कराडला सर्वात पुढे नेण्याची ताकद व कुवत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यातच आहे.


कराडला सर्वात पुढे नेण्याची ताकद व कुवत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यातच आहे.

कराड बार असोसिएशनच्या विद्यमान अध्यक्षांसह 20 माजी अध्यक्षांचा आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मतदान करण्याचे आवाहन.

कराड, दि. 16 (प्रतिनिधी)  आ. पृथ्वीराज चव्हाण यांना आमदार म्हणून निवडून दिले तर आपण महाराष्ट्र राज्याचा भावी मुख्यमंत्री निवडून देऊ. विरोधी उमेदवार हे गेली अनेक वर्ष राजकीय जीवनात असून त्यांची राजकीय कार्यकीर्द आपल्यासमोर आहे. त्यांनी सातत्याने केलेल्या पक्षांतरामुळे राजकीय विश्वासार्थता गमावली आहे. या उलट उत्तुंग राजकीय कारकीर्द, धोरणात्मक दृष्टी यामुळे कराड जिल्हा होऊन कराडला सर्वात पुढे नेण्याची ताकद व कुवत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यातच असल्याने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना आपले अमूल्य मत द्यावे असे आवाहन कराड बार असोसिएशनच्या विद्यमान अध्यक्ष एड. एम टी देसाई यांच्यासह वीस माजी अध्यक्षांनी केले आहे. 

यावेळी विद्यमान अध्यक्ष एड. एम टी देसाई, सयाजीराव पाटील, प्रतापराव जानुगडे, मानसिंगराव पाटील, अधिकराव पाटील, बबनराव जाधव, दिलीप पाटील, चंद्रकांत कदम, दादासाहेब जाधव, प्रकाशराव चव्हाण, शिवाजीराव निकम, सतीशराव पाटील, शशिकांत गोखले, काकासो जाधव, रामचंद्र होगले, विद्याराणी साळुंखे, मोहनराव जाधव, शरदराव पाटील, संजय महाडिक, नितीन पाटील व शशिकांत मोहिते उपस्थित होते.

कराड बार असोसिएशन आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देसाई पुढे म्हणाले, मागील विधानसभेच्या पाच वर्षाच्या कालखंडावर नजर टाकली तर आपल्याला असे दिसून येते की राज्य सरकारच्या कायदा व सुव्यवस्था, कृषी, आरोग्य, रोजगार निर्मिती, महिला सुरक्षा व सक्षमीकरण, व्यापार व सर्व धोरणात्मक निर्णयाबाबत विधानसभेमध्ये झालेल्या वाद विवाद चर्चा यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या भाषणाचा प्रभाव होता. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला केलेल्या सूचनांचा अंतर्भाव सरकारने त्यांच्या विधेयकामध्ये केलेला आहे. विशेषता महिला व गरजूंच्या रक्षणासाठी मांडलेल्या सरकारच्या विधेयकांमधील त्रुटी बाबत व सुधारणेबाबत सरकारला पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेमध्ये मांडलेल्या सूचना मार्गदर्शक ठरले आहेत.

यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे. चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सरकारने केलेल्या सहकार्यामुळे व योजनांमुळे कृषी उत्पादन अपेक्षा जास्त होते. उद्योग व कारखान्यांनी पूर्ण क्षमतेने काम केले होते. औद्योगिक वाढ समाधानकारक होती तसेच अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्र मध्ये गुंतवणूक करत होत्या. चव्हाण यांचे भ्रष्टाचार निर्मूलनासाठीचे कठोर धोरण राज्याचा पूर्णपणे केलेला पारदर्शक कारभार यामुळे आज अखेर त्यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप सुद्धा झालेला नाही.

पृथ्वीराज चव्हाण हे आपल्या देशातील धोरणी व प्रभावी नेते आहेत. महाराष्ट्र राज्याचे भवितव्य, राज्यातील समस्या आणि त्यावरील उपाय याबाबत चव्हाण हे योग्य प्रकारे मार्ग काढू शकतात. महाराष्ट्र राज्याच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी आवश्यक असणारा धोरणात्मक कार्यक्रम पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी केलेली अनेक विकास कामे ज्यामध्ये कराड शहरात जोडणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण, शासकीय कार्यालयांचे नूतनीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे भूकंप संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठ तसेच त्यांनी सुचवलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील देशातील दुसरा सिंगल पिरल वरील उड्डाण पूल, विमानतळ विस्तारीकरण व प्रशिक्षण केंद्र इत्यादी अनेक कामांचा अंतर्भाव होतो. यामुळे कराडची व्यापार पेठ समृद्ध होत असून व्यापारात वृद्धी होत आहे. कराड तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून कराड तालुक्यातील साखर कारखाने व त्यावर अवलंबून असणारे शेतकरी यांचा विचार करून पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड तालुक्यात विकास कामे केली आहेत. कराड तालुक्यात औद्योगिकरण व कृषी क्षेत्र यांची सांगड घालून पृथ्वीराज चव्हाण यांनी दूरदृष्टीने केलेल्या विकास कामामुळे आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा सातारा जिल्ह्यातील सर्वात विकसित मतदार संघ म्हणून ओळखला जातो.

Comments

Karad Today News

कराड शहरात उद्या वाहतूक मार्गात मोठा बदल

नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन

मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या सेवेकरिता कायम समर्पित राहणार; आ. पृथ्वीराज चव्हाण

आ. पृथ्वीराज चव्हाण सारख्या स्वाभिमानी नेत्याला निवडून द्या ; खा. सचिन पायलट

कराड शहरात आ. पृथ्वीराज चव्हाण यांना वाढता पाठिंबा ; ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत

कराड दक्षिण मधून पृथ्वीराज बाबांनाच निवडून द्या;माजी आ. रामहरी रूपनवर...