अखिल भारतीय मराठा महासंघाचा आ. पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा

कराड : येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा देताना पदाधिकारी...

अखिल भारतीय मराठा महासंघाचा आ. पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा

कराड, दि. (प्रतिनिधी) : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा समाजाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. याबाबत पाठिंब्याचे पत्र मराठा महासंघाच्यावतीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले. मनोज जरांगे - पाटील यांच्या आदेशावरून सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मराठा समाजाने पाठिंबा दिला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ, जिल्हा सरचिटणीस विवेक कुराडे - पाटील, सुरज जाधव, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष युवराज कुराडे - पाटील, कराड शहराध्यक्ष संदीप काळे, ज्येष्ठ मार्गदर्शक विजय शिंदे, अमर पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मराठा समाजाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट आहे. मनोज जरांगे - पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारला. यावेळेस विधानसभेत आ. चव्हाण यांनी आरक्षणाची आपली भूमिका ठामपणे मांडली. आरक्षणासाठी त्यांचा आग्रह कायम आहे. त्यांच्या भूमिकेचे स्वागत करत मराठा समाजाच्या पदाधिकऱ्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मराठा महासंघाचे उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवार जनार्दन देसाई (कार्वे ), प्रकाश पाटील (आटके ), रवींद्र यादव (मलकापूर ), ऋषिकेश जाधव (ओंड ) यांनीही उपस्थित राहून आ. पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा दिला.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक