स्व. जयवंतराव भोसले अध्यासनातर्फे १८ ते २२ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रम...
स्व. जयवंतराव भोसले अध्यासनातर्फे १८ ते २२ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रम...
कराड, दि. 17 - कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दी निमित्त रेठरे बुद्रुक येथील कृष्णा महाविद्यालयात १८ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कृष्णा महाविद्यालयातील सहकारमहर्षी स्व. जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) अध्यासन केंद्राच्यावतीने १८ डिसेंबर रोजी महाविद्यालय परिसरात मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे. १९ डिसेंबर रोजी सर्व रोग निदान शिबीर, २० डिसेंबर रोजी सायकल रॅली, आणि २१ डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सांगता २२ डिसेंबर रोजी सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या कराड येथील स्मृतीस्थळास भेट देऊन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. सी. बी. साळुंखे आणि प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी दिली आहे
.

Comments
Post a Comment