कराड तालुक्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे आयोजन


कराड तालुक्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा होणार 

कराड, दि. 16 - छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. 17 सप्टेंबर, 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 02 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करणेत येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे तसेच तहसिलदार कल्पना ढवळे यांनी दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशाप्रमाणे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, यांच्या मार्गदर्शनांखाली कराड तालुक्यांत विविध उपक्रम राबविणेत येणार आहेत.

पहिला टप्पा - पाणंद रस्ते विषयक मोहिम 

यामध्ये प्रामुख्याने पाणंद, पांधण, शिवरस्ते, गाडीरस्ते, पायवाट इत्यादी अतिक्रमण मुक्त करुन त्यांचे सिमांकन करणे व त्याच्या गांव नकाशांवर नोंदो घेणे, खुल्या झालेले शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचे दुतर्फा झाडे लागवड करणेत येणार आहे.

दुसरा टप्या - सर्वासाठी घरे 

या उपक्रमांतंर्गत शासनांकडून निर्गमीत करणेत आलेल्या शासन निर्णयांचे अनुषंगाने अंमलबजावणी करणे, सन 2011 पुर्वीचे रहिवासी कारणांसाठी केलेले अतिक्रमण नियमांनुकूल करणेबाबत कार्यवाही करणेत येणार आहे.

तिसरा टप्पा - नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे

यामध्ये खालीलप्रमाणे विषय घेणेत आलेले आहेत.

१. पोटखराब क्षेत्र वहिताखाली आणणेसाठी सर्व गावांमध्ये विशेष प्रयत्न करणे,

२. ई-पिक पाहणी व फार्मर आयडी (अॅग्रीस्टॅक) काढणेबाबत कॅम्प घेणे,

३. पुरवठा विभागांमार्फत देणेत येणा-या सेवां अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम होण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविणेत येऊन त्यासाठी सर्व रास्तभाव दुकानाचे दर्शनी भागांत क्युआर कोड फलक लावणे.

५. एकाच नावाच्या अधिक व्यक्ती असल्यास आईचे नांव किंवा टोपण नांव वाढविणेची कार्यवाही करणे इत्यांदी उपक्रम घेणेची कार्यवाही करणेत येणार आहेत.

६. कराड तालुक्यातील प्रत्येक मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करुन शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे, विविध प्रकारचे दाखले वाटप, ७/१२ वाटप करणे.

पहिल्या टप्यामध्ये गांव नकाशांमध्ये नसलेले परंतु वहिवाटीत असलेले गाडीरस्ते, पायवाटा यांचे सर्वेक्षण होणार असून अतिक्रमण दिसून आल्यास त्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करुन शेत रस्त्यासाठी शेतक-यांची संमत्तीपत्रे घेतली जाणार आहेत. त्यातूनही विवादग्रस्त राहिलेल्या रस्त्यांबाबत तहसिलदार यांच्या स्तरावर रस्ता अदालत आयोजित केलेल्या असून सामोपचाराने अतिक्रमण दूर करण्याची कार्यवाही करणेत येणार आहे.

वरीलप्रमाणे पहिल्या, दुस-या व तिस-या टप्प्यांचे अनुषंगाने महसूल विभागाच्या सर्व योजना, सेवा शेतक-यां पर्यंत पोहोचविणे, शासनाची ध्येय धोरणे जनतेस समजावून सांगणे, शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे या अनुषंगाने मा. मंत्री महोदय, महसूल महाराष्ट्र राज्य यांनी सर्व महसूल अधिकारी यांना निर्देश दिलेले आहेत.

त्यानुसार कराड तालुक्यांमध्ये सेवा पंधरवडा साजरा केला जाणार असून कराड तालुक्यांतील सर्व शेतकरी, खातेदार, नागरीकांनी सेवा पंधरवडयांमध्ये देणेत येणा-या सेवांचा, शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी कराड व तहसिलदार कराड यांचेमार्फत करणेत येत आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक