चोरीची मोटारसायकल कराड वाहतूक शाखेच्या ताब्यात...


चोरीची मोटारसायकल कराड वाहतूक शाखेच्या ताब्यात...

कराड दि. येथील वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी काल दैनंदिन कामकाजा दरम्यान चोरीची मोटर सायकल हस्तगत करून एकास ताब्यात घेतले असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील वाहतूक नियंत्रण शाखेचे अमंलदार पो. हवा. शरद विष्णु चव्हाण व पोलीस अंमलदार वैभव बापुराव यादव यांना दत्त चौक ते विजय चौक यादरम्यान वाहतूक नियमन व वाहन चेकिंग करीत असताना संबधित अमंलदार यांनी समोरून येणारे ग्रे रंगाची एफ झेड मोटार सायकल वरील चालक यांना इशारा करून बाजूला घेतले. 

सदर चालकास त्याचे नांव व मोटार सायकल एफ झेड बद्दल व तिचे कागदपत्रा बाबत माहिती विचारली असता सदर चालक यांने आपले नांव दिपक किसन पोळ वय 24 वर्षे व्यवसाय चालक रा.शामगाव ता कराड जि सातारा असे सांगून नमूद एफ झेड बाबत उडवाउडवीची व असामाधानरकारक उत्तरे दिल्यामुळे व सदर मोटार सायकल एफ झेड चोरीची असावी असा संशय निर्माण झाला.... पुढे वाचा...

सदर एफ झेड बाबत आरटीओ कार्यालय, कराड येथून सविस्तर माहिती घेतली असता सदर वाहनाचा मूळ क्रमांक ए.पी. 21 बी जे 6021 असा व सदर एफ झेड चे मूळ मालक नागेंद्र कुर्णा रा. आदोनी कर्नाटक असल्याची माहिती मिळाली होती. अधिक माहिती घेता सदरची मोटार सायकल चोरीची असून त्याबाबत जत शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं 342/2021 भादवि कलम 379 प्रमाणे दिनांक 05/07/2021 रोजी गुन्हा दाखल असल्याबाबतची माहिती प्राप्त झालेली आहे. याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही साठी जत शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी चेतन मछले, सहा पोलीस उपनिरीक्षक, श्री नाफड, भोईटे, पो हवा शरद चव्हाण, सुरेश सावंत, मनोज् शिदे, सचिन साळुंखे, संतोष पाटणकर, पो कॉ वैभव यादव यांनी केलेली आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक