कराडात युवकावर भर दिवसा हल्ला; युवकाचा मृत्यू, हल्लेखोर फरार...
कराडात युवकावर भर दिवसा हल्ला; युवकाचा मृत्यू, हल्लेखोर फरार...
राजू सनदी कराड
कराड दि.2 येथिल कार्वे नाका येथे अर्बन बँकेच्या समोर रस्त्यावर भर दिवसा एका युवकावर हल्ला झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने कार्वे नाका परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. हल्ला करून हल्लेखोर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आज दुपारी 2:30 च्या सुमारास शुभम चव्हाण (वय 22) रा. वडोली निळेश्वर याच्यावर कर्वे नाका परिसरातच राहणाऱ्या मुबीन इनामदार या युवकाने पूर्व वैमन्याशातून टोकदार शस्त्राने वार केले. यावेळी त्याच्यासोबत अन्य दोन साथीदार असल्याचे समजते. सपासप अकरा वार केल्याने शुभमचा जागीच मृत्यू झाला.
शुभम हा शहरातील चर्च नजिक एक सलून चालवत होता. तर शुभम वर हल्ला करणारा युवकाचेही कर्वे नाका परिसरात दुकान आहे. शुभम वर हल्ला करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. स्वर्गीय खाशाबा जाधव स्मारका समोरच रस्त्यावर ही घटना घडली आहे. शुभम आपल्या दोन मित्रांसह कार्वे नाका परिसरात आला होता.
दरम्यान या हल्ल्याची घटना समजतच घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर, पाटणचे डी वाय एस पी लावंड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.


Comments
Post a Comment