मोठे उद्योग व मोठी गुंतवणूक या भागात करण्यासाठी मी प्रयत्न करणार;डॉ. अतुलबाबा भोसले

मोठे उद्योग व मोठी गुंतवणूक या भागात करण्यासाठी मी प्रयत्न करणार;डॉ. अतुलबाबा भोसले

कराड, दि. 16 (प्रतिनिधी) कराडमधील स्थानिक भूमिपुत्रांना तसेच युवकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करण्याचा संकल्प माझा आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून मोठं मोठे उद्योग व मोठी गुंतवणूक या भागात करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिले. 

विंग येथे आयोजित प्रचार बैठकीत ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक वसंतराव शिंदे, सयाजी यादव, जयंवत माने, महादेव पाटील, हेमंत पाटील, राजेंद्र खबाले, आण्णासो कचरे, विकास माने, शिंदेवाडीचे सुरेश शिंदे, सचिन पाचूपते, हेमंत पाटील, विकास खबाले, बंडा खबाले, संजय खबाले,आबासो खबाले, अमोल पाटील, भिमराव कणसे, धनाजी कणसे, शिवाजी पाटील, संदीप माळी, सचिन नलवडे, श्रीरंग नलवडे, सुरेश खबाले, संभाजी पाटील, विकास होगले, नंदकुमार कडव यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.,अतुलबाबा भोसले पुढे म्हणाले, विंग गावाला 13 कोटी निधी दिला आहे. अनेक काम पूर्ण झाली आहेत. गावातील मूलभूत प्रश्न सोडवले जातील जात आहेत. विंग गावाने आम्हाला मोठे सहकार्य केले आहे. कराड दक्षिणला 745 कोटी रुपयांचा निधी महायुतीने दिला आहे. कृष्णा विश्व विद्यपीठाच्या शिरवळ कॅम्पसच्या माध्यमातून 2500 लोकांना रोजगार मिळवून देणार आहे. आपल्या भागात एखादा आंतरराष्ट्रीय प्रकल्प आणण्याच्या प्रयत्नही करणार आहे. महायुतीचे सरकार आपण निवडून आणायचे आहे. येत्या 20 तारखेला कमळ चिन्हाच्या समोरील बटन दाबून मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.

सुनील पाटील म्हणाले, अतुलबाबा यांनी २०१९ ते २०२४ पर्यंत पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकासनिधी आपल्या मतदार संघात आणला आहे. अतुलबाबा यांनी सर्व शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या राबविल्या आहेत. कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सुविधा लोकांना उपलब्ध करून दिली आहे. पण विरोधी आमदार काही गावात 10 वर्षे झाली फिरकले नाहीत. विरोधकांच्या भूलथापांना जनता आता भुलणार नाहीत. कराड शहरातून मताधिक्य मिळणार आहे.

दरम्यान विंग येथील युवा नेते विकास खबाले, जगन्नाथ खबाले, विजय खबाले, विठ्ठल माने, शरद घोरपडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना विकास खबाले म्हणाले, अतुलबाबा यांच्याकडे आपल्या भागाचा विकास करण्याचे व्हिजन आहे. अतुलबाबा उमदे व्यक्तिमत आहेत. येत्या काळात अतुलबाबा राज्यातील मोठे नेतृत्व म्हणून पुढे येणार आहेत. सचिन पाचूपते यांनी स्वागत केले. शिंदेवाडीचे सुरेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार वसंतराव शिंदे यांनी मानले.

दरम्यान मौजे आणे, कोळे, विंग याठिकाणी मतदारांसोबत डॉ. अतुलबाबा भोसले यांनी संवाद साधला. येथे आणे वारकरी मंच महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष ह भ प मधुकर महाराज जाधव यांनी भारतीय जनता पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.अतुलबाबा भोसले यांना पाठिंबा दिला. त्या संदर्भात पाठिंबा दर्शविणारे पत्र सुपूर्द केले. यावेळी सुनील पाटील कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, आणेचे सरपंच किसन देसाई, दादासो पाटील, सुभाष पाटील, सुरेश देसाई, सदाशिव चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक