फ्लेक्स बोर्डने शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा पालिकेसमोर आंदोलन - शिवसेना

 

कराड नगरपरिषदेच्या उप मुख्याधिकारी यांना निवेदन देताना अनिताताई जाधव, नितीन काशीद, शशीराज करपे, अक्षय गवळी व इतर

फ्लेक्स बोर्डने शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा पालिकेसमोर आंदोलन - शिवसेना

कराड, दि.27 - कराड शहरात बेकायदेशीर होर्डिंग व जाहिरात फलकामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विद्रूपीकरणाबाबत गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा पालिके समोर तीव्र घंटा नाद आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव ठाकरे) कराड शहरच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

कराड नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना कराड शहर पदाधिकारी गांभीर्यपूर्वक आपल्या निदर्शनास आणून देत आहोत की, कराड नगरपरिषद हद्दीत विविध ठिकाणी प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवतीर्थ, प्रीतीसंगम घाट परिसर, विविध स्मारके परिसरात विनापरवाना बेकायदेशीर रित्या फ्लेक्स होर्डिंग लावण्यात येत आहेत. यामुळे महापुरुषांच्या स्मारकाचे महत्व कमी होत आहे. त्याचबरोबर रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघात प्रवण क्षेत्र निर्माण होत आहेत.

शहराचे विपुद्रीकरण मोठ्या प्रमाणावर होत असून नगर परिषदेचे याच्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. कराड शहरातील विविध महापुरुषाच्या स्मारका सभोवताली होर्डिंग फ्लेक्स लावण्यास बंदी असतानाही व जाहिरात प्रतिबंधक क्षेत्र असताना ही मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे फ्लेक्स बोर्ड होर्डिंग लावून महापुरुषांच्या स्मारकांचे महत्त्व कमी केले जात आहे. याकडे कराड नगर परिषदेने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन प्रतिबंधित ठिकाणी लावलेल्या होर्डिंग व फ्लेक्स जप्त करून सदर व्यक्तीवर ताबडतोब गुन्हे दाखल करून कारवाई करावी तसेच विनापरवाना फ्लेक्सला आळा घालण्यात यावा याकरता योग्य ती आचारसंहिता व कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात यावी अन्यथा व्यापक जनहितार्थ शिवसेना कराड शहराच्या वतीने नगर परिषदेच्या समोर लक्षवेधी घंटा नाद आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेऊन त्वरित कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. 

सदरचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख,  उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकरी, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर यांनाही देण्यात आले आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद, शहर प्रमुख शशीराज करपे, अक्षय गवळी, राजेंद्र कुरकुले, संभाजी जगताप, अनिताताई जाधव उपस्थित होते.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक