समाजभूषण बाबुराव गोखले स्मृतिदिनानिमित्त विवेक सबनीस यांचे कराडात व्याख्यान


समाजभूषण बाबुराव गोखले स्मृतिदिनानिमित्त विवेक सबनीस यांचे कराडात व्याख्यान

कराड, दि. 3 (प्रतिनिधी) - समाजभूषण कै. पुरुषोत्तम पांडुरंग तथा बाबुराव गोखले स्मारक समिती कराडच्या वतीने समाजभूषण बाबुराव गोखले यांच्या 38 व्या स्मृतिदिनानिमित्त गीतेचे गाडे अभ्यासक विवेक सबनीस यांचे "दैनंदिन जीवनात गीतेचे महत्व" या विषयावर व्याख्यान आयोजित केल्याची माहिती स्मारक समितीच्या वतीने देण्यात आली आहे. 

येथील नवीन कृष्णाबाई मंगल कार्यालयात गुरुवार दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता या व्याख्यानेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कै. बाबुराव गोखले स्मारक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, कार्याध्यक्ष विठ्ठलराव शिखरे, कार्यवाह वि के जोशी व माधव माने यांनी केले आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक