महाविकास आघाडीच्या युवक मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद....

 

कराड : येथील युवक मेळाव्यात बोलताना उदयसिंह पाटील - उंडाळकर...

भाजपने युवकांच्या मनात न्यूनगंड निर्माण केला;उदयसिंह पाटील - उंडाळकर

कराड, दि.15 (प्रतिनिधी) : गेली ८ ते १० वर्षे राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यांनी राज्यात विकासाच्या योजना राबविण्याऐवजी राजकारण करून राज्य अस्थिर केले. भाजपने दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्य अस्थिर ठेवण्याचे काम केले. राज्यात व देशात हेट ऑब्जेक्ट पसरवत संभ्रम केला. देशातील युवकांच्या मनात न्यूनगंड निर्माण करून त्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले आहे. असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील - उंडाळकर यांनी केले. 

कराड येथे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते. आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष पोपटराव साळुंखे, बाळासाहेब मोहिते, ज्ञानदेव राजापूरे, अक्षय सुर्वे, माजी नगरसेवक अशोक कोळी, रमेश वायदंडे आदीसह मोठ्या संख्येने युवक यावेळी उपस्थित होते.

ते म्हणाले, देव आणि धर्म हि वैयक्तिक आणि देव्हाऱ्यात पूजन्याची बाब आहे. पण त्याचे राजकारण करणं, हे चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून सर्वधर्म समभाव जपला.

ते म्हणाले, बटेंगे तो कटेंगेचे नेरेटिव्ह पहिल्यांदा कुणी वापरलं तर ते इंग्रजानी वापरले. ते भारतात येताना त्यांनी कधीही त्यांचे लोक, दारुगोळा असं काही आणले नव्हती. पण आपल्याच लोकांना जाती, धर्म, वर्णद्वेष यामध्ये अडकवून त्यांच्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला जात आहे. 

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भूकंप होण्याची पूर्वसूचना अर्धा तास आधी जरी मिळाली, तरी हजारो नागरिकांचे प्राण वाचू शकतील. त्यामुळे कोयना धरणापासून काही अंतरावर आठ किलोमीटर खोल छिद्र पाडून त्यामध्ये काही सेन्सेटिव्ह उपकरणे ठेवली आहेत. त्यामुळे भूकंप होण्याआधीची माहिती मिळते व त्याचे संशोधन हजारमाचीच्या भूकंप संशोधन केंद्रात होते.

ते म्हणाले, माझे एकच धोरण की, मिळालेल्या सत्तेचा उपयोग जनतेचा सार्वजनिक विकास झाला पाहिजे. व कराड जिल्हा करणारच येत्या 23 तारखेला महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, कराडचा आणखी शाश्वत आणि जास्त विकास करता येईल.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक