मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या सेवेकरिता कायम समर्पित राहणार; आ. पृथ्वीराज चव्हाण

 


मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या सेवेकरिता कायम समर्पित राहणार; आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड, दि.23 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे कि, मतदारांनी आपला कौल दिला आहे. कराड दक्षिणच्या मतदारांचा निर्णय शिरोधार्थ आहे. माझ्या सहकार्यांनी सर्व शक्तीनुसार निवडणुकीत काम केले. त्या सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद. मी कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या सेवेकरिता कायम समर्पित राहणार आहे. 

या निवडणुकीत अतुल भोसले विजयी झालेत त्यांचे अभिनंदन, ते कराडच्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतील व कराडच्या सर्वांगीण विकासाकरिता काम करतील त्या कामी त्यांना माझे सहकार्य असेल. 

राज्यात श्री. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला निर्णायक विजय मिळाला आहे, त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. ते राज्याच्या विकासाकरिता सतत प्रयत्नशील राहतील व जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील हि अपेक्षा. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा 

ज्या प्रमाणे २०१९ मध्ये भाजपा नेतृत्वाने श्री. उद्धव ठाकरे यांना वागणूक दिली त्या प्रकारचा व्यवहार श्री. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत होणार नाही अशी अपेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

Comments

Karad Today News

कराड शहरात उद्या वाहतूक मार्गात मोठा बदल

कराडला सर्वात पुढे नेण्याची ताकद व कुवत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यातच आहे.

नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन

आ. पृथ्वीराज चव्हाण सारख्या स्वाभिमानी नेत्याला निवडून द्या ; खा. सचिन पायलट

कराड शहरात आ. पृथ्वीराज चव्हाण यांना वाढता पाठिंबा ; ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत

कराड दक्षिण मधून पृथ्वीराज बाबांनाच निवडून द्या;माजी आ. रामहरी रूपनवर...