कराड शहर डीबीने केला आणखी दिड किलो गांजा जप्त; शहरातील दोघे ताब्यात...
कराड शहर डीबीने केला आणखी दिड किलो गांजा जप्त; शहरातील दोघे ताब्यात...
कराड दि.26-कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने कराडच्या मंडईत अचानक राबवलेल्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये दीड किलो गांजासह दोघांना अटक केली आहे. गांजा व एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. दोनच दिवसांपूर्वी कराड डी बी ने सव्वा किलो गांजा जप्त केला होता.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराड शहर डीबीचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक राजू डांगे व डी. बी. पथकातील सर्व अंमलदार यांनी मंडई परीसरात अचानक कोबींग ऑपरेशन राबवुन सराईत गुन्हेगाराचे घराची झाडाझडती घेतली. यात रेकॉर्ड वरील गुन्हेगार गणेश संजय वायदंडे व संदीप संपत बडेकर ऊर्फ बारक्या बडेकर हे यामा आर एक्स १०० गाडीवरुन बेकायदेशीर गांजाची वाहतुक करताना मिळुन आल्याने त्यांचे कडून सुमारे दिड किलो गांजा व एक लाख रुपये किंमतीची गाडी जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाईत आरोपी गणेश संजय वायदंडे व संदीप संपत बडेकर ऊर्फ बारक्या बडेकर रा. बुधवार पेठ कराड यास ताब्यात घेण्यात आले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे सुचने नुसार व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी, सपोनि चेतन मछले व पोलीस उप निरीक्षक राजू डांगे व पथक यांनी मंडई परीसरात नाकाबंदी व कोंबींग ऑपरेशन राबवुन संयुक्त कारवाई करत दारु पिऊण वाहन चालवणारे एकुण ४ इसमावर कारवाई करत इतर मोटर वाहन कायदयाखाली एकूण ४० कारवाई करुन २०२०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
यापुढे ही अश्याप्रकारे कारवाया संपुर्ण जिल्हयात सुरुच राहणार असुन अंमलीपदार्थ तस्करांची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिला आहे
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मछले, डि. बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, प्रविण जाधव, सफो संजय देवकुळे, पो. हवा. शशि काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, पोलीस अंमलदार महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

Comments
Post a Comment