श्री मळाईदेवी पतसंस्थेचा सर्वाधिक 10% लाभांश; संस्थापक अध्यक्ष अशोकराव थोरात...

श्री मळाईदेवी पतसंस्थेचा सर्वाधिक 10% लाभांश; संस्थापक अध्यक्ष अशोकराव थोरात...

कराड, दि. 22 - श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेने सन २०२४२५ सालासाठी 10% लाभांश देणे यापूर्वी जाहीर केलेले होते त्यानुसार सदर लाभांश वाटप शुभारंभ संस्थेचे चेअरमन अजित थोरात (काका) यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला .

श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेला 39 वर्षे पूर्ण झाली असून गेल्या 38 वर्षात दरवर्षी सातत्याने सभासदांना लाभांश देणारी श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने संस्थेचे कामकाज उत्तम प्रकारे चालवले असून शेतकरी कष्टकरी कामगार यांचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे संस्थेने दरवर्षी दहा टक्के लाभांश दिलेला आहे श्रीमळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासह एकूण 21 शाखा कार्यरत असून एकूण 74 सेवक आहेत संस्थेच्या सर्व शाखा संगणीकृत असून बँकिंग प्रणाली लागू केलेली आहे संस्थेने सभासदांना NEFT RTGS व QR कोड ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे संस्थेच्या एकूण 21 शाखा पैकी 17 शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहेत यावर्षी सेवकांना पगार वाढ व बोनस ही देण्यात येणार आहे तसेच कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन सभासद व ग्राहकांना तत्पर व विनम्र सेवा दिली जात आहे श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेचा एकूण व्यवसाय 296.62कोटी चा असून ठेवी 168.31कोटी व कर्ज 128.31कोटी वाटप करून आर्थिक स्थिती मजबूत केली आहे संस्थेचे लेखापरीक्षक मे के एल सावंत यांच्याकडून लेखापरीक्षण करून घेऊन वरचेवर त्यांचे मार्गदर्शन घेतले जाते तसेच उपनिबंधक सहकारी संस्था कराड च्या उपनिबंधक श्रीमती अपर्णा यादव मॅडम व त्यांचे सर्व अधिकारी यांचे सातत्याने मार्गदर्शन घेण्यात येते 

संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना त्या म्हणाल्या की सहकार खात्याचे सर्व निकष मानांकाची पूर्तता प्रत्येक वर्षी संस्था करते यावर्षी सुद्धा नवीन गुण तक्त्यातील निकषाची पूर्तता संस्थेने पूर्ण केली आहे याचे श्रेय संस्थेचे चेअरमन व्हॉइस चेअरमन संचालक मंडळ सल्लागार मंडळ सभासद ठेवीदार कर्जदार तसेच सेवकांना दिले जाते या सहकार्याबद्दल माननीय अशोकराव थोरात भाऊ यांनी त्यांचे आभार मानले संस्थेने 65 कोटी रुपयांची सुरक्षित गुंतवणूक केली आहे संस्थेचे भाग भांडवल 12 कोटी 28 लाख असून संस्थेने 22 कोटी 47 लाख पेक्षा जास्त रकमेचे राखीव इतर निधी संस्थेने उभा केलेला आहे संचालक मंडळांनी व्यवसाय व्यवस्थापना चे वेळप्रसंगी सहकार खात्याच्या बदलत्या धोरणानुसार लवचिकता ठेवून धोरणात्मक निर्णय घेतले आहेत

 सभासदांना दिवाळीनिमित्त लाभांश वाटपास शुभारंभ करण्यात आला संस्थेचे चेअरमन अजित थोरात यांनी लाभांश सभासदांच्या सेविंग्ज खात्यावर जमा केला आहे असे जाहीर केले कार्यक्रमाच्या वेळी व्हा. चेअरमन श्री चंद्रकांत टंकसाळे सर्व संचालक सल्लागार संस्थेचे सचिव श्री सर्जेराव शिंदे सेवक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी संस्थेचे संचालक श्री शामराव पवार यांनी आभार मानले

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक