सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना १०० व्या जयंतीदिनी मान्यवरांकडून अभिवादन

कराड : सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले. बाजूस माजी आमदार आनंदराव पाटील व श्री. विनायक भोसले व अन्य मान्यवर.

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना १०० व्या जयंतीदिनी मान्यवरांकडून अभिवादन

कराड, दि. 22 - कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या पवित्र स्मृतींना १०० व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. 

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, श्री. विनायक भोसले यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील आप्पासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, दयानंद पाटील, वसंतराव शिंदे, बाबासो शिंदे, जे. डी. मोरे, आनंदराव मोहिते, विलासराव पवार, अशोकराव पवार, सर्जेराव थोरात, पैलवान आप्पासाहेब कदम, माणिकराव पाटील, सरपंच बाळासाहेब पाटील, दादा शिंगण, प्रमोद पाटील, चंद्रकांत देसाई, विश्वास काळभोर, सत्यजीत काळभोर, शिवाजीराव पवार, आर. टी. स्वामी, धनाजी जाधव, उपसरपंच उमेश कुलकर्णी, गजेंद्र पाटील, डॉ. सुशील सावंत, विनायक धर्मे, भारत जंत्रे, उमेश शिंदे, व्ही. के. मोहिते, डॉ. सारिका गावडे, राजू मुल्ला, सुरज शेवाळे, तातोबा थोरात, एम. के. कापूरकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक