कराडच्या त्या स्फोटातील जखमी मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू...
कराड दि.21 (प्रतिनिधी) येथील मुजावर कॉलनीत गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या जोया मुल्ला (वय 11) या मुलीचा आज उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यापूर्वी जोयाचे वडील शरीफ व आई सुलताना यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन लहान मुलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यामध्ये मुलगा राहत मुल्ला ( वय 7) बरा झाल्याने काही दिवसापूर्वी त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता तर जोया या मुलीवर मिरज येथे उपचार सुरू होते... पुढे वाचा...
मुजावर कॉलनीत 25 ऑक्टोंबर रोजी शरीफ मुबारक मुल्ला यांच्या घरात गॅस गळतीमुळे स्पोट झाला होता. यात मुल्ला कुटुंबीय गंभीर जखमी झाले होते. 31 ऑक्टोंबर रोजी शरीफ मुल्ला यांच्या पत्नीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता तर त्यानंतर चारच दिवसात 3 नोव्हेंबर रोजी शरीफ यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी त्यांची दोन जखमी मुले पोरखी झाली होती. त्यांच्यावर मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शरीफ मुल्ला यांचा मुलगा राहत हा उपचारांती बर झाल्याने त्याला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला होता. तर जोया या मुलीवर मिरज येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
राजू सनदी, कराड


Comments
Post a Comment