कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस वेग
कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस वेग प्रथमच विना खांबाचा मंडप, ६ डिसेंबर पासून कृषी प्रदर्शनास प्रारंभ.. कराड, दि. 30 - शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दरवर्षी भरविण्यात येणारे यशवंत कृषी प्रदर्शन येत्या ६ डिसेंबर पासून सुरू होत आहे. कृषी प्रदर्शनाचे यंदा १९ वे वर्ष असून या प्रदर्शनाच्या तयारीसाठी उभारल्या जाणाऱ्या मंडपाची उभारणी वेगाने सुरू आहे. प्रथमच विना खांबाच्या मंडपात हे प्रदर्शन भरणार आहे. शासन कृषी विभागाच्या सर्वोतपरी सहकार्यातून हे प्रदर्शन होणार आहे. कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच पशुसंवर्धन विभागाचे याकामी मोठे सहकार्य लाभत आहे. जनावरांच्या बाजार तळावर प्रदर्शनाच्या मंडपाची उभारणी केली जात आहे. पाच विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हा मंडप आहे. यंदा प्रथमच विना खांबावर हा मंडप उभारला जात आहे. हा मंडप पिलरलेस डोममध्ये वॉटरप्रुफ असणार आहे. त्यामध्ये ४०० स्टॉल, पशू पक्षांचे स्वतंत्र दालन आहे. आरोग्य विभाग व नवनवीन तंत्रज्ञान दाखवणारे स्टॉल असतील. संपूर्ण मंडपात हवा खेळती राहणार आहे. शेतकऱ्यांना समोर ठेवून प्रदर्शन भरवले जाणार ...