माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कार्वे गावासाठी 4 कोटी 22 लाखाचा निधी...


माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कार्वे गावासाठी 4 कोटी 22 लाखाचा निधी...

कराड दि.2-माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून तसेच कार्वे गावचे माजी सरपंच वैभव थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जल जीवन मिशन अंतर्गत कार्वे गावातील गोपाळनगर व वाढीव वस्तीसाठी ३ लाख लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली असून ४ कोटी २२ लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर झाला आहे. याबाबतचे मंजुरी पत्र कार्वे गावचे माजी सरपंच वैभव थोरात, ग्रामपंचायत सदस्य सागर देसाई, अभिजीत वायदंडे, विठ्ठल हुलवान आदींनी ग्रामस्थांच्या वतीने आ. चव्हाण यांच्याकडून स्वीकारले. यावेळी युवानेते इंद्रजित चव्हाण, स्वीय सहायक गजानन आवळकर उपस्थित होते. कार्वे गावच्या पिण्याच्या पाणी योजनेसाठी इतका भरघोस निधी मंजूर केल्याबद्द्ल माजी सरपंच वैभव थोरात व ग्रामपंचायत सदस्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार मानले. 

कार्वे गावासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१३-१४ साली पेयजल योजना मंजूर झालेली होती. या योजनेचा विस्तार संपूर्ण गावामध्ये १६ कि.मी. इतका असून वॉर्ड क्र. ४ मध्ये पाण्याची टाकी २.५० लाख लिटर व वॉर्ड क्र. ५ मध्ये पाण्याची टाकी १.६५ लाख लिटर एवढी क्षमता आहे. तसेच त्यानंतर गोपाळनगर व आसपासच्या वस्तीसाठी ३ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व योजना मंजूर होणे आवश्यक असल्याने हि योजना मंजूर करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता व हि योजना गावासाठी अत्यंत महत्वाची असल्याने कार्वे गावच्या वस्त्यासाठी ४ कोटी २२ लाखांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून कार्वे गावच्या आसपासच्या वस्त्यासाठी मंजूर झालेल्या निधीतून पाणी योजना लवकरच पूर्ण होऊन स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार 24 बाय 7 योजनेतून मिळणार आहे.



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक