श्री मळाईदेवीच्या 21व्या मल्हारपेठ शाखेचा मोठ्या दिमाखात उद्घाटन समारंभ संपन्न
श्री मळाईदेवीच्या 21व्या मल्हारपेठ शाखेचा मोठ्या दिमाखात उद्घाटन समारंभ संपन्न
कराड, दि. 24 - श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जखिणवाडी या संस्थेच्या 21व्या मल्हारपेठ शाखेचा उद्घाटन सोहळा संस्थेचे संस्थापक अशोकराव थोरात भाऊ यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जखिणवाडी या संस्थेची स्थापना संस्थापक अध्यक्ष शेती मित्र अशोकराव थोरात भाऊ यांनी दिनांक 31 जुलै 1987 रोजी केली गेल्या 39 वर्षांमध्ये संस्थेने 20 शाखा व मुख्य कार्यालय अशा 21 शाखा मधून बँकिंग सेवा सुरू केली असून संस्थेच्या एकूण शाखांपैकी 17 शाखा स्व-मालकीच्या इमारतीत आहेत.
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करीत असताना डोळ्यापुढे एक सामाजिक उद्दिष्ट होते त्या काळामध्ये गरीब शेतकरी शेतमजूर लघुउद्योजक रिक्षाव्यवसायिक यांची बँकांमध्ये पत नसल्याने त्यांना आवश्यक ते अर्थसहाय्य मिळत नव्हते. त्यांची बाजारात पत नाही अशा लोकांची पत निर्माण करणे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून संस्थेच्या कामकाजास सुरुवात झाली.
संस्थेचा सुरुवातीचा कारभार फक्त एका शाखेमधून केला जात होता पण काळाची गरज ओळखून सन 1996 पासून संस्थेने शाखा विस्तार करण्याचे ठरवले व त्याप्रमाणे वाटचाल करून आज संस्थेची 21 वी शाखा मल्हारपेठ मध्ये स्थापन करत असताना आम्हास आत्यानंद होत आहे.
सन 1987 मध्ये लावलेले हे छोटेसे रोपटे आज वटवृक्ष बनले आहे मल्हार पेठ येथील शाखा ही संस्थेच्या प्रगतीतील आणखी एक महत्त्वाची पायरी आहे तसेच संस्थेने NEFT RTGS व QR कोड या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी संस्थेच्या सर्व सुविधांचा व विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान संस्थेचे चेअरमन माननीय श्री अजित थोरात काका यांनी केले.
आज अखेर संस्थेचे 9150 सभासद असून दिनांक 21 सप्टेंबर 2025 अखेर संस्थेकडे 168.31 कोटी ठेवी आहेत संस्थेने गरजू लोकांना 128.31 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे तरलते पोटी संस्थेने 65 कोटी रुपयांची मुदत ठेवी मध्ये सुरक्षित गुंतवणूक केलेली आहे तसेच संस्थेचे भाग भांडवल 12 कोटी 28 लाख असून 22 कोटी 47 लाख पेक्षा जास्त रकमेचे राखीव व इतर निधी संस्थेने उभा केलेला आहे संस्था स्थापनेपासून सतत वर्ग संपादन करत आहे तसेच सभासदांना दरवर्षी 10% ने लाभांश देत आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव थोरात भाऊ, संस्थेचे चेअरमन माननीय अजित थोरात काका, व्हाईस चेअरमन चंद्रकांत टंकसाळे संचालक सल्लागार शाखा कमिटी सदस्य व मल्हार पेठचे लोकनियुक्त सरपंच किरण दसवंत, नावडीचे माजी सरपंच नारायण नलवडे, अडवोकेट संग्राम निकम, आर बी पवार सर, शरद भिसे माझी जि प सदस्य अशोक डिगे, संचालक मरळी कारखाना दयानंद पाटील, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखाना संचालक अभिजीत पवार, युवा सेना तालुका अध्यक्ष विक्रम सिंह पाटील, अधिकराव पवार, राजाराम कोळेकर, मानसिंग कदम, गौरीहार दसवंत, शंकरराव कदम, चंद्रकांत भिसे, भाजपा तालुका अध्यक्ष सैनिक फेडरेशन मल्हार पेठ व मल्हार पेठ पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ तसेच मळाईदेवी पतसंस्थेचे सचिव श्री सर्जेराव शिंदे शाखाप्रमुख व सेवक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शर्मिला श्रीखंडे व सौ शोभा पाटील यांनी केले व संस्थेचे आभार श्री अभिजीत पवार यांनी मानले

Comments
Post a Comment