काले गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील - आ. डॉ. अतुलबाबा भोसले...

 

काले : रस्तेसुधारणा कामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले.

काले गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील - आ. डॉ. अतुलबाबा भोसले.

काले येथे दोन कोटीच्या निधीतून रस्तेसुधारणा कामाचा भूमिपूजन

कराड, दि. 26 (प्रतिनिधी) काले गावासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या काळात विविध विकासकामांसाठी सुमारे १० कोटी ८७ लाखांचा निधी मला खेचून आणता आला याचे समाधान आहे. येत्या काळात सुद्धा काले गावच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल तेवढा निधी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. काले (ता. कराड) येथे २ कोटींच्या निधीतून होणाऱ्या रस्तेसुधारणा कामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. 

काले येथे डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या जिल्हा व इतर मार्ग योजनेअंतर्गत २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याअंतर्गत काले जुने स्टँड ते स्मशानभूमी ते देसाई मळा ते रा.मा. १४८ रस्ता ग्रा.मा. २३८ कि.मी. ०/०० ते ३/०० (भाग काले ते प्रजिमा ६२) या रस्त्याची सुधारणा केली जाणार असून, या विकासकामाचे भूमिपूजन आ.डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 

आ.डॉ. भोसले म्हणाले, जनतेपर्यंत विकासाची गंगा चिरंतनपणे पोहचविण्यासाठी राज्यातील महायुती सरकार कार्यरत आहे. गेल्या काळात मंजूर झालेली अनेक कामे पूर्णत्वास गेली असून, काही प्रगतीपथावर आहेत. येत्या काही महिन्यात मतदारसंघातील सर्व पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण झालेली दिसतील. काले येथे पूरहानी योजनेतून घाट उभारणीसाठी शासनाच्या माध्यमातून निधी आणणे शक्य आहे. त्याबाबत ग्रामपंचायतीने ताबडतोब प्रस्ताव द्यावा. तसेच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठीही ताबडतोब पैसे उपलब्ध करुन देण्याची ग्वाही आ.डॉ. भोसले यांनी दिली. 

यावेळी यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, सरपंच शंकरराव तांदळे, उपसरपंच प्रकाश पाटील, विवेक पाटील, माजी सरपंच अल्ताफ मुल्ला, के. एन. देसाई, सत्यजीत देसाई, संजय देसाई, नीळकंठ शेडगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक