देशाच्या विकासात महिलांचे महत्वाचे योगदान; ना.डॉ. भारती पवार...
‘आयुष्मान भारत’ योजनेच्या लाभार्थींना गोल्डन कार्डचे वितरण करताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार. बाजूस विक्रम पावसकर, डॉ. अतुल भोसले, एकनाथ बागडी व अन्य मान्यवर. देशाच्या विकासात महिलांचे महत्वाचे योगदान; ना.डॉ. भारती पवार... कराड दि.31: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची झपाट्याने प्रगती होत आहे. जगात २२० कोटी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. हे सर्व पंतप्रधान मोदींमुळे शक्य झाले असून, नरेंद्र मोदींमुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. नरेंद्र मोदींच्या रुपाने भारताला समर्पित आयुष्य देणारा पंतप्रधान लाभला आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काढले. भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्यावतीने कराडमध्ये आयोजित ‘मन की बात’ कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या. कराड येथील वेणुताई चव्हाण सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ना. डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सा...