Posts

Showing posts from December, 2024

कराडच्या उड्डाण पुलाचे 85 टक्के काम पूर्ण....

Image
  कराडच्या उड्डाण पुलाचे 85 टक्के काम पूर्ण; फक्त 20 पिलर वरील काम बाकी 72 पिलरवर 959 सेगमेंटस् बसवण्यात आल्याने 2 हजार 710 मीटरचा उड्डाणपूल तयार  कराड, दि. 28 (प्रतिनिधी) - पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सिंगल पिलर वरील महाराष्ट्रातील पहिला सहापदरी (29.5 मीटर रुंद व 3.5 कि.मी. लांब व दोन्ही बाजूंच्या भरावासह 4.6 कि.मी) युनिक उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू आहे. आत्तापर्यंत या पुलाचे 85 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती डी पी जैन कंपनीच्या कडून देण्यात आली. या पुलासाठी 1 हजार 226 सेगमेंटस् लागणार आहेत. आत्तापर्यंत यापैकी 959 सेगमेंट 72 पिलर वर बसवून पूर्ण झाले आहेत. दोन ऑक्टोंबर 2023 पासून आज पर्यंत या पुलावर सेगमेंटस् बसवण्याचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या महामार्गावर या पुलाचे दोन ठिकाणी काम सुरू आहे. दोन्ही ठिकाणी 72 पिलरवर 959 सेगमेंट बसवून पूर्ण झाले आहेत. त्यामूळे 70 गळे पूर्ण झाले असून 2 हजार 710 मीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे. हॉटेल ग्रीन पार्क ते कोयना वसाहत दरम्यान 41 पिलरवर 557 सेगमेंट बसवण्यात आले असून या ठिकाणी 40 गाळे पूर्ण झाल्याने 1 हजार 565 मीटरचा उड्डाणपू...

फ्लेक्स बोर्डने शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा पालिकेसमोर आंदोलन - शिवसेना

Image
  कराड नगरपरिषदेच्या उप मुख्याधिकारी यांना निवेदन देताना अनिताताई जाधव, नितीन काशीद, शशीराज करपे, अक्षय गवळी व इतर फ्लेक्स बोर्डने शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा पालिकेसमोर आंदोलन - शिवसेना कराड, दि.27 - कराड शहरात बेकायदेशीर होर्डिंग व जाहिरात फलकामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विद्रूपीकरणाबाबत गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा पालिके समोर तीव्र घंटा नाद आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव ठाकरे) कराड शहरच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. कराड नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना कराड शहर पदाधिकारी गांभीर्यपूर्वक आपल्या निदर्शनास आणून देत आहोत की, कराड नगरपरिषद हद्दीत विविध ठिकाणी प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवतीर्थ, प्रीतीसंगम घाट परिसर, विविध स्मारके परिसरात विनापरवाना बेकायदेशीर रित्या फ्लेक्स होर्डिंग लावण्यात येत आहेत. यामुळे महापुरुषांच्या स्मारकाचे महत्व कमी होत आहे. त्याचबरोबर रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघात प्रवण क्षेत्र निर्माण होत आहेत. शहराचे विपुद्रीकरण मोठ्या ...

काले गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील - आ. डॉ. अतुलबाबा भोसले...

Image
  काले : रस्तेसुधारणा कामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले. काले गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील - आ. डॉ. अतुलबाबा भोसले. काले येथे दोन कोटीच्या निधीतून रस्तेसुधारणा कामाचा भूमिपूजन कराड, दि. 26 (प्रतिनिधी) काले गावासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या काळात विविध विकासकामांसाठी सुमारे १० कोटी ८७ लाखांचा निधी मला खेचून आणता आला याचे समाधान आहे. येत्या काळात सुद्धा काले गावच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल तेवढा निधी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. काले (ता. कराड) येथे २ कोटींच्या निधीतून होणाऱ्या रस्तेसुधारणा कामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.  काले येथे डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या जिल्हा व इतर मार्ग योजनेअंतर्गत २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याअंतर्गत काले जुने स्टँड ते स्मशानभूमी ते देसाई मळा ते रा.मा. १४८ रस्ता ग्रा.मा. २३८ कि.मी. ०/०० ते ३/०० (भाग काले ते प्रजिमा ६२) या रस्त्याची सुधारणा केली जाणार...

कराडात अभिरुची संस्थेतर्फे कला महोत्सवाचे आयोजन....

Image
  कराडात अभिरुची संस्थेतर्फे कला महोत्सवाचे आयोजन... कराड दि. 26 (प्रतिनिधी) - स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेला कराडचा 'अभिरुची' फिल्म क्लब गेली काही वर्षे कऱ्हाडसारख्या लहान गावासाठी दुर्मीळ अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात अग्रेसर राहिला आहे. या 'अभिरुची' संस्थेतर्फे १०, ११, १२ जानेवारी २०२५ या काळात कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती 'अभिरुची'चे अध्यक्ष डॉ अजय ब्रह्मनाळकर यांनी दिली आहे. अभिरुचीने आयोजित केलेले अनेक उत्तमोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटांबरोबरच व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांच्या चित्रांचे प्रदर्शन, २०२० सालातला कलामहोत्सव, ‘किमया’ हा अतुल पेठेकृत अनोखा प्रयोग तसेच पं. मालिनी राजुरकर, पं. कैवल्यकुमार गुरव अशा श्रेष्ठ कलाकारांचे कार्यक्रम रसिकांच्या स्मरणात आज ही आहेत.  या महोत्सवाचे उद्घाटन स्व. वेणूताई चव्हाण सभागृहात शुक्रवार १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. महोत्सवाबरोबरच 'चिंटू तुमच्या भेटीला' या चित्रप्रदर्शनाचेही उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात पहिल्या दिवशी, शुक्रवार १० जानेवारी रो...

ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन

Image
कराड : सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले. बाजूस आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील व अन्य मान्यवर. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन कराड, दि. 24 - महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज कराड दौऱ्याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसला भेट दिली. याठिकाणी त्यांनी सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले.  नुकत्याच झालेल्या खातेवाटपात सातारा – जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी वर्णी लागली. या निवडीनंतर आज प्रथमच ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले कराड दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसला भेट दिली. यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर ना. भोसले यांनी सहकारमहर्षी स्व. जयवंतराव ...

उंडाळे येथे महारोजगार व संवाद मेळाव्याचे आयोजन

Image
उंडाळे येथे महारोजगार व संवाद मेळाव्याचे आयोजन  अॅड. उदयसिंह पाटील - उंडाळकर; 3 हजार युवकांना मिळणार रोजगार  कराड, दि. 24 (प्रतिनिधी) - उंडाळे येथे शुक्रवार, दि. 3 जानेवारी 2025 रोजी कै. स्वा. सै. शामराव पाटील (आण्णा) यांच्या पुण्यतिथीनिमित्त महारोजगार मेळावा व शनिवार, दि. 4 जानेवारी 2025 रोजी स्व. लोकनेते विलासकाका पाटील - उंडाळकर यांच्या 4 थ्या पुण्यतिथीनिमित्त संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील - उंडाळकर यांनी दिली.  येथील कोयना बँकेच्या प्रधान शाखेत सदर कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेचे बोलत होते. कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, शामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष शहाजी पाटील, प्रा. धनाजी काटकर, युवा हबचे दीपक पवार व किरण भाले यांची प्रमुख उपस्थिती होती.  अॅड. पाटील म्हणाले, शुक्रवार दि. 3 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कै. स्वा. सै. दादासो उंडाळकर स्मारक, कराड-चांदोली रोड, उंडाळे (ता. कराड) येथे होणाऱ्या महारोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील 60 हून...

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना १०० व्या जयंतीदिनी मान्यवरांकडून अभिवादन

Image
कराड : सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले. बाजूस माजी आमदार आनंदराव पाटील व श्री. विनायक भोसले व अन्य मान्यवर. सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना १०० व्या जयंतीदिनी मान्यवरांकडून अभिवादन कराड, दि. 22 - कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या पवित्र स्मृतींना १०० व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.  य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, श्री. विनायक भोसले यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील आप्पासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, दयानंद पाटील, वसंतराव शिंदे, बाबासो शिंदे, जे. डी. मोरे, आनंदराव मोहिते, विलासराव पवार, अशोकराव पवार,...

कराडमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र ‘नेकलेस रोड’ची गरज

Image
नागपूर : हिवाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले. कराडमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र ‘नेकलेस रोड’ची गरज आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांची नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मागणी  कराड, दि. २१ - कराड शहरात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरुन सांगली जिल्ह्यातील विट्याकडे जाणारी वाहतूक कराड शहरातून जाण्याऐवजी अन्य मार्गाने वळविणे गरजेचे आहे. यासाठी पंकज हॉटेल ते कराड-विटा या मार्गाकडे जाणाऱ्या नव्या ‘नेकलेस रोड’ची उभारणी करण्याची मागणी, कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना केली.  नागपूर येथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात औचित्याचा मुद्दा मांडताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, कराड शहरातून सांगली जिल्ह्यातील विटा गावाकडे जाणारी वाहतूक पंकज हॉटेलजवळून थेट हायवेवरून विट्याला जाण्याऱ्या रस्त्याकडे वळविता आल्यास, शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल. हा नेकलेस स्वरुपाचा रस्ता स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिस्...

कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शिरवळ येथील नव्या कॅम्पसचे उद्या भूमिपूजन

Image
शिंदेवाडी : कृष्णा विश्व विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचे संकल्पचित्र. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शिरवळ येथील नव्या कॅम्पसचे रविवारी भूमिपूजन कराड, दि.२१ - शिरवळ (ता. खंडाळा) येथील शिंदेवाडीमध्ये कृष्णा विश्व विद्यापीठाच्या नव्या भव्य कॅम्पसची उभारणी करण्यात येणार आहे. या नव्या कॅम्पसचे भूमिपूजन सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून रविवार दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजून ११ मिनीटांनी, विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकीत असलेल्या कृष्णा विश्व विद्यापीठाचा नवा कॅम्पस शिरवळजवळच्या शिंदेवाडीत साकारला जाणार आहे. मुंबई – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर व निरा नदीच्या काठालगत सुमारे ५० एकरच्या विस्तीर्ण जागेवर साकारण्यात येणाऱ्या या कॅम्पसमध्ये, सुमारे ६५० खाटांचे शिक्षण रुग्णालय उभारले जाणार आहे. तसेच २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसह वैद्यकीय, आयुर्वेदीक, दंतविज्ञान, फिजीओथेरपी, नर्सिंग, फार्मसी कॉलेजची उभारण...

कराड नगर परिषदेचा दिल्लीत आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव

Image
दिल्ली : आंतरराष्ट्रीय विज्ञान व पर्यावरण संस्थेच्या संस्थेच्या संचालिका डॉ सुनीता नारायण यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना मुख्याधिकारी शंकर खंदारे समवेत आरोग्य अभियंता गिरीश काकडे. कराड नगर परिषदेचा दिल्लीत आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव  घनकचरा व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल; महाराष्ट्रातील एकमेव नगरपरिषद कराड दि. 19 (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विज्ञान आणि पर्यावरण संस्थेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापन मधील उत्कृष्ट व सातत्यपूर्ण कामगिरी बद्दल दिल्ली येथे कराड नगरपरिषदेस पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. देशभरातून निवडलेल्या 150 संस्था पैकी महाराष्ट्रातील कराड नगरपरिषद एकमेव ठरली आहे. हा पुरस्कार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे व आरोग्य अभियंता गिरीश काकडे यांनी आज दिल्ली येथे स्वीकारला. कराड नगरपरिषदेने गेल्या अनेक वर्षात स्वच्छ सर्वेक्षणासह विविध उपक्रमात देशपातळीवर अव्वल कामगिरी केली आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात ही कराड नगरपरिषद नेहमीच सरस ठरली आहे. यामध्ये आता या पुरस्काराची भर पडली असून कराड नगर परिषदे...

कराड अर्बन बँकेच्या तळभाग शाखेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा...

Image
कराड अर्बन बँकेच्या तळभाग शाखेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा  कराड, दि. 19 -  कराड अर्बन को - ऑप. बँक लि., कराडच्या तळभाग शाखेचा वर्धापनदिन मंगळवार, दि. 17 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. शाखेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शाखेतील वाहन तारण कर्ज घेतलेल्या ग्राहकांना मान्यवरांच्या हस्ते वाहन वितरण करण्यात आले.  यामध्ये मनोज सूर्यवंशी, राजेश सचदेव, कृष्णात चव्हाण, चंद्रकांत खडतरे, दत्तात्रय जोशी, शशिकांत शिंदे, संजय नलवडे, सौ. नूतन कदम, प्रशांत पाटील, अनिल बसंतानी, प्रथमेश देसाई या ग्राहकांना बँकेचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांच्या हस्ते वाहने वितरीत करण्यात आली.  यावेळी ग्राहक अमोल नलवडे, अभिजीत चिंगळे, अनिकेत भांगे, दत्तात्रय जोशी, अरूण प्रभुणे, अनिकेत पवार, संतोष देशमुख यांनी तळभाग शाखेबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमहाव्यवस्थापक अतुल शिंदे यांनी केले. कार्यक्रमास बँकेचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, व्यव...

येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मी तुमच्या सोबत : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण...

Image
पाचवडेश्वर : येथील काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना पृथ्वीराज चव्हाण, व्यासपीठावर अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर व इतर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मी तुमच्या सोबत : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड, दि. 18 - लोकसभेनंतर लगेचच चार महिन्यात निवडणुकांचे चित्र असे वेगळे दिसेल. यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. परंतु आपण लोकशाहीवर विश्वास ठेवून मिळालेला निकाल स्वीकारला परंतु राज्यातील वातावरण हे एकदरीत प्रक्रियेबाबत संशयाचे आहे. निवडणुकीत हार जीत ही होतेच. परंतु सरसकट राज्याचाच निकाल इतका एकतर्फी लागणे सर्वसामान्य मतदारांच्या मनात संशय निर्माण करणारे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील संशय दूर करण्याचे काम करणे अपेक्षित होते. विचार सोडून पळून जाण्याचे काम खरा कार्यकर्ता करत नाही. मला कराडच्या जनतेने भरभरून प्रेम दिले. कराड दक्षिणच्या मातीचे उपकाराची परतफेड करण्याची मला संधी मिळाली व या संधीतून तुमच्या सर्वांच्या एकत्रित बळावर कराडची वेगळी ओळख निर्माण करण्यात यश आले. विधानसभेची निवडणूक आपण सर्वजण लढलो. पुढील काळ कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा आहे. त्या निवडणुकांना सामोर...

पाटण कॉलनीतील झोपडपट्टीचा प्रस्ताव तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश...

Image
नागपूर : कराड शहरातील पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना आ.डॉ. अतुलबाबा भोसले.  पाटण कॉलनीतील झोपडपट्टीचा प्रस्ताव तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश कराड, दि. 18 - येथिल पाटण कॉलनीतील आरक्षित जागेवरील 'पार्किंग' हा उल्लेख काढून, तिथे 'बेघरांसाठी घरे' असा बदल करण्याची मागणी आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली. या मागणीची दखल घेत, मुख्यमंत्र्यांनी याबाबत तत्काळ प्रस्ताव तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे या लोकांना याच जागेवर घरे मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कराड शहरातील पाटण कॉलनीतील झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावून, त्यांना हक्काची घरे मिळवून देण्यास आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्राधान्य दिले आहे. यादृष्टीने त्यांनी गेल्या आठवड्यात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत या परिसराची पाहणी केली होती. तसेच झोपडपट्टी पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश नगरपालिका प्रशासनाला दिले होत...

स्व. जयवंतराव भोसले अध्यासनातर्फे १८ ते २२ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रम...

Image
स्व. जयवंतराव भोसले अध्यासनातर्फे १८ ते २२ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रम... कराड, दि. 17 - कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दी निमित्त रेठरे बुद्रुक येथील कृष्णा महाविद्यालयात १८ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्णा महाविद्यालयातील सहकारमहर्षी स्व. जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) अध्यासन केंद्राच्यावतीने १८ डिसेंबर रोजी महाविद्यालय परिसरात मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे. १९ डिसेंबर रोजी सर्व रोग निदान शिबीर, २० डिसेंबर रोजी सायकल रॅली, आणि २१ डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सांगता २२ डिसेंबर रोजी सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या कराड येथील स्मृतीस्थळास भेट देऊन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. सी. बी. साळुंखे आणि प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी दिली आहे .

सरसेनापतींच्या समाधिस्थळी विजय दिवस समिती व तळबीड ग्रामस्थांतर्फे अभिवादन

Image
तळबीड : सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी अभिवादन प्रसंगी मान्यवर. सरसेनापतींच्या समाधिस्थळी विजय दिवस समिती व तळबीड ग्रामस्थांतर्फे अभिवादन  कराड, दि. 16 - विजय दिवस समारोह समिती, तळबीड ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड (ता. कऱ्हाड) येथील समाधीस्थळी आज अभिवादन करण्यात आले.  भारताने बांग्लादेश युध्दात मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ दरवर्षी कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतुन येथे मोठ्या दिमाखात विजय दिवस समारोह साजरा केला जातो. विजय दिवसाच्या आजच्या मुख्य दिवशी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड येथील समाधीस्थळी विजय दिवस समारोह समिती व तळबीड ग्रामस्थांच्यावतीने अभिवादन करण्यात येते. आज सकाळी सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक कर्नल सतेश हांगे, कर्नल समीर कुलकर्णी, लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव, शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, एसजीएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, विजय दिवस समारोह समितीचे सचीव अॅड. संभाजीराव मोहिते, सहसचीव विलासराव जाधव, संचालक सलीम मुजावर, चंद्रकांत जाधव, माजी नग...

विजय दिवस आयोजित रक्तदान शिबिरास प्रतिसाद...

Image
कराड - कासमअली पटवेगार यांचा सत्कार करताना राजगोंडा अपिने, विलासराव जाधव, अॅड. संभाजीराव मोहिते, सलीम मुजावर, मनोहर शिंदे, शारदा जाधव आदी. विजय दिवस आयोजित रक्तदान शिबिरास प्रतिसाद कराड दि. 15 - विजय दिवस समारोह समितीच्यावतीने कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजीक बांधिलकीतुन राबवण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात चांगला प्रतिसाद मिळाला. यशवंत ब्लड बॅंकेच्या सहकार्याने झालेल्या रक्तदान शिबीरात सैन्यदलातील अधिकारी यांच्यासह ४५ नागरीकांनी रक्तदान केले.  येथील शिवाजी आखाड्यात झालेल्या रक्तदान शिबीराचे उदघाटन कराड नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, मलकापुरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, शिवसेनेचे नितीन काशिद, उद्योजक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले. विजय दिवस समारोह समितीचे सचिव अॅड. संभाजीराव मोहिते, सहसचीव विलासराव जाधव, संचालक सलीम मुजावर, रक्तदान उपक्रमाचे प्रमुख रमेश पवार, प्रा. जालींदर काशिद, पर्यावरण मित्र चंद्रकात जाधव, प्रा. भगवान खोत, रत्नाकर शानभाग, लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव, सागर जाधव, संतोष पवार, कासमआली पटवेगार, हेमंत पवार, ए. आर. पवार, आत्मा...

कराडला 14 ते 16 डिसेंबर दरम्यान विजय दिवस सोहळा

Image
कराडला 14 ते 16 डिसेंबर दरम्यान विजय दिवस सोहळा  कराड, दि.12 - बांगला मुक्ती लढ्यातील भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ 1998 पासून कराडमध्ये विजय दिवस समारोह सोहळा साजरा होत आहे. यामध्ये करोना कालावधीत खंड पडला. तसेच गत वर्षी विजय दिवसाचा मुख्य सोहळा रद्द करण्यात आला होता. यावर्षीही मुख्य सोहळ्या दिवशी भव्य शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून दि. 14 ते सोमवार, दि. 16 रोजी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विजय दिवस समारोह समितीचे सचिव अॅड. संभाजीराव मोहिते यांनी दिली.  विजय दिवस समारोह सोहळा 2024 ची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे सहसचिव विलास जाधव, चंद्रकांत जाधव, प्रा. बी. एस. खोत, सलीम मुजावर यांची उपस्थिती होती.  अॅड. श्री. मोहिते म्हणाले, या सोहळ्याची सुरुवात शनिवार, दि. 14 रोजी विजय दिवस समारोह समिती व कराड नगरपरिषद यांच्या विद्यमाने काढण्यात येणाऱ्या कराड दौडने होईल. सकाळी 8 वाजता शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, कराड इथपर्य...

पाटण कॉलनी झोपडपट्टी पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश...

Image
पाटण कॉलनी झोपडपट्टी पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश कराड, दि.11 : कराड शहरातील पाटण कॉलनीत गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ अनेक लोकांना झोपडपट्टीत राहावे लागत आहे. या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावून, त्यांना हक्काची घरे मिळवून देण्यास कराड दक्षिणचे नूतन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्राधान्य दिले आहे. यादृष्टीने आज त्यांनी या परिसराची पाहणी करुन, या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश नगरपालिका प्रशासनाला दिले. हा प्रस्ताव पुढील आठवड्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करुन आणण्याची ग्वाही आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी यावेळी उपस्थितांना दिली. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे मिळण्याचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास जाणार आहे.  विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी निवडून आल्यानंतर पाटण कॉलनीतील झोपडपट्टीचा प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन दिले होते. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी तातडीने शासकीय विभागांची आढावा बैठक घेऊन,...

आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिला भाऊंच्या आठवणींना उजाळा...

Image
आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिला भाऊंच्या आठवणींना उजाळा रेठरे बुद्रुक येथे स्व. यशवंतराव मोहिते यांच्या स्मृतींना अभिवादन रेठरे बुद्रुक, ता. ११ : महाराष्ट्रातील थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील निवासस्थानी कराड दक्षिण विधानसभेचे नूतन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला.  थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या पहिल्या मंत्रीमंडळात मंत्रीपद भूषविले. इतकेच नव्हे तर त्यांनी दीर्घकाळ कराड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना, महाराष्ट्राच्या राजकारणाला विधायक दिशा देण्याचे काम केले. त्यांच्यानंतर तब्बल ३९ वर्षानंतर रेठरे बुद्रुकला आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या रुपाने विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी रेठरे बुद्रुक येथे स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या निवासस्थानी भेट दिली. याठिकाणी भाऊंच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करत, त्यांच्या पवित्र स्मृतींना त्यांनी वंदन केले. यावेळी कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रज...

‘कृष्णा’च्या ४ लघुपटांची राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात निवड...

Image
                              दिग्दर्शक डॉ. बाळकृष्ण दामले  ‘कृष्णा’च्या ४ लघुपटांची राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात निवड पुणे येथे २० व २१ डिसेंबरला होणार प्रदर्शित; पी. एम. शाह फाऊंडेशनतर्फे आयोजन कराड, ता. ९ : पुणे येथे होणाऱ्या १३ व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात कृष्णा विश्व विद्यापीठाच्या ४ लघुपटांची निवड झाली आहे. या लघुपटांचे दिग्दर्शन कृष्णा विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. बाळकृष्ण दामले यांनी केले असून, याचे प्रदर्शन २० व २१ डिसेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. आरोग्य जागृतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे येथील पी. एम. शाह फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी आरोग्य समस्यांवरील चित्रपटांच्या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या १३ व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवासाठी विविध भारतीय भाषांमधून अनेक विषयांवरचे लघुपट फाऊंडेशनकडे प्राप्त झाले होते. यामधून कृष्णा विश्व विद्यापीठाने तयार केलेल्या...

कराडच्या शिवतीर्थाचे सुशोभीकरण, मजबुतीकरण होणार...

Image
  कराडच्या शिवतीर्थाचे सुशोभीकरण, मजबुतीकरण होणार पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर; राजेंद्रसिंह यादव यांचा पाठपुरावा कराड, दि.7 - कराड शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) परिसराचे सुशोभीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समिती व नगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती यशवंत विकास आघाडी व शिवसेनेचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण व्हावे, अशी मागणी कराडकर नागरिक व शिवप्रेमी करत होते. त्याची दखल घेऊन राजेंद्रसिंह यादव यांनी याबाबत दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. दत्त चौक परिसराच्या सुशोभीकरणाची गरज पटवून दिली होती. त्यांच्या निर्देशानुसार सातारा जिल्हा नियोजन समितीमधून या कामासाठी विधानसभा आचारसंहितेपूर्वी निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर लवकरच या कामास सुरुवात होणार आहे.  दत्त चौक परिस...

कराडच्या कृषी प्रदर्शनामुळे शेतकरी समृध्द : खा. नितीन पाटील

Image
कराडच्या कृषी प्रदर्शनामुळे शेतकरी समृध्द : खा. नितीन पाटील कराड, दि.7 : राज्यातील कृषी व तंत्रज्ञानाला दिशा देणारे कराडचे कृषी प्रदर्शन ठरले आहे. या प्रदर्शनाची उदात्त हेतूने विलासराव पाटील - उंडाळकर यांनी पायाभरणी केली. त्यांचा आदर्श घेवून हे प्रदर्शन दिवसेंदिवस बहरत चालले आहे, असे सांगून या माध्यमातून कृषी क्षेत्रातील नवी संकल्पना राबवली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा व कृषी विकासाचा मूळ हेतू घेवून प्रदर्शन चालवण्याची परंपरा टिकावी. व यातून शेतकरी समृध्द व्हावा. असे मत सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा खा. नितीन पाटील यांनी व्यक्त केले. शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने भरविण्यात आलेल्या १९ व्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी महात्मा फुले, (स्व.) यशवंतराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. कराड उत्तरचे नवनिर्वाचित आ. मनोज घोरपडे अध्यक्षस्थानी आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे ...

कृष्णा बँकेला ‘बँको ब्ल्यू रिबन २०२४’ पुरस्कार जाहीर...

Image
  कृष्णा बँकेला ‘बँको ब्ल्यू रिबन २०२४’ पुरस्कार जाहीर कराड, दि.6 : सर्वसामान्यांच्या विश्वासाचे प्रतीक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे कार्यरत असलेल्या कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट कामकाजाबद्दल ‘बँको ब्ल्यू रिबन २०२४’ पुरस्कार जाहीर झाला आहे. जानेवारी महिन्यात लोणावळा येथे होणाऱ्या राष्ट्रीय बँकिंग परिषदेत या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.  सहकार क्षेत्राला बळकटी आणणाऱ्या सहकारी बँकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, अविज् पब्लिकेशन आणि गॅलेक्सी इन्मा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांना ‘बँको’ पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा या संस्थेने संपूर्ण भारतातील ६५० ते ७५० कोटी रूपयांपर्यंतच्या ठेवी असणाऱ्या नागरी सहकारी बँकांची पाहणी करून, या विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविणारी बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेची निवड ‘बँको’ पुरस्कारासाठी केली आहे.  कृष्णा सहकारी बँकेने चेअरमन आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोस...

कृषी प्रदर्शनाचे तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

Image
कराड : यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशू पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्रगतशील शेतकरी, समवेत अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, प्रकाश पाटील, संभाजी काकडे व इतर मान्यवर... कृषी प्रदर्शनाचे तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन कराड, दि. 6 - शेती उत्पन्न बाजार समितीने भरविण्यात आलेल्या १९ व्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आज (शुक्रवार) सायंकाळी तालुक्यातील २० प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते दिमाखात औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यामध्ये प्रथमच महिला शेतकऱ्याचा समावेश होता. व सर्व शेतकऱ्यांना मानाचे फेटे बांधण्यात आले होते. प्रारंभी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, (स्व.) यशवंतराव चव्हाण व विलासराव पाटील - उंडाळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून फित कपण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, बाजार समितीचे सभापती...

यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन उद्या पासून होणार खुले...

Image
यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन उद्या पासून होणार खुले... सायंकाळी शेतकऱ्यांच्या हस्ते औपचारीक उद्धघटन ; चार दिवस चालणार कृषीचा जागर कराड, दि. 5 (प्रतिनिधी) : शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने भरविण्यात येणारे १९ वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन आज (शुक्रवार)पासून खुले होणार आहे. अशी माहिती बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे यांनी दिली. आजपासून १० डिसेंबर या चार दिवसात कृषीचा जागर पहायला मिळणार आहे. कमी कालावधीत बाजार समितीने शासन कृषी विभाग व सह यंत्रणांच्या मदतीने प्रदर्शनाची तयारी पूर्ण केली आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये शेती, औद्योगिक व पशुपक्षी, महिला बचतगट, आरोग्य या क्षेत्रातील पर्वणी पहायला मिळणार आहे. माजी सहकार मंत्री (कै.) विलासराव पाटील - उंडाळकर यांच्या संकल्पनेतून या प्रदर्शनाची १८ वर्षापूर्वी मुहूर्तमेढ रोवली गेली. आजतागायत अखंडपणे हे प्रदर्शन भरवले जात आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी २४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत प्रदर्शन भरवण्याची परं...

कराडच्या कृषी प्रदर्शनात येणार सर्वात उंच खिलार बैल...

Image
कराडच्या कृषी प्रदर्शनात येणार सर्वात उंच खिलार बैल... प्रदर्शनात यंदा मुख्य आकर्षण ; बैलगाडी शौकिनांसाठी पर्वणी... कराड, दि. 4 (प्रतिनिधी) - शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या शेती उत्पन्न बाजार समिती, कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशू - पक्षी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. विना खांबावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपामध्ये विविध स्टॉल साकारण्याची हातघाई सुरू आहे. शासन कृषी विभागाने कृषी विभागाच्या मंडपात धुमाळवाडी ( ता. फलटण) या फळांच्या गावाची प्रतिकृती साकारली आहे. तर या प्रदर्शनातील मुख्य आकर्षण सर्वात उंच खिलार बैलाचे असणार आहे. उमराणीचा सोन्या नामक बैल प्रदर्शनात येणार असल्याने सर्वांनाच प्रदर्शनाची आतुरता लागली आहे. हा बैल पाहण्याची बैलगाडी शौकिनांना पर्वणी ठरणार आहे. माजी सहकारमंत्री (कै.) विलासराव पाटील - उंडाळकर यांच्या संकल्पनेतून १८ वर्षापूर्वी शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशू पक्षी प्रदर्शन आकारास आले. गेल्या १८ वर्षापासून खंड न पडता हे प्रदर्शन भरवले जात आहे. यंदा प्रदर्शनाच्या वेळेत बदल होवूनही प्रदर्शनास शेतकरी, विक्रेते, महिला बचत...

समाजभूषण बाबुराव गोखले स्मृतिदिनानिमित्त विवेक सबनीस यांचे कराडात व्याख्यान

Image
समाजभूषण बाबुराव गोखले स्मृतिदिनानिमित्त विवेक सबनीस यांचे कराडात व्याख्यान कराड, दि. 3 (प्रतिनिधी) - समाजभूषण कै. पुरुषोत्तम पांडुरंग तथा बाबुराव गोखले स्मारक समिती कराडच्या वतीने समाजभूषण बाबुराव गोखले यांच्या 38 व्या स्मृतिदिनानिमित्त गीतेचे गाडे अभ्यासक विवेक सबनीस यांचे "दैनंदिन जीवनात गीतेचे महत्व" या विषयावर व्याख्यान आयोजित केल्याची माहिती स्मारक समितीच्या वतीने देण्यात आली आहे.  येथील नवीन कृष्णाबाई मंगल कार्यालयात गुरुवार दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता या व्याख्यानेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कै. बाबुराव गोखले स्मारक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, कार्याध्यक्ष विठ्ठलराव शिखरे, कार्यवाह वि के जोशी व माधव माने यांनी केले आहे.