कराड नगर परिषदेचा दिल्लीत आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव

दिल्ली : आंतरराष्ट्रीय विज्ञान व पर्यावरण संस्थेच्या संस्थेच्या संचालिका डॉ सुनीता नारायण यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना मुख्याधिकारी शंकर खंदारे समवेत आरोग्य अभियंता गिरीश काकडे.

कराड नगर परिषदेचा दिल्लीत आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव 

घनकचरा व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल; महाराष्ट्रातील एकमेव नगरपरिषद

कराड दि. 19 (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विज्ञान आणि पर्यावरण संस्थेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापन मधील उत्कृष्ट व सातत्यपूर्ण कामगिरी बद्दल दिल्ली येथे कराड नगरपरिषदेस पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. देशभरातून निवडलेल्या 150 संस्था पैकी महाराष्ट्रातील कराड नगरपरिषद एकमेव ठरली आहे. हा पुरस्कार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे व आरोग्य अभियंता गिरीश काकडे यांनी आज दिल्ली येथे स्वीकारला.

कराड नगरपरिषदेने गेल्या अनेक वर्षात स्वच्छ सर्वेक्षणासह विविध उपक्रमात देशपातळीवर अव्वल कामगिरी केली आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात ही कराड नगरपरिषद नेहमीच सरस ठरली आहे. यामध्ये आता या पुरस्काराची भर पडली असून कराड नगर परिषदेची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्याने सर्वत्र पालिकेच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

विज्ञान आणि पर्यावरण संस्था ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणपूरक उपक्रम व प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम व प्रशिक्षण देणारी संस्था आहे. २०२४ साठी या संस्थेकडून देश पातळीवर सर्व महानगरपालिका, नगरपालिका , नगरपरिषद, सार्वजनिक उपक्रम व संस्था मधुन घनकचरा व्यवस्थापन मध्ये उच्चतम व् सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या 150 संस्था निवडल्या गेलेेे आहे. यामध्ये महाराष्टातील नगरपालिका या वर्गात एकमेव कराड नगर परिषदेचा समावेश आहे.

कराड नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापनामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल आज  दिनांक 19 डिसेंबर रोजी दिल्ली येथील इंडिया हॅबिटेट केंद्रात आंतरराष्ट्रीय विज्ञान व पर्यावरण संस्थेच्या संस्थेच्या संचालिका डॉ सुनीता नारायण यांचेकडून कराड नगर परिषदेस गौरविण्यात आले. याप्रसंगी नगरपालिकेतर्फे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नगरपरिषदेेे आरोग्य अभियंता गिरीश काकडे यावेळी उपस्थित होते.

कराड नगर परिषदेने येथून पुढेही आपल्या कामगिरीमध्ये असेच सातत्य ठेवून काम करावे अशी इच्छा विज्ञान व पर्यावरण संस्थेच्या संचालिका सुनिता नारायण यांनी व्यक्त केली.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक