सातारा जिल्ह्यात मतदार नोंदणीत कराड तालुका अव्वल; 31 पर्यंत नावे नोंदवा: प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे...
सातारा जिल्ह्यात मतदार नोंदणीत कराड तालुका अव्वल; 31 पर्यंत नावे नोंदवा: प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे...
कराड दि.29 (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड तालुका प्रशासनाने कराड उत्तर व कराड दक्षिण मतदार संघात मतदार यादी अद्यावत करण्यामध्ये बीएलओच्या मदतीने राबवण्यात आलेल्या मोहिमेत जिल्ह्यात अव्वल कामगिरी केली असून दोन्ही मतदारसंघातून 94 हजार प्राप्त अर्जातून 75 हजार अर्ज मंजूर केल्याची माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नवीन मतदार नोंदणी 31 डिसेंबर पर्यंत करण्याचे आवाहनही म्हेत्रे यांनी यावेळी केले. यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी एन चंद्रा, नायब तहसीलदार युवराज पाटील उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे अंमलबजावणी 1 जून 2023 पासून सुरू होऊन 5 जानेवारी 2024 रोजी समाप्त होत आहे. या कार्यक्रमात मतदार यादीत नावे वाढवणे, नवीन मतदार नोंदणी करणे, स्थलांतरित व मयत मतदारांची नावे वगळणे तसेच नावात दुरुस्ती करणे याबाबत बीएलओंच्या मदतीने 1 जून 2023 ते आज अखेर विशेष मोहीम राबवण्यात आली. या कामात कराड तालुक्यात बीएलओनीं अतिशय उत्तम कामगिरी केली असल्याची माहिती ही यावेळी म्हेत्रे यांनी दिली
कराड उत्तर व कराड दक्षिण मतदार संघात 647 बीएलओ व 75 सुपरवायझर यांनी उत्कृष्ट पद्धतीने या मतदार नोंदणी कार्यक्रमात प्रशासनाला सूचनेनुसार काम केल्याने जिल्ह्यात सर्वात अवल कामगिरी कराड तालुक्याची झाली आहे. बीएलओनी घरोघरी जाऊन बीएलओ ॲपच्या माध्यमातून नोंदणी केली. तसेच प्रशासनाच्या वतीने ही तालुक्यातील 62 कॉलेज मधून वेळोवेळी कॉलेज प्रशासनाशी केलेल्या चर्चेनुसार सुमारे 9 हजार विद्यार्थ्यांची मतदान नोंदणी करण्यात आली आहे. मलकापूर नगरपरिषद हद्दीत मतदार यादीतून नावे वगळणे व नवीन नावे नोंदणी करणे शंभर टक्के झाल्याची माहिती ही यावेळी प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी दिली.
कराड उत्तर मतदार संघातून 46 हजार 279 अर्ज प्राप्त झाले असून 37 हजार 723 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत तर कराड दक्षिण मतदार संघात 48 हजार 170 अर्ज प्राप्त झाले असून 38 हजार 444 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मतदार नोंदणी बाबत प्राप्त दावे हरकती निर्गती करून अंतिम मतदार यादी दिनांक 22 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून नोंदणी झालेल्या सुमारे आठ हजार मतदारांची ओळखपत्रे पोस्टाने पाठवल्याचे ही यावेळी प्रांताधिकारी मेहत्रे यांनी सांगितले.
कराड उत्तर मतदार संघात मतदार यादीत नावे वाढवणे तसेच नवीन मतदारांची नोंदणी करणे कार्यक्रमात 12 हजार 219 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मयत व स्थलांतरित असे 21 हजार 395 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय 4 हजार 109 मतदारांची नावांची दुरुस्ती करण्यात आली आहे.
कराड दक्षिण मतदार संघात मतदार यादीत नावे वाढवणे तसेच नवीन मतदारांची नोंदणी करणे कार्यक्रमात 13 हजार 614 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत मयत व स्थलांतरित असे 19 हजार 845 अर्ज मंजूर झाले आहेत याशिवाय 4 हजार 985 मतदारांच्या नावांची यादीत दुरुस्ती करण्यात आली आहे.
राजू सनदी कराड

Comments
Post a Comment