डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचार बैठकींना विविध गावात उस्फूर्त प्रतिसाद

 


डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचार बैठकींना विविध गावात उस्फुर्त प्रतिसाद...

कराड दि. ११ - कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजप महायूतीचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचार बैठकींना विविध गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येवती म्हासोली, शेवाळेवाडी व पाटीलवाडी परिसरात असणारी विविध गावे व वाड्यांच्या विकासासाठी आपण भाजप महायूतीच्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देऊन या ठिकाणच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू अशी ग्वाही डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या प्रचार दौऱ्यात दिली.

निवडणुकीत प्रचारासाठी कमी अवधी राहिला असून, आपण भाजपा महायुतीच्या सरकारने केलेल्या योजनांची व केलेल्या विकासकामांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा असे सांगून विद्यमान आमदार गेल्या दहा वर्षातील कामे पुन्हा या निवडणुकीत सांगत आहेत. त्यांनी एकालाही रोजगार उपलब्ध करून दिला नाही. भूकंप संशोधन केंद्र उभारले हे आता ते किती वर्षे सांगणार आहेत? असा प्रश्न डॉक्टर अतुल भसले यांनी प्रचार बैठकी दरम्यान उपस्थित केला. विद्यमान आमदार अजून जुनीच विकासकामे किती दिवस सांगत बसणार आहात? निवडून आल्यावर त्यांचा या गावांशी व इथल्या लोकांशी संपर्क नाही, अशी टीका हि डॉ. अतुलबाबा भोसले यांनी यावेळी केली. कराड दक्षिणच्या शाश्वत विकासासाठी या निवडणुकीत कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने मला विजयी करावे, असे आवाहनही डॉ. भोसले यांनी केले. 

यावेळी सवादेचे माजी सरपंच संजय शेवाळे, पंकज पाटील, येवतीचे माजी सरपंच सागर शेवाळे, दिनकर पाटील, आण्णासो शेवाळे, पंजाबराव चोरगे, भास्कर शेवाळे, पै. अण्णा पाटील, अनिल वीर, पोपट शेवाळे, शेळकेवाडीच्या सरपंच सुनंदा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रारंभी येवती येथे येवती, शेवाळेवाडी, घराळवाडी, दुधडेवाडी, काटेकरवाडी, काजारवाडी, हणमंतवाडी या गावांची बैठक घेण्यात आली. यावेळी येवती येथे संजय शेवाळे, सागर शेवाळे, पाटीलवाडी येथे सुभाष पाटील, वीरवाडी येथे परशुराम वीर, म्हासोली येथे दिनकर पाटील, सुनंदा शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. 

येवती येथील प्रचारा दरम्यान संदीप शेवाळे, गणेश शेवाळे, महेश शेवाळे, काशीनाथ सोरटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

यावेळी येवतीचे माजी सरपंच सागर शेवाळे, महादेव शेवाळे, जगन्नाथ शेवाळे, मारुती शेवाळे, दादासो शेवाळे, शिवाजी शेवाळे, मारूती देसाई, बाजीराव देसाई, संजय बोरगांवकर, मुंकु़द शेवाळे, रत्नापा कुंभार, पोपट शेवाळे, सुरेश मोहिते, जगन्नाथ घराळ, विलास शेवाळे, प्रदिप सोनवणे, सचिन जाधव, नितीन मोरे, राजेंद्र सोरटे, रमेश लोखंडे उपस्थित होते. 

पाटीलवाडी येथे प्रकाश पाटील, उत्तम पाटील, भानुदास पाटील, जगन्नाथ पाटील, अंकुश पाटील, शिवाजी पाटील, शंकर साठे, सिद्रम पाटील, महादेव शेवाळे, अभय पाटील, शंकर वीर, नितीन हिनुकले, विजय बाबर, माजी सरपंच सुभाष पाटील, प्रकाश पाटील, हणमंत पाटील, सुनिल पाटील, उत्तम पाटील, अनिल पाटील, बाळासो पाटील, मधुकर पाटील, महादेव शेवाळे, मोहन पाटील, बबन पाटील, डॉ. संजय पाटील, भास्करराव शेवाळे, वीरवाडी येथे परशुराम वीर, अनिल वीर, पोपट घराळ, रामचंद्र घराळ,तानाजी वीर, बबन हिनुकले, हणमंत पाटील, सुभाष पाटील पै. आण्णा पाटील, म्हासोली येथे व्हा.चेअरमन उदय पाटील, दिनकर पाटील, संतोष सुर्यवंशी, आशोक धनवडे,दत्तात्रय शेवाळे, संजय शेटे,धनाजी मोहिते,भानुदास शेटे, सुखदेव बापू, आण्णासो शेवाळे, पांडुरंग माने, आण्णा पाटील,गंगाराम चोरगे, बजरंग पाटील, राजाराम पाटील, अनिल सुर्यवंशी, पोपट पवार, महादेव पवार, वैभव चोरगे आदी उपस्थित होते.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक