कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे 17 रोजी उद्घाटन;कराडला थांबा देण्याची मागणी...


कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे 17 रोजी उद्घाटन;कराडला थांबा देण्याची मागणी...

कराड दि.13- मुंबई-कोल्हापूर या वंदे भारत एक्सप्रेसचे 17 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मात्र या एक्सप्रेसला सांगली आणि कराड येथे थांबा नसल्याने या दोन्ही महत्त्वाच्या स्टेशनवरील प्रवाशांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे याबाबत या दोन्ही ठिकाणी या एक्सप्रेसला थांबे करावेत अशा मागणीचे पत्र खा. श्रीनिवास पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे केली आहे.

खा.पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना केलेल्या मागणीमध्ये म्हटले आहे की, या एक्सप्रेसचे उद्घाटन 17 डिसेंबर रोजी होणार असल्याचे वर्तमानपत्रामधून व आलेल्या बातम्या वरून कळले आहे. या गाडीला सांगली आणि कराड स्थानकावर थांबा देण्यात आला नाही. कोल्हापूर नंतर कराड आणि सांगली हे दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. मुंबईला जाण्यासाठी सर्वाधिक लोक कराड आणि सांगली या स्थानकावरून बुकिंग करतात. पर्यायाने या स्थानकावर गाडीला थांबा देण्यात यावा अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटना करीत आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस गाडीला सांगली व कराड या दोन्ही ठिकाणी थांबा देण्याबाबत रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी विनंती या पत्रात खा. पाटील यांनी केली आहे.

राजू सनदी कराड 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक