कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी;मोटारसायकलसह 1 शेळी 2 बोकड आरोपीसह जप्त...
कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीसांची कारवाई;मोटारसायकलसह 1 शेळी 2 बोकड आरोपीसह जप्त...
कराड दि.12- म्होप्रे ता. कराड येथून चोरीस गेलेली मोटरसायकल व दोन बोकड, एक शेळी चोरट्याकडून हस्तगत करण्याची कराड तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण शाखेने कामगिरी केली आहे. याप्रकरणी एकास ताब्यात घेतली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 10 डिसेंबर 2023 रोजीचे सायंकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते दि. 11 डिसेंबर 2023 रोजीचे सकाळी सात वाजण्याच्या दरम्याण मौजे म्होप्रे ता. कराड गावचे हद्दीत उत्तम जयराम जाईगडे यांचे बंदीस्त शेडातुन शंकर आनंदा पुजारी रा.म्होप्रे ता. कराड यांची तसेच गावातील सुनिल रमेश संकपाळ यांचेसुध्दा बंद असले शेडमधुन अज्ञात चोरट्याने 2 बोकड व 1 शेळी चोरुन नेहली आहे. तसेच शशिकांत नंदकुमार जाधव यांची मोटारसायकल बॉक्सर क्रमांक MH 10V 6887 असा एकुण 75000/- हजार रुपये चोरीस गेलेबाबत काल दि. 11 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता तक्रार नोंद केली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व पोलीस निरीक्षक विजय पाटील यांचे सुचनेनुसार सपोनि बाबर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, कोळे आऊट्पोस्टचे प्रदीप कांबळे, गणेश वेदपाठक, समीर कदम यांनी लगेच फिर्यादी यांचे मदतीने गावातील संशयीत आरोपी तानाजी महादेव चव्हाण व सुरज रमेश शिंदे दोन्ही रा.म्होप्रे ता. कराड यांचेकडुन 2 बोकड चोरुन व 1 पाटशेळी व मोटारसायकल बॉक्सर क्रमांक MH 10 V 6887 एकुण किं. 75000/- रुपये ही हस्तगत करुन जप्त करण्यात आली आहे.
वरील कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व कराड तालुका पोलीस निरीक्षक विजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बाबर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, कोळे आऊट्पोस्टचे प्रदीप कांबळे, गणेश वेदपाठक, समीर कदम पुढील तपास पो. हवा. नितीन येळवे हे करीत आहेत.
राजू सनदी, कराड

Comments
Post a Comment