कराड शहरात उद्या वाहतूक मार्गात मोठा बदल
दक्षिणची रत्नागिरी गोडाऊन तर उत्तरची मतमोजणी स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे होणार
कराड, दि. २२ (प्रतिनिधी) - कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शनिवारी सकाळी 6 वाजता सुरू होत आहे. त्यामुळे दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजे पर्यत शहरातील वाहतुक मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
कराड दक्षिणची रत्नागिरी गोडाऊन येथे मतमोजणी असल्याने विजय दिवस चौक येथुन भेदा चौक बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना (एस.टी. बस वगळून) प्रवेश बंद करणेत आला असून, सदरची वाहने विजय दिवस चौक येथुन दत्त चौक, पोपटभाई पेट्रोल पंप मार्गे कोल्हापुर नाका बाजुकडे जातील. तसेच एस.टी. बस ही विजय दिवस चौक येथुन टी पॉईन्ट मार्गे एस.टी. स्टॅन्ड येथे व त्याच मार्गे परत बाहेर येतील.
कार्वेनाका बाजुकडुन भेदा चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना गेट नं. ४ येथुन भेदा चौक बाजुकडे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे, सदरची वाहने गेट नं.४ येथुन बैलबाजार रोड, मलकापुर, हायवे रोड मार्गे कराड शहरात जातील.
पोपटभाई पेट्रोल पंप येथुन भेदा चौक बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना (मतदान प्रक्रियेतील वाहने वगळून) प्रवेश बंद करण्यात आला असुन, सदरची वाहने शाहु चौक, दत्त चौक मार्गे कराड शहरात व सैदापुर कॅनॉल बाजुकडे जातील व कार्वेनाका, कार्वे, शेणोली बाजुकडे जाणारी सर्व वाहने कोल्हापुर नाका येथुन हायवे रोडने मलकापुर बैल बाजार रोड मार्गे कार्वे, शेणोली बाजुकडे जातील.
कराड शहर पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांचे निवासस्थान येथुन भेदा चौक बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सदरची वाहने वरीष्ठ पोलीस निरीक्षक, कराड शहर यांचे निवासस्थानापासुन प्रांत कार्यालय, शाहु चौक मार्गे पोपटभाई पेट्रोल पंप व कोल्हापुर नाका बाजुकडे जातील. अंबिका मेस येथुन भेदा चौक व प्रांत कार्यालयाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असुन, सदरची वाहने कराड शहर पोलीस स्टेशन मार्गे शाहु चौक व एस.टी. स्टॅन्ड बाजुकडे जातील.
गेट नं. १ ते बैलबाजार रोड व भेदा चौक ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जाणारा संपुर्ण रोड मतपेटी नेणाऱ्या एस.टी. बस व मतदान प्रक्रियेतील वाहनांचे पार्किंगसाठी आरक्षित करण्यात आला आहे. सदर रोडवर खाजगी वाहने पार्किंग करण्यास मनाई करणेत आली आहे.
कराड शहरातुन कार्वेनाका, कार्वे, शेणोली बाजुकडे जाणारी सर्व वाहने कोल्हापुर नाका येथुन हायवे रोडने मलकापुर, बैल बाजार रोड मार्गे कार्वे, शेणोली बाजुकडे जातील.
कराड उत्तरची मतमोजणी स्व.यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे असल्याने त्या परिसरातील वाहतुक मार्गात दिनांक २३ रोजी बदल करण्यात आला आहे. महालक्ष्मी चौक, कराड येथुन मुंबई आईस्क्रीम चौक बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करणेत आला असुन, सदरची वाहने कोल्हापुर नाका येथुन हायवे रोड, मलकापुर, बैल बाजार मार्गे जातील.
बैलबाजार रोड येथुन महालक्ष्मी चौक बाजूकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना मुंबई आईस्क्रीम चौक येथून प्रवेश बंद करण्यात आला असून सदरची वाहने बैल बाजार रोड मलकापूर हायवे मार्गे कराड शहरात जातील.
सुपर मार्केट येथुन गणेश हॉस्पीटलकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. मोहीते हॉस्पीटल येथुन स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल, कराड बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करणेत आला आहे. मुंबई आईस्क्रीम ते स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथील संपुर्ण रोड, झेंडा चौक ते गणेश हॉस्पीटल जाणारा संपुर्ण रोड व पी.डी. पाटील उद्यानासमोरील कॉलनीतील रोड मतदान प्रक्रियेतील वाहनांच्या पार्किंगसाठी आरक्षित करण्यात आला आहे. सदर रोडवर खाजगी वाहने पार्कीग करणेस मनाई करण्यात येत आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने, पोलीस दलाची वाहने व निवडणूक प्रक्रियेची वाहने वगळता या बदलाची सर्व वाहनधारकांनी नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment