पोलीस स्टेशन हद्दीतील तक्रारदार यांचे गहाळ झालेले मोबाईल फोन शोध घेणेबाबत मिंटीग घेवुन सुचना दिल्या होत्या त्यांचे मार्गदर्शानाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप कराड तालुका पोलीस ठाणे यांचे सुचनेनुसार कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार यांनी कर्नाटक राज्यातुन तसेच महाराष्ट्रातील कोल्हापुर, ओरगाबाद, नाशिक, अहमदनगर, सोलापुर, पुणे जिल्ह्यातुन तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती घेवुन मोबाईल फोन प्राप्त केले असुन आज दि. 27/09/2025 रोजी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे हस्ते 22 तक्रारदार यांना 7 लाख रुपये किंमतीचे मोबाईल फोन परत करण्यात आले असुन मोबाईल फोन परत मिळालेने तक्रारदार यांनी समाधन व्यक्त केले आहे. या वेळी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी अवाहन केले की, मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलीसांवर विश्वास ठेवुन तात्काळ कराड तालुका पोलीस स्टेशनशी संर्पक साधावा तसेच ceir.gov.in या पोर्टल वर तक्रार नोंदवावी

वरील कामगिरी सपोनि सखाराम बिराजदार, पोउनि धनंजय पाटील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार सफौ. नितीन येळवे, पो. हवा. सचिन निकम, पोना. किरण बामणे, विनोद माने, पो. कॉ मोहीत गुरव, प्रफुल्ल गाडे, रविंद्र देशमुख यांनी केली आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक