कराड अर्बन बँकेच्या तळभाग शाखेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा...


कराड अर्बन बँकेच्या तळभाग शाखेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा 

कराड, दि. 19 -  कराड अर्बन को - ऑप. बँक लि., कराडच्या तळभाग शाखेचा वर्धापनदिन मंगळवार, दि. 17 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. शाखेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शाखेतील वाहन तारण कर्ज घेतलेल्या ग्राहकांना मान्यवरांच्या हस्ते वाहन वितरण करण्यात आले. 

यामध्ये मनोज सूर्यवंशी, राजेश सचदेव, कृष्णात चव्हाण, चंद्रकांत खडतरे, दत्तात्रय जोशी, शशिकांत शिंदे, संजय नलवडे, सौ. नूतन कदम, प्रशांत पाटील, अनिल बसंतानी, प्रथमेश देसाई या ग्राहकांना बँकेचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांच्या हस्ते वाहने वितरीत करण्यात आली. 

यावेळी ग्राहक अमोल नलवडे, अभिजीत चिंगळे, अनिकेत भांगे, दत्तात्रय जोशी, अरूण प्रभुणे, अनिकेत पवार, संतोष देशमुख यांनी तळभाग शाखेबद्दल मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमहाव्यवस्थापक अतुल शिंदे यांनी केले. कार्यक्रमास बँकेचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, सर्व संचालक आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तळभाग शाखेचे शाखा व्यवस्थापक सूर्यकांत जाधव यांनी आभार मानले. 

ग्राहकांना आपलीशी वाटणारी बँक  

कराड अर्बन बँकेने खातेदारांसाठी विविध योजनेद्वारे आर्थिक पतपुरवठ्याबरोबरच मोबाईल बँकिंग सुरू केले आहे. याचा ग्राहकांना चांगला फायदा होत असून सर्व ग्राहकांची बँकेने ऑनलाईन व्यवहारांची सोय केल्याने समाधान व्यक्त केले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक